शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

PPF Investment Formula: पीपीएफ गुंतवणूकदार असाल तर फॉलो करा हा फॉर्म्युला, मिळू शकतात अधिक रिटर्न

By ऑनलाइन लोकमत | Published: July 22, 2023 9:45 AM

1 / 7
PPF Investment Formula: केंद्र सरकार लोकांच्या फायद्यासाठी अनेक योजना राबवत असते. त्यापैकी एक म्हणजे सार्वजनिक भविष्य निर्वाह निधी म्हणजेच पीपीएफ. लोक या गुंतवणूक योजनेत गुंतवणूक करतात आणि त्यांच्या भविष्यासाठी पैसे जमा करतात.
2 / 7
याद्वारे कोणताही धोका न पत्करता चांगला परतावा मिळू शकतो. जर तुम्ही पीपीएफमध्ये (PPF Scheme Latest Update) देखील गुंतवणूक करत असाल तर तुम्हाला त्याच्याशी संबंधित एक महत्त्वाची माहिती माहित असणे आवश्यक आहे.
3 / 7
PPF मध्ये गुंतवणूक करणाऱ्यांसाठी ५ तारखेला विशेष महत्त्व आहे. प्रत्येक महिन्याची पाच तारीख लक्षात घेऊन तुम्ही पैसे जमा केले तर तुम्हाला होणारा नफाही वाढू शकतो. केंद्र सरकारनंही याबाबत जनतेला सूचना दिली आहे.
4 / 7
तुम्ही प्रत्येक महिन्याच्या पाच तारखेला पीपीएफमध्ये गुंतवणूक केल्यास तुम्हाला त्या महिन्याच्या व्याजाचा लाभही मिळेल. उदाहरणार्थ, जर तुम्ही २० एप्रिल रोजी पैसे जमा केले तर तुम्हाला फक्त ११ महिन्यांसाठी व्याज दिलं जाईल. दुसरीकडे, जर तुम्ही ५ एप्रिलला गुंतवणूक केली तर तुम्हाला संपूर्ण १२ महिन्यांसाठी व्याजाचा लाभ मिळेल. यामध्ये जवळपास १०,६५० रुपये नफा होऊ शकतो.
5 / 7
सार्वजनिक भविष्य निर्वाह निधी खात्यात वर्षभरात जास्तीत जास्त ५ लाख रुपये जमा करता येतात. यामध्ये गुंतवणूक केल्यास दरमहा १ टक्के दरानं व्याज मिळतं.
6 / 7
पाच तारखेनंतर जमा केलेल्या पैशांवर पुढील महिन्यात व्याज मिळेल. तसंच पाच तारखेपर्यंत केलेली रक्कम त्याच महिन्याच्या व्याजात गणली जाईल. एखादी व्यक्ती केवळ एकदाच पीपीएफ खातं उघडू शकते.
7 / 7
१२ डिसेंबर २०१९ नंतर जर एखाद्या व्यक्तीनं एकापेक्षा जास्त पीपीएफ खाती उघडली असतील तर ती बंद केली जातील अशी माहिती केंद्र सरकारकडून आधीच देण्यात आली आहे. यासोबतच जमा रकमेवर कोणतंही व्याज मिळणार नाही. पीपीएफ खाती देखील मर्ज करता येत नाहीत.
टॅग्स :PPFपीपीएफInvestmentगुंतवणूक