Important news for millions of SBI customers! Big change made by the bank, a blow to the pocket
SBIच्या कोट्यवधी ग्राहकांसाठी महत्वाची बातमी! बँकेनं केला मोठा बदल, खिशाला बसणार फटका By ऑनलाइन लोकमत | Published: February 01, 2022 7:22 PM1 / 9स्टेट बँक ऑफ इंडिया (SBI) मध्ये खाते असलेल्या कोट्यवधी ग्राहकांसाठी मोठी बातमी आहे. जर आपलेही एसबीआयमध्ये खाते (SBI customer) असेल, तर आजपासून म्हणजेच 1 फेब्रुवारीपासून बँकेने मोठा बदल केला आहे. यानुसार, ग्राहकांना आता ऑनलाइन Transaction (Online transaction)साठी अधिकचे पैसे मोजावे लागणार आहेत.2 / 9SBI ने आजपासून IMPS व्यवहारासाठी आणखी एक नवा स्लॅब जोडला आहे. याचा परिणाम थेट ऑनलाइन व्यवहार करणाऱ्या ग्राहकांवर होणार आहे. बँकेने सर्व ग्राहकांना याची माहितीही दिली आहे.3 / 9बँकेने दिलेल्या माहितीनुसार, हा नवा स्लॅब 2 ते 5 लाखांपर्यंतचा असेल. आपण IMPS द्वारे 2 लाख ते 5 लाख रुपयांचा व्यवहार केल्यास, पैसे पाठवणाऱ्या ग्राहकाला 20 रुपये प्लस GST भरावा लागेल.4 / 9IMPS सेवेच्या माध्यमाने ग्राहक ऑनलाइन पैसे ट्रान्सफर करू शकतात. या सेवेचा लाभ 24 तास आणि 7 ही दिवस घेता योतो. बँक शाखांमधून करण्यात येणाऱ्या व्यवहारांसाठी, 1,000 ते 10,000 रुपयांदरम्यानच्या व्यवहारांवर 2 रुपये + GST द्यावा लागेल.5 / 9याशिवाय, 10,000 ते 1,00,000 रुपयांपर्यंतच्या IMPS वर 4 रुपये + GST आणि 1 लाख ते 2 लाख रुपयांच्या IMPS वर 12 रुपये + GST द्यावा लागतो. 6 / 9डिजिटल बँकिंगला प्रोत्साहन देण्यासाठी एसबीआयने हा निर्णय घेतला आहे. यापूर्वी, 2 लाख रुपयांपर्यंतच्या IMPS व्यवहारांसाठी कोणत्याही प्रकारचे सेवा शुल्क आकारले जात नव्हते.7 / 9ऑनलाइन बँकिंग प्रणालीद्वारे आपण कुठेही पैसे पाठवू शकता. ग्राहक IMPS, NEFT, RTGS द्वारे पैसे ट्रान्सफर करू शकतात. महत्वाचे म्हणजे NEFT आणि RTGS सुविधा वेळेनुसार उपलब्ध असेल.8 / 9RBI ने ऑक्टोबर महिन्यात IMPS व्यवहारांची मर्यादा वाढवली होती. सरकारने अशा व्यवहारांची मर्यादा 5 लाखांपर्यंत वाढवली होती. म्हणजेच तुम्ही एका दिवसात 5 लाख रुपयांपर्यंत व्यवहार करू शकाल. यापूर्वी ही मर्यादा 2 लाख रुपये होती.9 / 9एसबीआयने म्हटले आहे की, डिजिटल बँकिंगला प्रोत्साहन देण्यासाठी, आता बँक इंटरनेट बँकिंग आणि YONO सह मोबाइल बँकिंगद्वारे केलेल्या 5 लाख रुपयांपर्यंतच्या ऑनलाइन IMPS व्यवहारांवर कोणत्याही प्रकारचे सेवा शुल्क आकारले जाणार नाही. आणखी वाचा Subscribe to Notifications