शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Mutual Fund Investment : मुलांच्या भविष्याची चिंता आहे तर, या फॉर्म्युलानं सुरू करा गुंतवणूक; १८ व्या वर्षी मूल बनेल कोट्यधीश

By ऑनलाइन लोकमत | Published: October 30, 2024 8:54 AM

1 / 9
SIP Investment Formula : भविष्याच्या दृष्टीनं गुंतवणूक ही महत्त्वाची आहे. आजकाल अनेक जण याबद्दल सतर्क झाले आहेत आणि गुंतवणूकीसही सुरुवात करत आहेत. आजकाल अनेक जण गुंतवणूकीच्या पारंपारिक पद्धतींऐवजी शेअर बाजारातील गुंतवणूकीकडे वळताना दिसतात. त्यात जोखीम जरी अधिक असली तरी मिळणारा परतावा हा अधिक असतो.
2 / 9
प्रत्येक पालकाला मुलांच्या जन्माबरोबरच त्यांच्या भवितव्याची चिंता सतावू लागते. आजकाल मुलांच्या शिक्षणापासून ते त्याच्या लग्नापर्यंत लाखो रुपये खर्च होतात. येत्या काळात हा खर्च आणखी वाढण्याची शक्यता आहे. अशा वेळी एवढ्या पैशांची व्यवस्था करणं ही मोठी जबाबदारी आहे. मात्र, मूल जन्माला येताच त्याच्या भवितव्यासाठी आर्थिक नियोजन केल्यास ही जबाबदारी तुम्ही अतिशय आरामात आणि चांगल्या प्रकारे पार पाडू शकता.
3 / 9
आज आपण आपल्या मुलांसाठी लाखो नाही, तर कोट्यवधी रुपयांचा निधी कसा तयार करू शकतो हे जाणून घेऊ. जर तुम्ही तुमच्या मुलांच्या जन्मापासूनच गुंतवणूक सुरू केली, तर १८ व्या वर्षी तुमचं मूल कोट्यधीश बनेल. तुम्हाला एका फॉर्म्युलाच्या मदतीनं म्युच्युअल फंडात गुंतवणूक करावी लागेल. याबद्दल अधिक माहिती जाणून घेऊ.
4 / 9
गुंतवणुकीचे हे सूत्र १८x१५x१२ आहे. या फॉर्म्युल्यामुळे पाल्याचा जन्म होताच म्युच्युअल फंडात गुंतवणूक सुरू करावी लागेल. तुम्ही दर महिन्याला एसआयपीच्या माध्यमातून म्युच्युअल फंडात सहज गुंतवणूक करू शकता.
5 / 9
सूत्रानुसार १८ म्हणजे वर्ष, म्हणजेच मुलांच्या जन्मापासून एसआयपी सुरू करावी लागते आणि तुमचं मूल १८ वर्षांचं होईपर्यंत सुरू ठेवावी लागेल. १५ म्हणजे १५,००० रुपयांची एसआयपी आणि १२ म्हणजे परतावा. सरासरी एसआयपी परतावा १२ टक्के मानला जातो.
6 / 9
जर तुम्ही हा फॉर्म्युला लागू केला आणि मुलांचा जन्म होताच मुलांच्या नावानं १५,००० रुपयांची मासिक एसआयपी सुरू केली आणि १८ वर्षे ती सतत चालू ठेवली तर तुम्ही १८ वर्षात एकूण ३२,४०,००० रुपयांची गुंतवणूक कराल. एसआयपीचा सरासरी परतावा १२ टक्के दराने मोजला तर या रकमेवर १८ वर्षांत ८२ लाख ४१ हजार ५८९ रुपये व्याज मिळणार आहे. अशा प्रकारे गुंतवलेली रक्कम आणि व्याज मिळून १८ वर्षांनंतर एकूण १ कोटी १४ लाख ८१ हजार ५८९ रुपये मिळतील. अशा प्रकारे तुमचं मूल १८ वर्षांचं असेल तर ते १,१४,८१,५८९ रुपयांचं मालक असेल. अशावेळी या रकमेतून तुम्ही त्याची प्रत्येक गरज सहज भागवू शकता.
7 / 9
एसआयपीमध्ये कंपाउंडिंगचा फायदा जबरदस्त आहे. एसआयपी जितकी जास्त असेल तितका कंपाउंडिंगचा फायदा जास्त होतो. त्याचा सरासरी परतावा १२ टक्के आहे, जो इतर कोणत्याही योजनेत उपलब्ध नाही. कधी कधी यापेक्षाही जास्त परतावा मिळतो. याशिवाय यात तुम्हाला रुपयाच्या किमतीचा फायदा मिळतो. यामुळे बाजारातील चढ-उताराच्या परिस्थितीतही आपला खर्च सरासरी राहतो.
8 / 9
त्याचबरोबर एसआयपीच्या माध्यमातून गुंतवणूक केल्यास गुंतवणुकीचा कालावधी आणि रकमेबाबत लवचिकता असते. आपण आपल्या सोयीनुसार मासिक, तिमाही किंवा सहामाही गुंतवणूक कालावधीचा पर्याय निवडू शकता. जेव्हा आपल्याला गरज असेल तेव्हा आपण ते थांबवू शकता आणि आपल्या एसआयपीमधून पैसे काढू शकता आणि जेव्हा आपल्याला पाहिजे तेव्हा आपली एसआयपी गुंतवणूक वाढवू शकता.
9 / 9
(टीप - यामध्ये सामान्य माहिती देण्यात आलेली आहे. शेअर बाजारातील गुंतवणूक जोखमीच्या अधीन आहे. कोणत्याही प्रकारची गुंतवणूक करण्यापूर्वी या क्षेत्रातील जाणकार किंवा तज्ज्ञांचा सल्ला घेणं आवश्यक आहे.)
टॅग्स :InvestmentगुंतवणूकMONEYपैसा