शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

LIC Policy असलेल्यांसाठी महत्त्वाची बातमी; IPO हवा असेल तर त्वरित करा हे काम

By ऑनलाइन लोकमत | Published: February 03, 2022 2:36 PM

1 / 10
भारतीय आयुर्विमा महामंडळाचा (LIC) ची मेगा इनिशियल पब्लिक ऑफरिंग (IPO) लवकरच येणार आहे. LIC पुढील आठवड्यात बाजार नियामक SEBI कडे IPO साठी कागदपत्रांचा मसुदा दाखल करू शकते अशी माहिती समोर आली आहे.
2 / 10
सेबीच्या मंजुरीनंतर कंपनीचा आयपीओ मार्चमध्ये येणे अपेक्षित आहे. अशा परिस्थितीत, देशातील सर्वात मोठ्या विमा कंपनीच्या पॉलिसीधारकांना LIC IPO मधून कमाई करण्याची प्रचंड मोठी संधी आहे. यासाठी तुमच्याकडे दोन गोष्टी असणं महत्त्वाचं आहे. त्यातील पहिली म्हणजे तुमच्या LIC पॉलिसी खात्याशी पॅन जोडलेला असणे अनिवार्य आहे आणि दुसरे म्हणजे डीमॅट खाते.
3 / 10
LIC IPO मध्ये इश्यू साईजच्या १० टक्के पॉलिसीधारकांसाठी राखीव असेल. म्हणजेच, जर तुमच्याकडे भारतीय आयुर्विमा महामंडळाची पॉलिसी असेल, तर त्याच्या IPO मध्ये तुमच्यासाठी राखीव कोटा असेल.
4 / 10
परंतु तुम्ही पॅन आणि डीमॅट खाते अपडेट केले असल्यासच तुम्ही या मेगा IPO मध्ये सहभागी होऊ शकता. दरम्यान, एलआयसीच्या आयपीओची क्रेझही मोठी असून अनेक जण आयपीओसाठी एलआयसीची पॉलिसी खरेदी करत असल्याचंही समजत आहे.
5 / 10
एलआयसीचा आयपीओ कधी येणार आणि त्यात पैसे गुंतवून कधी मालामाल होणार अशी अवस्था अनेकांची झाली आहे.
6 / 10
पेटीएमसारख्या कंपनीचा आयपीओ फुसका बार निघाल्यानंतर जगातील सर्वात मोठ्या कंपन्यांपैकी एक असलेल्या एलआयसीचा आयपीओ देखील गुंतवणूकदारांना खुणावत आहे. पण केंद्रीय अर्थसंकल्प सादर झाल्याच्या दुसऱ्याच दिवशी निर्गुंतवणुकीबाबतची मोठी माहिती समोर आली आहे.
7 / 10
केंद्र सरकारनं अर्थसंकल्पात निर्गुंतवणुकीचं लक्ष्य निम्म्यापेक्षाही कमी केलं आहे. आता चालू आर्थिक वर्षात २०२२-२३ मध्ये निर्गुंतवणुकीचं लक्ष्य १.७५ लाख कोटींवरुन थेट ७८ लाख कोटी रुपये इतकं करण्यात आलं आहे.
8 / 10
'ईटी नाऊ'च्या एका रिपोर्टनुसार सरकार संपूर्ण एलआयसी कंपनीपैकी केवळ ५ टक्के समभागाची विक्रीचा प्रस्ताव ठेण्याची शक्यता आहे. सरकारचा या मोबदल्यात ६५ हजार ते ७५ हजार कोटी रुपये जमा करण्याचा इरादा आहे.
9 / 10
एलआयसीचा आयपीओ ८० हजार ते १ लाख कोटी रुपयांपर्यंतचा असू शकतो अशी शक्यता याआधी वर्तविण्यात आली होती. सरकारनं या आयपीओच्या माध्यमातून एलआयसीची १० टक्के भागीदारी विकण्याची तयारी केली होती. गेल्या अर्थसंकल्पात याच आयपीओला डोळ्यासमोर ठेवून १.७५ लाख कोटी रुपये निर्गुंतवणुकीचं लक्ष्य ठेवलं होतं. पण त्यात आता निम्म्याहून घट करण्यात आली आहे.
10 / 10
एलआयसीच्या आयपीओसाठी पॅन लिंक करण्यासाठी https://licindia.in/ वर जावं लागेल. यानंतर ऑनलाइन पॅन रजिस्ट्रेशनचा पर्याय निवडा. त्यानंतर ऑनलाइन पेजवर क्लिक करा. याच पेजवर प्रोसिडचं बटनवर क्लिक करा. यानंतर तुमचा ईमेल, पत्ता, पॅन, मोबाइल नंबर आणि एलआयसी पॉलिसी नंबरची माहिती भरा. बॉक्समध्ये कॅप्चा कोड टाका. त्यानंतर तुमच्या मोबाईलवर एक ओटीपी येईल तो भरुन सबमिट करा. त्यानंतर तुम्हाला रजिस्ट्रेशन झाल्याचा मेसेज येईल.
टॅग्स :LIC - Life Insurance CorporationएलआयसीIPOइनिशिअल पब्लिक ऑफरिंगInvestmentगुंतवणूक