शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

तुमच्याकडेही असेल हे कार्ड तर परत घ्या तुमचे पैसे, IRCTCने जारी केला अलर्ट

By ऑनलाइन लोकमत | Published: July 02, 2021 9:08 PM

1 / 5
आयआरसीटीसीचे एक मोबाईल पेमेंट अॅप्लिकेशनसुद्धा आहे. या अॅप्लिकेशनमधून तुम्हाला अन्य अॅप्लिकेशनच्या तुलनेत अधिक ऑफर्ससुद्धा मिळतात. आयआरसीटीच्या या अॅप्लिकेशनचे नाव आहे आयमुद्रा. आता आयआरसीटीसीने एक नोटिफिकेशन जारी केले आहे. त्यात म्हटले आहे की, जे आयमुद्रा प्रीपेड कार्ड युझर आहेत. ते आपल्या वॉलेटचे पैसे परत घेऊ शकतात. आयआरसीटीसीने या युझर्सला पैसे परत घेण्यास सांगितले आहे. आता आपण जाऊन घेऊयात की, आयआरसीटीसी ग्राहकांना रिफंड घेण्यासाठी का सांगत आहेत आणि त्याची प्रक्रिया काय आहे.
2 / 5
आयआरसीटीसीने आपल्या अधिकृत वेबसाईटवर अलर्ट जारी केला आहे. त्यात सांगितले की, आयआरसीटीसी आयमुद्रा फेडरल बँक प्रीपेड कार्ड वॉलेटला १५ फेब्रुवारी २०२१ रोजी बंद करण्यात आले आहे. अशा परिस्थितीत ज्या लोकांनी आपला रिफंड घेतलेला नाही ते रिफंड घेऊ शकतात.
3 / 5
आपला रिफंड परत घेण्यासाठी सर्वप्रथम ग्राहकांना एक मेल करावा लागेल. त्यांना ontact@federalbank.co.in या मेल आयडीवर मेल करावा लागेल.
4 / 5
यामध्ये युझर्सला आपल्या केवायसीची कागदपत्रे, मोबाईल नंबर, बँक अकाऊंट डिटेल (ज्यामध्ये पैसे क्रेडिट केले जातील) पाठवावे लागेल. त्यानंतर या कार्डमध्ये जेवढे पैसे वॉलेट होतील. ते बँक खात्यात जमा केले जातील.
5 / 5
याशिवाय सब्जेक्ट लाईनवर 'Refund For IRCTC iMudra Federak Bank wallet Cum Prepaid program' असे लिहावे.
टॅग्स :IRCTCआयआरसीटीसीIndian Railwayभारतीय रेल्वेMONEYपैसा