if you have taken lic policy then be careful otherwise your money will lost know why samp
तुम्हीही घेतलीये का LIC ची पॉलिसी, व्हा सावध; अन्यथा बुडतील सर्व पैसे, जाणून घ्या का? By ऑनलाइन लोकमत | Published: August 14, 2021 2:46 PM1 / 12गेल्या काही दिवसांमध्ये बनावट कॉल्स आणि सायबर क्राईमचं प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढलं आहे. अशा परिस्थितीत कोणत्याही ठिकाणी तुमची एक चूक तुम्हाला मोठा फटका बसवू शकते. 2 / 12अनेकदा बँकाही खोट्या कॉल्सपासून सावध राहण्यास ग्राहकांना सांगत असतात. आता भारतीय आयुर्विमा महामंडळानं (LIC) आपल्या ग्राहकांना सतर्क राहण्यास सांगितलं आहे.3 / 12 ग्राहकांना फसवणूकीपासून वाचवण्यासाठई एलआयसी वेळोवेळी अलर्टकरत असते. सध्या एलआयसीनुसार काही जण ग्राहकांना कॉल करून त्यांची फसवणूक करत असल्याचं समोर आलं आहे. 4 / 12काही बनावट व्यक्ती LIC अधिकारी किंवा एजन्ट अथवा विमा नियामक IRDA चे अधिकारी असल्याचं सांगत ग्राहकांची फसवणूक करत आहेत.5 / 12त्यामध्ये ते इन्शुरन्स पॉलिसी संबंधीचे फायदे अधिक प्रमाणात असल्याचं सांगत असून ते सध्या ग्राहकांकडे असलेली पॉलिसी सरंडर करण्यास ग्राहकांना मनवत असल्याचे प्रकार समोर येत आहेत. 6 / 12ग्राहकांनी कोणत्याही प्रकारची आपली खासगी माहिती किंवा अन्य प्रकारची कोणतीही माहिती फोनवर कोणालाही देऊ नये, असं सांगत एलआयसीनं आपल्या ग्राहकांना अलर्ट राहण्यास सांगितलं आहे. 7 / 12जर कोणत्याही व्यक्तीला अशाप्रकारे बनावट कॉल आले तर त्यांनी spuriouscalls@licindia.com या ईमेल आयडीवर संपर्क साधून तक्रार द्यावी, असं आवाहनही एलआयसीनं केलं आहे. 8 / 12ग्राहकांनी कोणत्याही माहित नसलेल्या नंबरवरून आलेले कॉल घेऊ नये असं एलआयसीनं जारी केलेल्या अलर्टमध्ये स्पष्ट करण्यात आलं आहे. 9 / 12तसंच आपल्या पॉलिसी संदर्भात कोणतीही माहिती हवी असल्यास ग्राहकांनी कंपनीच्या अधिकृत वेबसाईटवर जाऊन रजिस्टर करावं आणि सर्व माहिती घ्यावी असं आवाहन एलआयसीनं केलं आहे. 10 / 12याव्यतिरिक्त काही गोष्टींकडे लक्ष देण्याचं आवाहनही एलआयसीनं केलं आहे. ज्यांच्याकडे एलआयसीद्वारे देण्यात आलेलं आयकार्ड असेल किंवा ज्याच्याकडे IRDA द्वारे जारी करण्यात आलेलं लायसन्स असेल त्यांच्याकडूनच ग्राहकांनी पॉलिसी खरेदी करावी असं कंपनीनं म्हटलं आहे.11 / 12याशिवाय कोणत्याही प्रकारचे बनावट कॉल आल्यास त्याची spuriouscalls@licindia.com या ईमेल आयडीवर त्यासंदर्भात तक्रार दाखल करावी असंही त्यांनी स्पष्ट केलं आहे. 12 / 12याशिवाय ग्राहकांकडे LIC च्या वेबसाईटवर जाऊन ग्रीवांस रिड्रेसल ऑफिसरची माहिती घेऊन त्यांच्याशी संपर्क करण्याचाही पर्याय आहे. आणखी वाचा Subscribe to Notifications