शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

यशस्वी ऑनलाईन बिझनेससाठी 'या' टिप्स ठरतील फायदेशीर

By ऑनलाइन लोकमत | Published: January 13, 2019 4:07 PM

1 / 8
तंत्रज्ञान आणि स्मार्टफोनने अनेक गोष्टी सोप्या केल्या आहेत. नवा व्यवसाय सुरू करण्याचा तुमचा विचार असेल तर आजच्या डिजिटल जगात खूप पर्याय असलेले पाहायला मिळतात. ऑनलाईन व्यवसाय करण्याकडे तरुणाईचा कल वाढला आहे. अशाच काही स्टार्टअप व्यवसायाबद्दल जाणून घेऊया.
2 / 8
ब्लॉगिंग - तुम्हाला जर वाचायची तसेच लिहायची आवड असेल तर ब्लॉगिंग हा तुमच्यासाठी बेस्ट पर्याय आहे. अर्थशास्त्र, तंत्रज्ञान, व्यवसाय, गुंतवणूक यासह असंख्य विषयांवर ब्लॉगच्या माध्यमातून भाष्य करता येतं. यामुळे तुमची लिहिण्याची आवडही जोपासली जाते. तसेच काही पैसेही मिळतात.
3 / 8
भाषांतर - जर तुमचं इंग्रजी उत्तम असेल तर भाषांतराचं कामही तुम्ही करू शकता. अनेक ठिकाणी महत्त्वाच्या मजकूराचं भाषांतर करावं लागतं. त्यामुळे तुम्ही भाषांतर करून पैसे कमावू शकता.
4 / 8
ऑनलाईन स्टोर - अ‍ॅमेझॉन आणि फ्लिपकार्टसारख्या ई-कॉमर्स कंपन्या लोकप्रिय आहेत. त्यामुळे तुम्ही या ठिकाणी तुमच्या नवनवीन वस्तू लाँच करू शकता. तसेच तुमची इच्छा असल्यास स्वत: च ऑनलाईन शॉपिंग स्टोर सुरू करू शकता.
5 / 8
डिजिटल मार्केटींग - डिजिटल मार्केटींग अंतर्गत विविध वस्तूचे मार्केटींग केले जाते. तसेच यामध्ये जास्तीत जास्त ग्राहकांशी कनेक्ट होऊन नफा कमावण्यास मदत होते. डिजिटल मार्केटींगमधून तुम्ही पुरेसे पैसे कमावू शकता.
6 / 8
SEO एक्सपर्ट - ऑनलाईन व्यवसायात Search Engine Optimization हा एक अत्यंत महत्त्वाचा भाग आहे. गूगलच्या सर्च इंजिनवर आपला कंटेंट दिसण्यासाठी त्यात काही कीवर्ड्स वापरले जातात.
7 / 8
यू-ट्यूब चॅनल - यू-ट्यूबवर आपल्याला असंख्य व्हिडीओ पाहायला मिळतात. तुम्हीही ऑनलाईन यू-ट्यूब चॅनल सुरू करून तुम्ही उत्तम पैसे कमावू शकता.
8 / 8
ऑनलाईन ट्युटोरियल - शिकवण्याची आवड आणि विविध विषयांचा अभ्यास असेल तर तुम्ही ऑनलाईन ट्युटोरियलच्या माध्यमातून लोकांना शिकवू शकता. यामधून पैसेही कमावता येतात.
टॅग्स :businessव्यवसाय