शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

घर खरेदी करताना 'या' १० स्मार्ट टीप्स करा फॉलो; ४-५ लाख रुपये सहज वाचतील

By ऑनलाइन लोकमत | Published: September 27, 2024 1:41 PM

1 / 10
एजंटमार्फत घर खरेदी केल्यावर तो एक ते दीड टक्के कमिशन घेतो. काही एजंट घर विक्रेत्याकडूनही कमिशनही घेतात. हे सहसा १ टक्के असते. घर विकणारा हा खर्च शेवटी खरेदीदाराकडून वसूल करतो. अशा परिस्थितीत खरेदीदाराला अडीच ते तीन टक्के प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष कमिशन द्यावे लागते. थेट विकासक किंवा विक्रेत्यांकडून घर खरेदी करण्याचा प्रयत्न करा.
2 / 10
यापूर्वी घर खरेदी केलेल्या मित्रांशी किंवा शेजाऱ्यांशी चर्चा करा. ते तुम्हाला विक्रीसाठी उपलब्ध असलेल्या घरांची माहिती देऊ शकतात. यानंतर थेट घरमालकाशी संपर्क साधा.
3 / 10
मोठ्या घराच्या किंवा प्लॅटच्या मोहात पडू नका. तर तुमची गरज आणि बजेटनुसार घराची निवड करा. घर खरेदीसाठी आधी बजेट ठरवा.
4 / 10
एकाच प्रकल्पात २-४ ग्राहकांनी ग्रुपमध्ये घर विकत घेतल्यास, विकासक अतिरिक्त सवलत देऊ शकतो.
5 / 10
डेव्हलपर आणि विक्रेते सणासुदीच्या काळात घर खरेदीदारांसाठी ऑफर आणि सवलती घेऊन येतात. तुम्ही या ऑफर्सचा लाभ घेऊ शकता.
6 / 10
गृहनिर्माण प्रकल्पात मालमत्ता खरेदी करत असाल बिल्डरने कायदेशीररीत्या सर्व परवानग्या घेतल्या आहेत का? याची खात्री करा.
7 / 10
प्रॉपर्टी डील करण्यापूर्वी त्या भागातील लोकांना भेटा आणि प्रॉपर्टीच्या सरासरी दरांची माहिती घ्या. नंतर बिल्डरसोबत वाटाघाटी करा.
8 / 10
तयार घरे बांधकामाधीन घरांपेक्षा अधिक महाग असतात. तुम्ही बांधकामाधीन घरांसाठी जास्त सवलत देखील मिळवू शकता.
9 / 10
एकरकमी पैसे देऊन, विकासक कमी किमतीत घर विकतात. जास्तीत जास्त रोख पेमेंट करण्याचा प्रयत्न करा. यामुळे तुम्हाला अधिक सूट मिळण्यास मदत होईल.
10 / 10
गृहकर्ज घेण्यापूर्वी, सर्व बँकांच्या ऑफर आणि व्याजदर तपासा. तुम्हाला परवडेल अशाच बँकेची निवड करा.
टॅग्स :Homeसुंदर गृहनियोजनInvestmentगुंतवणूक