IDBI Bank says not hired agency for recruitment warns against fake job offers said on twitter
IDBI Bank मध्ये नोकरी देण्याच्या नावावर होतेय फसवणूक; बँकेनं माहिती देत सागितलं राहा सावध By ऑनलाइन लोकमत | Published: March 20, 2021 5:51 PM1 / 15सध्या IDBI बँकेत नोकरीची संधी असल्याच्या चर्चा रंगत असल्याची माहिती समोर आली होती. परंतु ही बँकेला ही माहिती समजल्यानंतर बँकेनं ग्राहकांना सावध राहण्यास सांगितलं आहे. 2 / 15IDBI बँकेत नोकरी मिळवून देण्याच्या नावावर लोकांची फसवणूक होत असल्याचंही बँकेनं म्हटलं आहे. 3 / 15सोशल मीडियावर एक खोट्या माहितीद्वारे नोकरी देण्याचं सांगून लोकांची फसवणूक केली जात आहे.4 / 15बँकेनं यावर स्पष्टीकरण देत त्यांनी नियुक्ती कंवा लोकांकडून पेसै घेण्यावरून कोणत्याही एजन्सीची सेवा घेतली जात नाही, असं बँकेनं नमूद केलं आहे. 5 / 15तसंच अशा खोट्या मेसेजेस संदर्भात सावध राहण्याचं आवाहनही बँकेनं केलं आहे. 6 / 15बँकेच्या नावाचा वापर करून फसवणूक करणाऱ्या काही व्यक्ती / नियुक्ती करणाऱ्या संस्था या आयडीबीआय बँकेच्या नावावर खोटी नियुक्ती पत्र देऊन नोकरी देण्याचं आश्वासन देत असल्याचं बँकेच्या निदर्शनास आल्याचं बँकेनं ट्वीटमध्ये म्हटलं आहे. 7 / 15जर तुमच्याकडे असा कोणताही फोन आला तुम्ही सावध राहा आणि पूर्ण तपास केल्यानंतरच पुढील पाऊल उचला, असंही बँकेनं म्हटलं आहे. 8 / 15लोकांना देण्यात येणाऱ्या नियुक्ती पत्रात बँकेचं नाव, लोगो आणि पत्त्याचाही वापर करण्यात आला आल्याचंही बँकेनं म्हटलंय.9 / 15बँकेनं दिलेल्या माहितीनुसार त्यांनी आपल्या बाजूनं नियुक्ती आणि प्रशिक्षणासाठी कोणत्याही प्रकारचं शुल्क, कमिशन अथवा कोणतेसे पेसे आकारण्यासाठी कोणत्याही एजन्सीची किंवा व्यक्तीची नियुक्ती केली नाही. 10 / 15बँकेत नोकरी लावून देण्याचं आश्वासन देत काही लोकांना खोटे फोन कॉल येत असल्याचंही निदर्शनास आल्याचं बँकेनं म्हटलं आहे. 11 / 15अशाप्रकारे फसवणूक करणाऱ्या लोकांपासून आणि एजन्सीपासून सावध राहा. बँकेत कोणत्याही प्रकारची नियुक्ती करण्याचा निर्णय झाल्यास त्याची माहिती www.idbibank.in या वेबसाईटवर देण्यात येत असल्याचंही बँकेनं स्पष्ट केलं. 12 / 15अशा परिस्थितीत जर तुमच्याकडे आयडीबीआय बँकेत नोकरी देण्याच्या नावावर कोणताही फोन आला तर त्वरित इमेल अथवा बँकेच्या वेबसाईटवर जाऊन याची माहिती घेण्याचं आवाहनही बँकेनं केलं आहे .13 / 15आयडीबीआय ही एलआयसीच्या नियंत्रणातील एक बँक आहे. नुकतंय या बँकेचं नियंत्रण देशातील सर्वात मोठी विमा कंपनी एलआयसीच्या हाती देण्यात आलं आहे. 14 / 15काही दिवसांपूर्वी रिझर्व्ह बँकेनं आयडीबीआय बँकेला पीसीएमधून मुक्त केलं आहे. बँकेमध्ये काही आर्थिक सुधारणा दिसल्यानंतर बँकेला यातून मुक्त करण्यात आलं. 15 / 15पीसीए म्हणजे कोणतीही बँक रिझर्व्ह बँकेच्या देखरेखीखाली असते. या अंतर्गत बँकेला आपल्या कामकाजात त्वरित सुधारणा कराव्या लागतात. तसंच बँकेला नवी कर्ज देण्याचीही परवानगी नसते. आणखी वाचा Subscribe to Notifications