If the shopkeeper asks for a separate bag, what will you do in shopping mall
दुकानदाराने पिशवीचे वेगळे पैसे मागितले तर, काय कराल? By ऑनलाइन लोकमत | Published: May 24, 2022 1:35 PM1 / 8दुकानात कॅरी बॅग दिली जात नाही. ग्राहकांना कापडी पिशवी दिली तर त्या पिशवीसाठी वेगळे पैसे घेतले जातात. असे वेगळे पैसे घेता येतील का ?- एक वाचक2 / 8“आम्ही ब्रेड बनवतो.. पिशव्या नाही. त्यामुळे आपल्याला पिशवीचे पैसे वेगळे द्यावे लागतील.” अशी पाटी आमच्या गावात काही वर्षांपूर्वी एका बेकरीमध्ये लावलेली होती. त्या काळात ग्राहकांच्या अधिकारांबद्दल फारशी जागृती नव्हती. 3 / 8 काळ बदलला. प्लॅस्टिकच्या पिशव्यांचा जमाना आला. पुढे त्यांच्या वापरावर बंदी आली. सहज आणि फुकटात मिळणाऱ्या प्लॅस्टिकच्या पिशव्या मिळेनाशा झाल्या. काहीजणांनी कागदी तर काहींनी कापडी पिशव्या द्यायला सुरुवात केली पण, त्याचे पैसे आकारले जाऊ लागले. त्यातूनच हा प्रश्न उभा राहिला. 4 / 8कोणताही स्पष्ट असा नियम किंवा आदेश नसल्याने ग्राहक स्वतःच्या पिशव्या बाजारात नेऊ लागले. आता ह्या सर्व अडचणीवर अखेरचा शब्द ठरू शकेल असा निवाडा केंद्रीय ग्राहक तक्रार निवारण आयोगाने दिला आहे. 5 / 8एका मोठ्या मॉलने ग्राहकांना कापडी पिशव्या द्यायला आणि त्याचे पैसे आकारायला सुरुवात केली. असे वेगळे पैसे घेत कामा नयेत असा आदेश आयोगाने दिलेला होता तरीदेखील ग्राहकांकडून पिशवीसाठी प्रत्येकी एकोणीस रुपये घेतले जायला लागले. 6 / 8एका जागरूक ग्राहकाने चंडीगडच्या ग्राहक न्यायमंचात तक्रार दाखल केली. मॉलने असे निवेदन केले की,पर्यावरणाच्या रक्षणासाठी म्हणून आम्ही कापडी पिशव्या वापरायला सुरुवात केली आहे, ग्राहकांनी त्यासाठीचा थोडा भार उचलावा म्हणून त्यांच्याकडून त्या पिशव्यांसाठीची किंमत घेतली जाते आहे. 7 / 8त्या तक्रारीची सुनावणी करून न्यायमंचाने त्या मॉलला दहा हजार रुपयांचा दंड ठोठावला. ग्राहकांनी खरेदी केलेले सामान व्यवस्थितपणे नेण्यासाठी आवश्यक पिशवी (पर्यावरण पूरक कागदी, चांगल्या दर्जाच्या प्लॅस्टिकची किंवा कापडी कॅरीबॅग) देणे ही विक्रेत्याची जबाबदारी आहे. 8 / 8त्यासाठी कोणताही जास्तीचा आकार घेणे कायद्याला मान्य नाही. ग्राहकांना एक मोठा दिलासा देणारा हा निवडा म्हणूनच महत्त्वाचा मानावा लागेल.- दिलीप फडके, ग्राहक चळवळीतील ज्येष्ठ कार्यकर्ते आणखी वाचा Subscribe to Notifications