icici prudential mutual fund launches NASDAQ 100 Index Fund now you can invest from rs 1000 only
ICICI: सुवर्ण संधी! फक्त १ हजारात करा फेसबुक, ॲपलमध्ये गुंतवणूक; ‘या’ कंपनीचा फंड खुला By ऑनलाइन लोकमत | Published: September 29, 2021 10:06 AM1 / 12भारतीय शेअर बाजाराची विक्रमी घोडदौड कायम असल्याचे पाहायला मिळत आहे. यामुळे गुंतणूकदारांना लाखो कोटी रुपयांचा फायदाही झाला आहे. यातच शेअर मार्केटमध्ये नवनवीन IPO सादर केले जात आहेत. 2 / 12यातच आता देशातील अग्रणी म्युच्युअल फंड कंपनी ICICI प्रुडेन्शियल म्युच्युअल फंडाने नॅसडॅक १०० इंडेक्स फंड सादर केला आहे. हा एक ओपन एंडेड इंडेक्स फंड आहे. हा फंड जागतिक स्तरावर १०० पेक्षा जास्त मोठ्या गैर-वित्तीय कंपन्यांमध्ये गुंतवणुकीची संधी प्रदान करेल.3 / 12ICICI प्रुडेन्शियल म्युच्युअल फंडा हा नॅस्डॅक १०० इंडेक्सच्या परताव्याचा मागोवा घेईल.ही नवीन फंड ऑफर (एनएफओ) २७ सप्टेंबर रोजी खुली झाली असून ११ ऑक्टोबर रोजी बंद होईल. यात किमान १००० रुपयांची गुंतवणूक करता येईल.4 / 12या फंडाच्या माध्यमातून फेसबुक, ॲपल, मायक्रोसॉफ्ट, ॲडोबसारख्या जगातील शीर्ष कंपन्यांच्या शेअर्समध्ये गुंतवणूक करता येईल. नॅसडॅक अमेरिकी शेअर बाजाराचा निर्देशांक आहे. याचा अर्थ असा की जर तुम्ही या फंडात गुंतवणूक केली तर हा फंड तुमचे पैसे जगातील १०० मोठ्या कंपन्यांच्या शेअर्समध्ये गुंतवेल. 5 / 12म्हणजेच, तुम्ही भारतात बसून जगातील या मोठ्या कंपन्यांच्या शेअर्समध्ये गुंतवणूक करून त्यातून नफा कमवू शकता. या फंडाचा उद्देश नॅसडॅक १०० इंडेक्सचा मागोवा घेऊन त्याची कामगिरी दाखविण्याचा आहे. 6 / 12नॅसडॅक १०० इंडेक्समध्ये प्रामुख्याने नाविन्यपूर्ण तंत्रज्ञान आणि कम्युनिकेशन्स सेवा असलेल्या कंपन्यांचा समावेश आहे. यातील अनेक कंपन्या आपल्या दैनंदिन जीवनाशी संबंधित आहेत. यामध्ये ॲपल, मायक्रोसॉफ्ट, फेसबुक, अल्फाबेट, नेटफ्लिक्स, स्टारबक्स आदी कंपन्यांचा समावेश आहे, असे ICICI प्रुडेन्शियलचे उत्पादन प्रमुख चिंतन हरिया यांनी सांगितले. 7 / 12नॅसडॅक १०० इंडेक्स टॉप सेक्टरचा विचार केल्यास यात आयटीचा वाटा ४४% आहे. कम्युनिकेशन सर्व्हिसेसचा वाटा २९% तर कन्झ्युमर सेक्टरचा वाटा १५% आहे. आघाडीच्या कंपन्यांमध्ये ॲपलचे वजन ११.३५%, मायक्रोसॉफ्टचे १०.१५%, अमेझॉनचे ७.६६%, अल्फाबेटचे ४.१८% आणि फेसबुकचे ४.०५% आहे.8 / 12गेल्या ३ वर्षांतील आकडेवारी पाहिल्यास नॅसडॅक १०० इंडेक्सने २९.१% परतावा दिला आहे, तर समान कालावधीत निफ्टी ५० टीआरआयने केवळ १५.२% तर एसअँडपी ५०० टीआरआयने १९% परतावा दिला आहे.9 / 12गेल्या ५ वर्षांत निफ्टीने १८.८% तर नॅसडॅक १०० इंडेक्सने ३४.६% परतावा दिला आहे. दहा वर्षांत नॅसडॅक १०० इंडेक्सने ३१.२%, निफ्टी ५० टीआरआयने १३.६% आणि एसअँडपी ५०० टीआरआयने २३.३% परतावा दिला आहे. नॅसडॅक १०० इंडेक्स मुख्यतः लार्ज कॅप ग्रोथ इंडेक्स असतो.10 / 12नॅसडॅक १०० इंडेक्सने गेल्या २० वर्षांत चार पट वाढ केली आहे. जगभरातील शेअर बाजार दरवर्षी वेगळ्या पद्धतीने कामगिरी करतात. आंतरराष्ट्रीय बाजारपेठेमधील गुंतवणुकीतील वैविध्य गुंतवणूकदारांना चांगला परतावा देऊ शकते. 11 / 12विशेषतः अमेरिकन बाजारात गुंतवणूक करण्याचे अनेक फायदे आहेत. यामध्ये केवळ विकसित देश आणि परिपक्व बाजाराचाच फायदा मिळत नाही तर हा गुंतवणूकदारांना थीममध्ये गुंतवणुकीची संधीदेखील प्रदान करतो. यात क्लाउड कॉम्प्युटिंग, ई-कॉमर्स, कृत्रिम बुद्धिमत्ता आदी थीमचा समावेश असतो.12 / 12दरम्यान, खाजगी क्षेत्रातील दिग्गज ICICI बँक लिमिटेडच्या मार्केट कॅपने ५ लाख कोटी रुपयांचा टप्पा ओलांडला आहे. ICICI शेअर मार्केटमधील सूचीबद्ध असणारी दुसरी अशी बँक आहे ज्यांच्या मार्केट कॅपने हा टप्पा ओलांडला आहे. यापूर्वी एचडीएफसी बँकेचे मार्केट कॅप ८ लाख कोटी रुपयांच्या पुढे गेले आहे. आणखी वाचा Subscribe to Notifications