शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

ICICI: याला म्हणतात भन्नाट रिटर्न! १० हजारांच्या SIP चे झाले १.०८ कोटी; ‘या’ फंडाची दमदार कामगिरी

By ऑनलाइन लोकमत | Published: August 30, 2021 2:49 PM

1 / 12
आताच्या घडीला शेअर बाजाराची विक्रमी घोडदौड सुरू आहे. मुंबई शेअर बाजार आणि राष्ट्रीय निर्देशांक दोन्ही सर्वोच्च पातळीवर आहेत. गुंतवणूकदारांची यामुळे चांगलीच चांदी झाली असून, अनेकविध कंपन्यांचे उत्तम रिटर्न मिळत आहेत.
2 / 12
तसेच म्युच्युअल फंडातही मोठ्या प्रमाणात गुंतवणूक होताना दिसत आहे. अनेक म्युच्युअल फंडाच्या कंपन्यांचे उत्तम रिटर्न मिळत आहेत. म्युच्युअल फंडातील गुंतवणुकीचे अनेक पर्याय असल्याचे सांगितले जाते.
3 / 12
SIP म्हणजे सिस्टेमॅटिक इन्व्हेस्टमेंट प्लॅन. ही सुविधा म्युच्युअल फंडमध्ये असते. व्हॅल्यू रिसर्चच्या आकडेवारीनुसार, ICICI प्रुडेन्शियलच्या व्हॅल्यू डिस्कव्हरी योजनेची सुरुवात ऑगस्ट २००४ मध्ये करण्यात आली होती. हा म्युच्युअल फंड उद्योगातील जुन्या व्हॅल्यू फंडपैकी एक आहे ज्याने १७ वर्षे पूर्ण केली आहेत.
4 / 12
या योजनेत गुंतवणूकदारांची रक्कम म्हणजेच व्यवस्थापन अंतर्गत मालमत्ता (एयुएम) २१,१९५ करोड रुपये झाली आहे. व्हॅल्यू डिस्कव्हरीच्या एकूण एयुएमपैकी ३० टक्के हिस्सा ICICI प्रुडेन्शियलच्या व्हॅल्यू डिस्कव्हरी योजनेकडे आहे. एखाद्या गुंतवणूकदाराने या योजनेच्या स्थापनेच्या वेळी यात १ लाख रुपये गुंतवले असतील तर ही रक्कम आज २२. १३ लाख रुपये झाली असेल.
5 / 12
म्हणजेच या योजनेत २०.०३ टक्के वार्षिक परतावा प्राप्त झाला आहे. समान कालावधीत निफ्टी ५० टीआरआयने १५.९१ टक्के दराने परतावा दिला आहे म्हणजेच गुंतवलेल्या १ लाख रुपयांचे केवळ १२.२४ लाख रुपये झाले असते. गुंतवणूक जर दीर्घ कालावधीकरिता असेल तर त्याचा चांगला फायदा होतो.
6 / 12
ICICI प्रुडेन्शियलच्या व्हॅल्यू डिस्कव्हरी योजनेत एखाद्या गुंतवणूकदाराने गेल्या १७ वर्षात दरमहा १० हजार रुपयांची गुंतवणूक केली असेल तर ती रक्कम आज १.०८ कोटी रुपये झाली असेल. म्हणजेच वार्षिक १७.५ टक्के सीएजीआर दराने या योजनेत परतावा मिळाला आहे. सीएजीआर म्हणजे चक्रवृद्धी व्याज दराने मिळणारा परतावा.
7 / 12
म्युच्युअल फंडात SIP हे गुंतवणुकीचे सर्वोत्तम साधन आहे. दीर्घ कालावधीकरिता या योजनेने संपत्तीत चांगली वाढ केली आहे. जेव्हा बाजाराची स्थिती चांगली असेल तेव्हा दीर्घ कालावधीतील गुंतवणुकीत चांगला फायदा मिळतो, असे ICICI प्रुडेन्शियलचे व्यवस्थापकीय संचालक निमेश शाह यांनी सांगितले.
8 / 12
गेल्या ३ वर्षांत ICICI प्रुडेन्शियलच्या व्हॅल्यू डिस्कव्हरी योजनेने सर्व भांडवल बाजारात गुंतवणूक केलेली आहे. यात सर्वाधिक लक्ष्य लार्ज कॅपवर केंद्रित करण्यात आले असून यात ७१.२४ टक्के गुंतवणूक करण्यात आली आहे.
9 / 12
मिड आणि स्मॉल कॅपमध्ये अनुक्रमे १३.५८ टक्के आणि ३.४२ टक्के गुंतवणूक करण्यात आली आहे. या योजनेच्या पोर्टफोलिओत ३ वर्षांत १८ स्टॉक मुख्य राहिले असून त्यांचा हिस्सा ५१.९१ टक्के राहिला आहे, असेही ते म्हणाले.
10 / 12
व्हॅल्यू डिस्कव्हरी योजना तीनही मार्केट कॅप असलेल्या समभागांमध्ये गुंतवणूक करते. यात लार्ज, मिड आणि स्मॉल कॅपचा समावेश असतो. समभागांचे प्रदर्शन दीर्घ कालावधीत चांगले राहते. याच कारणामुळे ही योजना दीर्घ कालावधीत चांगले परतावा देते.
11 / 12
फंडाचे व्यवस्थापन हे या क्षेत्रातील कामाचा दीर्घ अनुभव असणाऱ्या फंड व्यवस्थापकांद्वारे केले जात असल्याने म्युच्युअल फंडाच्या माध्यमातून स्टॉकमध्ये गुंतवणुक करणे फायद्याचे ठरते, असे सांगितले जाते.
12 / 12
म्युच्युअल फंडात गुंतवणूक करताना योग्य सल्ला घ्यावा, असे सांगितले जाते. कारण शेअर बाजारातील चढ-उतार यांवर याचे रिटर्न अवलंबून असतात. त्यामुळे नुकसान टाळण्यासाठी विचारपूर्वक गुंतवणूक करावी, असे म्हटले जाते.
टॅग्स :share marketशेअर बाजारICICI Bankआयसीआयसीआय बँक