शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

ICICI, AXIS बँकेचा ग्राहकांना झटका; संध्याकाळी ६ ते सकाळी ८ अन् सुट्टीच्या दिवशी ATM वापराल तर...

By प्रविण मरगळे | Published: November 03, 2020 12:24 PM

1 / 10
खासगी क्षेत्रातील दोन प्रसिद्ध बँकांनी आपल्या ग्राहकांना मोठा धक्का दिला आहे. आयसीआयसीआय(ICICI Bank) बँक आणि अ‍ॅक्सिस बँकेने(Axis Bank) पैसे जमा करणे आणि काढणे या दोन्ही व्यवहारांवर चार्ज वसूल करण्याचा निर्णय घेतला आहे त्यामुळे यापुढे बँकेतून पैसे काढताना आणि भरताना ग्राहकांना विचार करावा लागणार आहे.
2 / 10
बँकेच्या नवीन नियमानुसार, यापुढे बँकेच्या कामकाज वेळेनंतर किंवा सुट्टीच्या दिवशी पैसे जमा करणे आणि काढणे यावर चार्ज आकारला जाणार आहे. मात्र हे शुल्क केवळ कॅश मशीनमध्ये जमा करण्यावर आकारला जाईल. म्हणजे जर आपण सुट्टीच्या दिवशी मशीनमधून पैसे काढत असाल किंवा जमा करत असाल तर त्यावर रक्कमेवर तुम्हाला शुल्क आकारलं जाणार आहे.
3 / 10
बँकेच्या अधिसूचनेनुसार, आयसीआयसीआय बँक ग्राहकांना सुट्टीच्या दिवशी आणि कामकाजाच्या दिवशी संध्याकाळी ६ ते सकाळी ८ या वेळेत एटीएम मशीन वापरण्यासाठी सुविधा शुल्क म्हणून ५० रुपये आकारेल. हा शुल्क केवळ मशीनवरच असल्याचं बँकेने स्पष्ट केलं आहे.
4 / 10
त्याचा खात्याच्या व्यवहाराशी काही संबंध नाही. ज्येष्ठ नागरिक, मूलभूत बचत बँक खाती, जन धन खाती, अपंग आणि दृष्टिबाधित खाती व विद्यार्थ्यांच्या खात्यावर कोणतेही शुल्क आकारले जाणार नाही असंही बँकेने म्हटलं आहे.
5 / 10
वर्षाच्या सुरूवातीस, अ‍ॅक्सिस बँकेनेही Convenes फीसाठी शुल्क जाहीर केले. १ ऑगस्ट २०२० पासून बँकिंगच्या वेळेव्यतिरिक्त आणि बँकेच्या सुट्टीच्या दिवशी कॅश जमा करत असाल तर ५० रुपये चार्ज लावला आहे. ५० रुपये कन्वेनियंस फी प्रत्येक व्यवहारावर आकारली जाईल.
6 / 10
एसएमएस सुविधेचा उपयोग, किमान शिल्लक, एटीएम आणि धनादेश याच्या वापरासाठी बँक तुमच्याकडून पैसे घेते. परंतु आता बँकांमधून पैसे जमा करण्यास व पैसे काढण्यासाठी ग्राहकांना चार्ज भरावा लागणार आहे.
7 / 10
एसएमएस सुविधेचा उपयोग, किमान शिल्लक, एटीएम आणि धनादेश याच्या वापरासाठी बँक तुमच्याकडून पैसे घेते. परंतु आता बँकांमधून पैसे जमा करण्यास व पैसे काढण्यासाठी ग्राहकांना चार्ज भरावा लागणार आहे.
8 / 10
या चार्जची सुरुवात बँक ऑफ बडोदाने केली आहे. नोव्हेंबर २०२० पासून ग्राहक मर्यादेपेक्षा जास्त बँकिंग करत असल्यास ग्राहकांना स्वतंत्र फी भरावी लागेल, चालू खाते, कॅश क्रेडिट लिमिट आणि ओव्हरड्राफ्ट खात्यातून पैसे जमा करणे आणि पैसे काढणे यासाठी बचत खात्यातून बँक ऑफ बडोदाने वेगवेगळे शुल्क निश्चित केले आहेत.
9 / 10
या महिन्यापासून ग्राहकांना एका महिन्यात तीन वेळा पैसे काढल्यानंतर प्रत्येक वेळी पैसे काढताना १५० रुपये द्यावे लागतील. केवळ तीन वेळा पैसे जमा करणे विनामूल्य असेल. बचत खात्यात खातेदारांना तीन वेळा पैसे जमा करणे विनामूल्य असेल, परंतु जर ग्राहक चौथ्यांदा पैसे जमा करतात तर त्यांना ४० रुपये द्यावे लागतील. एवढेच नव्हे, तर ज्येष्ठ नागरिकांनाही बँकांनी कोणतीही दिलासा दिला नाही.
10 / 10
सीसी, चालू आणि ओव्हरड्राफ्ट खातेधारकांनी दिवसाला एक लाख रुपयांपर्यंत रक्कम जमा केल्यास ही सुविधा विनामूल्य असेल. परंतु जर आपण यापेक्षा अधिक रक्कम जमा केली तर बँका तुमच्याकडून पैसे घेतील. अशा खातेधारकांपैकी एक लाखाहून अधिक जमा करण्यासाठी एक हजार रुपयावर १ रुपये घावा लागणार आहे. जर सीसी, चालू आणि ओव्हरड्राफ्ट खात्यांमधून महिन्यातून तीन वेळा पैसे काढले गेले तर ग्राहकांकडून कोणतेही शुल्क आकारले जाणार नाही. चौथ्यांदा पैसे काढल्यास प्रत्येकवेळी १५० रुपये शुल्क आकारले जाईल. बचत खाते धारकांसाठी तीन वेळा मुदत ठेव विनामूल्य असेल. परंतु, चौथ्यांदा खातेदारांना प्रत्येक वेळी पैसे जमा करताना ४० रुपये द्यावे लागतील.
टॅग्स :bankबँकICICI Bankआयसीआयसीआय बँक