शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

घरबसल्या Aadhar card मध्ये अपडेट करा नवा मोबाइल नंबर, मिनिटांत होईल काम, पाहा प्रक्रिया

By ऑनलाइन लोकमत | Published: November 21, 2021 2:43 PM

1 / 7
आधार कार्ड (Aadhaar Card) हे सध्या महत्त्वाच्या दस्तऐवजांपैकी एक आहे. अनेक महत्त्वाच्या कामांसाठी तसंच आर्थिक व्यवहारांसाठी पॅन कार्ड सोबत आधार कार्डचाही वापर अनिवार्य करण्यात आला आहे. यामध्ये व्यक्तीचं नाव, जन्मतारीख, आधार क्रमांक, फोटो आणि बायोमॅट्रिक डेटासारखी महत्त्वाची माहितीही असते.
2 / 7
जर तुमच्या आधार कार्डातील माहिती चुकीची असेल किंवा तुम्हाला तुमचा मोबाईल क्रमांक अपडेट करायचा असेल तर तुम्ही घरबसल्याही आधार कार्डावर आपला नवा मोबाईल क्रमांक अपडेट करू शकता. UIDAI आधार कार्डधारकांना आपला मोबाइल क्रमांक अपडेट करण्याची परवागी देतं.
3 / 7
आधार कार्डात नाव, पत्ता, जन्मतारीख अशी माहिती अपडेट करण्यासाठी तुमचा मोबाईल क्रमांक अपडेट असणं आवश्यक आहे. अपडेट करण्यासाठी तुमच्या रजिस्टर्ड मोबाइल क्रमांकावर ओटीपी पाठवला जातो. यासाठी तुमचा मोबाइल क्रमांक अपडेट असणं आवश्यक आहे.
4 / 7
आधार कार्ड अपडेच करण्यासाठी तुम्हाला सर्वप्रथम Ask.uidai.gov.in या वेबसाइटवर जावं लागेल. त्यानंतर त्या ठिकाणी तुम्हाला हवा असलेला नवा मोबाइल क्रमांक टाकावा लागेल. तसंच यानंतर समोर देण्यात आलेल्या बॉक्समध्ये सुरक्षेसाठी देण्यात आलेला कॅप्चा टाईप करावा लागणार आहे.
5 / 7
यानंतर त्या ठिकाणी देण्यात आलेल्या सेंड ओटीपी या ऑप्शनवर क्लिक करावं लागेल. त्यानंतर तुमच्या मोबाइल क्रमांकावर पाठवण्यात आलेला ओटीपी एन्टर करा. सबमिट ओटीपी अँड प्रोसीडवर क्लिक करा.
6 / 7
त्यानंतर एक ड्रॉपडाऊन मेन्यू तुम्हाला दिसेल. यामध्ये नाव, पत्ता, लिंग, ईमेल आयडी, मोबाईल क्रमांक आणि अन्य ऑप्शन्सही दिसून येतील. तुम्हाला मोबाइल क्रमांक अपडेट करण्यासाठी मोबाइल क्रमांक निवडावा लागेल.
7 / 7
या ठिकाणी विचारण्यात आलेली सर्व आवश्यक माहिती भरा. तुम्हाला जे काही अपडेट करायचं आहे त्याचं ऑप्शन सिलेक्ट करा. त्यानंतर तुम्हाला एक नवं पेज दिसेल. त्या ठिकाणी समोर देण्यात आलेला कॅप्चा एन्टर करा. मोबाइल क्रमांकावर तुम्हाला एक ओटीपी पाठवला जाईल. तो व्हेरिफाय करा आणि सेव्ह अँड प्रोसीडवर क्लिक करा.
टॅग्स :Adhar Cardआधार कार्डIndiaभारत