शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

श्रीमंत बनायचं असेल तर 'ही' ट्रिक वापरा; इतका पैसा येईल की एकाचवेळी २ प्लॅट खरेदी कराल

By ऑनलाइन लोकमत | Published: September 26, 2024 8:56 AM

1 / 10
प्रत्येकाचं स्वप्न असतं, आपल्या स्वत:चं हक्काचं घर असावं. भारतात स्वत:चं घर हा माणसांच्या भावनेचा विषय आहे. नोकरी लागल्यानंतर शहरात घर खरेदी करणं प्रत्येकाला वाटतं. आता घरखरेदीही कठीण राहिली नाही कारण होम लोन देणाऱ्या बँकांचे अनेक पर्याय आहेत. जे घराच्या किंमतीचा मोठा भाग कर्ज म्हणून देतात.
2 / 10
घरखरेदीसाठी जॉब आणि डाऊन पेमेंट झुगाड होताच होम लोन मिळते, त्यासाठी लोक नोकरी मिळताच घर खरेदी करण्याचा निर्णय घेतात. मात्र नोकरी करतानाच घर खरेदी करण्याचा निर्णय योग्य असतो का, करिअरच्या सुरुवातीलाच होम लोन घेणे योग्य पाऊल ठरेल का हे आपल्याला समजून घ्यायला हवं.
3 / 10
सहसा, जेव्हा लोक कर्ज घेऊन घर खरेदी करतात तेव्हा ते बँकांच्या ईएमआयशी जोडलेले राहतात. कारण देशातील बहुतांश लोक किमान २० वर्षांसाठी गृहकर्ज घेतात. घर विकत घेणे हा एक चांगला सौदा आहे की भाड्याने राहणे हे उदाहरणाने समजून घेऊया..
4 / 10
देशातील बहुतांश मध्यमवर्गीय कुटुंबे २ BHK फ्लॅट खरेदी करतात, विशेषतः मेट्रो शहरांमध्ये हा ट्रेंड आहे. २ BHK फ्लॅटची किंमत शहरांनुसार ठरवली जाते. जर आपण दिल्लीचे उदाहरण घेतले तर ते येथे ५० लाख रुपयांना मिळते. यासाठी सुमारे १५ टक्के रक्कम डाऊन पेमेंट करावी लागणार आहे. म्हणजे सुमारे सात ते आठ लाख रुपयांचे डाऊन पेमेंट करावे लागेल. यासोबतच मुद्रांक शुल्क, नोंदणी शुल्क आणि ब्रोकरेज स्वतंत्रपणे आकारले जातात.
5 / 10
इतकंच नाही तर नवीन घर घेतल्यानंतर लोक अनेकदा नवीन फर्निचर आणि इंटिरिअरसाठी इतर वस्तूही खरेदी करतात, ज्यावर एका अंदाजानुसार ते ४ लाख रुपये खर्च करतात. जर आपण डाउन पेमेंट आणि हे खर्च जोडले तर १२ लाख रुपयांपर्यंत घरात जाण्यापूर्वी स्वतंत्रपणे खर्च केला जातो.
6 / 10
उदाहरण समजा, जर एखाद्याने सुमारे ५० लाख रुपयांचा फ्लॅट घेण्यासाठी ७ लाख रुपयांचे डाउन पेमेंट केले आणि उर्वरित ४३ लाख रुपयांचे गृहकर्ज घेतले. सध्या क्रेडिट स्कोअर चांगला असल्यास ९% व्याजदराने गृहकर्ज उपलब्ध आहे. ९ टक्के व्याजावर २० वर्षांच्या गृहकर्जासाठी EMI ३८,६८८ रुपये लागेल. याशिवाय डाउन पेमेंट आणि इतर गोष्टींवर तुम्हाला जवळपास १२ लाख रुपये खर्च करावे लागतील.
7 / 10
आता दुसरी परिस्थिती पाहू. घर घेण्याऐवजी भाड्याने राहण्याचा निर्णय घेतला आणि जो फ्लॅट खरेदी केलाय तोच भाड्याने घेतला, तर त्याचे मासिक भाडे सुमारे १५-१७ हजार रुपये असू शकते. अशावेळी दर महिन्याला तुमच्याकडे बचत करण्यासाठी २१ हजार रुपयांपेक्षा जास्त शिल्लक राहतील. आता हा पैसा योग्य रणनीतीने गुंतवला तर कोट्यवधींचा निधी निर्माण होऊ शकतो. चांगल्या रिटर्न्ससाठी आज अनेक उत्तम गुंतवणुकीचे पर्याय उपलब्ध आहेत.
8 / 10
कमी काळात जास्त परतावा देण्याच्या दृष्टीने SIP हा एक चांगला पर्याय मानला जातो. एसआयपीमध्ये १० ते १२ टक्के परतावा मिळणे सामान्य आहे. जर तुम्ही मासिक २१ हजार रुपये गुंतवले आणि त्यावर १२% परतावा मिळाला तर तुम्हाला २० वर्षांनंतर सुमारे २.०९ कोटी रुपये मिळतील आणि २० वर्षांत तुम्ही सुमारे ५० लाख रुपयांची गुंतवणूक कराल. एसआयपीच्या बाबतीत, १५ टक्के परतावा ही मोठी गोष्ट नाही. जर तुम्हाला १५ टक्के परतावा मिळाला तर तुम्हाला २० वर्षांनंतर सुमारे ३.१८ कोटी रुपये मिळतील.
9 / 10
या मासिक EMI व्यतिरिक्त, तुमच्याकडे गुंतवणुकीसाठी १२ लाख रुपयांची एकरकमी रक्कम देखील आहे, जी तुम्ही तुमच्या खिशातून डाऊन पेमेंटपासून ते कागदोपत्री सर्व गोष्टींवर खर्च करणार होता. तुम्ही हे १२ लाख रुपये कुठेतरी एकरकमी गुंतवलेत तर २० वर्षांनंतर तीही मोठी रक्कम होईल. ही गुंतवणूक २० वर्षांत अंदाजे १.१५ कोटी रुपये वार्षिक १२ टक्के दराने आणि १५ टक्के दराने १.९६ कोटी रुपये होतील.
10 / 10
भाड्याने राहत असताना ईएमआयचे पैसे गुंतवून तुम्ही करोडपती बनू शकता. कारण पहिल्या परिस्थितीत म्हणजे भाड्याने राहून तुम्ही २५ वर्षांत ५ कोटी रुपयांपेक्षा जास्त निधी जमा करू शकता. हे १५ टक्के परताव्यानुसार आहे. जर तुम्हाला १२% परतावा मिळाला तर २० वर्षांनंतर तुमच्याकडे ३.२५ कोटी रुपये असतील. आज तुम्ही गृहकर्ज घेऊन ५० लाख रुपयांना खरेदी करत असलेल्या फ्लॅटची किंमत २० वर्षांनंतर सुमारे २.३३ कोटी रुपये असू शकते पण त्याच वेळी जुन्या घराची किंमतही कमी होते अशाप्रकारे, घर घेण्याऐवजी ते भाड्याने राहून गुंतवणूक करणे फायदेशीर ठरू शकते आणि २० वर्षांनंतर तुम्ही त्याच गुंतवणुकीच्या रकमेसह सध्याच्या किमतीत २ घरे सहज खरेदी करू शकता.
टॅग्स :bankबँकHomeसुंदर गृहनियोजनInvestmentगुंतवणूक