शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

याला म्हणतात भन्नाट रिटर्न! १ लाखाचे झाले २१ लाख; ‘या’ कंपनीचा हायब्रीड फंड ठरतोय हीट; तुम्ही केलीय गुंतवणूक?

By ऑनलाइन लोकमत | Published: November 29, 2021 12:54 PM

1 / 10
गेल्या काही महिन्यांपासून तेजीत असलेल्या शेअर मार्केटचा ब्रेक लागला आहे. दक्षिण आफ्रिकेत आढळलेल्या कोरोनाच्या नव्या व्हेरिएंटमुळे जगभरातील शेअर मार्केट्सवर याचा नकारात्मक परिणाम पाहायला मिळाला. गुंतणूकदारांनी विक्रीचा चौफेर धडाका लावल्यामुळे शेअर मार्केट हजारो अंकांनी पडले.
2 / 10
दुसरीकडे एका कंपनीच्या हायब्रीड फंडने भन्नाट रिटर्न्स दिल्यामुळे गुंतवणूकदार मालामाल झाले आहेत. कंपनीच्या दमदार कामगिरीमुळे गुंतवणूकदारांमध्ये आनंदाचे वातावरण आहे. मागील एका वर्षात या फंडाने दमदार कामगिरी केलीच पण या श्रेणीत इतर फंड योजनांच्या तुलनेत वर्चस्व राखले.
3 / 10
या कंपनीचे नाव ICICI प्रुडेन्शिअल असून, याच्या इक्विटी आणि डेट फंड , एक आक्रमक हायब्रीड फंड असून, यापूर्वी हा एक बॅलन्स फंड होता. या फंडने नुकतीच २२ वर्ष पूर्ण केली आहेत. या फंडाची एकूण मालमत्ता १८९७४.४४ कोटी आहे.
4 / 10
सेबीच्या योजना निहाय गुंतवणूक नियमाप्रमाणे या फंडाची इक्विटीमध्ये ६५ टक्के ते ८० टक्के गुंतवणूक केली आहे. तर डेटमध्ये २० ते ३५ टक्के गुंतवणूक प्रमाण राखले आहे. जर कोणी या फंडांच्या २२ वर्षांच्या प्रवासाकडे पाहिले तर अगदी सुरुवातीला (०३ नोव्हेंबर १९९९) सरसकट १ लाख रुपयांची गुंतवणूक केल्यास आजच्या घडीला ही गुंतवणूक (३१ ऑक्टोबर २०२१ नुसार) २१.७६ लाख इतकी वाढली आहे.
5 / 10
यात दरसाल सरासरी १५.०३ टक्के परतावा मिळाला आहे. याच कालावधीत निफ्टी ५० टीआरआय (अतिरिक्त बेंचमार्क) या निर्देशांकाने दरसाल सरासरी १४.०४ टक्के परतावा दिला. ज्यातून एकूण गुंतवणूक मूल्य १८.०१ लाख इतके वाढले असते. याचा अर्थ इक्विटीमध्ये गुंतवणूक कमी केली अर्थात जोखीम कमी केली फंडाने निफ्टीच्या तुलनेत सरस कामगिरी केली आहे.
6 / 10
आताच्या घडीला सध्या या योजनेसाठीचा बेंचमार्क हा 'क्रिसील हायब्रीड ३५+६५ -अॅग्रेसिव्ह इंडेक्स' हा बराच उशीरा दाखल झाला. 'एसआयपी'च्या माध्यमातून फंडांच्या कामगिरीचा आढावा घेतला तर अगदी सुरुवातीपासून दरमहा १०००० रुपयांची 'एसआयपी' सुरु केली असल्यास एकूण गुंतवणूक २६.४ लाख इतकी झाली.
7 / 10
आजच्या घडीला या गुंतवणुकीचे मूल्य ३१ ऑक्टोबर २०२१ रोजी २.११ कोटी इतके वाढले असते. अर्थात दरसाल सरासरी १६.२२ टक्के परतावा मिळाला असता. इतकीच गुंतवणूक 'निफ्टी ५०' मध्ये केली असती तर दरसाल सरासरी १५.३५ टक्के रिटर्न मिळाला असता.
8 / 10
गेल्या वर्षभरात या फंडाने ६१.३९ टक्के परतावा दिला आहे. बेंचमार्क क्रिसील हायब्रीड ३५+६५ - अॅग्रेसिव्ह इंडेक्सने २८.५७ टक्के परतावा दिला आहे. तर या श्रेणीने सरासरी ४०.८९ टक्के रिटर्न दिला आहे.अशाच प्रकारे वेगवेगळ्या कालावधीत कामगिरी दिसून आली आहे.
9 / 10
बाजार भांडवलाच्या लार्ज, मिड आणि स्मॉल कॅप या श्रेणीत लवचिक गुंतवणूक करण्याचा हातखंडा या योजनेकडे आहे. ३१ ऑक्टोबर २०२१ नुसार या फंडांचे लार्ज, मिड आणि स्मॉल कॅप फंडात अनुक्रमे ९० टक्के, ५ टक्के आणि ५ टक्के गुंतवणूक केली आहे. गुंतवणूक विभागणी ही नेट इक्विटीचे प्रमाण आणि इन हाऊस प्राइस टू बुक मॉडेलवर आधारित आहे.
10 / 10
शेअरच्या निवडीसाठी हा फंड 'टॉप टू डाऊन' आणि 'बॉटमअप' दृष्टिकोन ठेवतो. या फंडाने ऊर्जा, दूरसंचार, तेल आणि बिगर लोहखनिज धातूमध्ये मोठी गुंतवणूक केली आहे. तर बँक, सॉफ्टवेअर, कन्झुमर नॉन ड्युरेबल्समध्ये किमान गुंतवणूक केली आहे. ३१ ऑक्टोबर २०२१ नुसार या फंडांचे नेट इक्विटी गुंतवणूक प्रमाण ७३.६२ टक्के आहे.
टॅग्स :ICICI Bankआयसीआयसीआय बँकfundsनिधी