If you want to become a millionaire, Know About mahogany tree farming for become a rich
करोडपती बनायचंय तर १ एकरात 'ही' झाडे लावा; खर्च कमी अन् आरोग्यासाठीही उपयोगी By ऑनलाइन लोकमत | Published: March 18, 2023 2:25 PM1 / 10श्रीमंत कसे व्हावे, कोट्यधीश कसं बनायचं, कोणता व्यवसाय फायदेशीर आहे अशा अनेक गोष्टी बरेचदा लोक गुगलवर सर्च करतात. प्रत्येकाला कमी काळात करोडपती व्हायचे असते. पण श्रीमंत होण्यासाठी कोणताही शॉर्ट कट नाही. त्यासाठी खूप मेहनत आणि संयम लागतो. 2 / 10आज आम्ही तुम्हाला एक असा व्यवसाय सांगणार आहोत, ज्यामध्ये तुम्हाला सुरुवातीला खूप मेहनत करावी लागेल आणि संयम ठेवावा लागेल त्यानंतर हा व्यवसाय तुम्हाला कोट्यधीश बनवेल. यासाठी तुमच्याकडे जमीन असायला हवी. 3 / 10या जमिनीवर तुम्हाला महोगनीची झाडे लावायची आहेत. तुमच्याकडे एक एकर जमीन असली तरी तुम्ही १२ वर्षात करोडपती होऊ शकता. चला जाणून घेऊया या झाडाचा काय उपयोग आणि त्यातून करोडपती कसे व्हायचे?4 / 10सध्या शेतीची आवड असलेले लोक शेती करून भरपूर नफा कमावत आहेत. मोठमोठ्या पदव्या घेतलेले लोकही आपला तगडा पगार सोडून नावीन्यपूर्ण शेती करत आहेत. महोगनी वृक्ष लागवड देखील अशीच आहे. महोगनीची झाडे लावून शेतकरी भरघोस नफा कमावत आहेत.5 / 10महोगनीच्या झाडात तपकिरी रंगाचे लाकूड असते. या झाडाचे लाकूड, पाने आणि बिया बाजारात महागड्या दराने विकल्या जातात. त्याची खास गोष्ट म्हणजे महोगनी वुड्स लवकर खराब होत नाहीत. या झाडाच्या लाकडाचा वापर जहाजे, प्लायवूड आणि दागिन्यांसारख्या मौल्यवान वस्तू बनवण्यासाठी केला जातो.6 / 10महोगनीच्या झाडाची आणखी एक खास गोष्ट आहे. हे झाड आरोग्यासाठी खूप चांगले आहे. हे झाड औषधी गुणधर्मांनी परिपूर्ण आहे. महोगनीच्या झाडाजवळही डास नसतात. अनेक प्रकारचे रोग डासांमुळे पसरतात आणि हे झाड डासांना दूर पळवून लावते. 7 / 10या झाडाची पाने आणि बियांचा वापर डासांपासून बचाव करणारे पदार्थ आणि कीटकनाशके बनवण्यासाठी केला जातो. या झाडाची पाने आणि बियांचे इतर अनेक उपयोग आहेत. ते पेंट्स, वार्निश, साबण आणि अनेक औषधे बनवण्यासाठी वापरले जातात. या झाडाच्या सालापासून अनेक औषधेही बनवली जातात.8 / 10महोगनी झाडे वाढवण्यासाठी सुपीक माती आवश्यक आहे. निचरा चांगला असावा. त्याची लागवड सामान्य पीएच मूल्यामध्ये केली जाते. जोरदार वारे असते तेथे ही झाडे लावू नयेत. डोंगराळ भागात त्याची लागवड होत नाही.9 / 10महोगनी झाडाला परिपक्व होण्यासाठी १२ वर्षे लागतात. पण ते ५ वर्षातून एकदा बियाणे देखील देते. एका रोपातून सुमारे ५ किलो बियाणे उपलब्ध होते. महोगनी वृक्षाचे लाकूड २००० ते २२०० रुपये प्रति फूट दराने विकले जाते. 10 / 10महोगनीचे एक झाड २० ते ३० हजार रुपयांना विकले जाते. त्याच वेळी, त्याच्या बियांची किंमत प्रति किलो १ हजार रुपये आहे. एका एकरात १२० महोगनी झाडे लावून तुम्ही १२ वर्षात करोडपती होऊ शकता. एका एकरात लागवड करण्यासाठी ४०-५० हजार रुपये खर्च येतो. आणखी वाचा Subscribe to Notifications