गुगल ड्राईव्ह, अॅमेझॉनपासून डीस्नी+हॉटस्टारपर्यंत १ सप्टेंबरपासून बदलणार हे पाच नियम, होणार असा परिणाम By ऑनलाइन लोकमत | Published: August 26, 2021 10:09 AM
1 / 6 जर तुम्ही मोबाईल युझर्स आहात आणि मोबाईलवर ओटीटी प्लॅटफॉर्म वापरत असाल. अॅमेझॉन, गुगल, गुगल ड्राईव्ह यासारख्या सेवांचा लाभ घेत असाल तर तुमच्यासाठी महत्त्वाची बातमी आहे. या सेवांसंबंधीचे महत्त्वाचे नियम येत्या सप्टेंबर महिन्यापासून बदलणार आहेत. मोबाईल युझर्ससाठी १ सप्टेंबरनंतर बदलणाऱ्या नियमांचा घेतलेला हा आढावा. 2 / 6 गुगलचे नवे धोरण १ सप्टेंबरपासून लागू होणार आहे. त्याअंतर्गत चुकीच्या आणि बनावट कंटेंटला प्रमोट करणाऱ्या अॅपवर १ सप्टेंबरपासून निर्बंध लागू होती. गुगलने आपल्या पोस्टमध्ये सांगितले की, अॅप डेव्हलपर्सकडून दीर्घकाळापर्यंत वापरण्यात न आलेल्या अॅपना ब्लॉक करण्यात येईल. गुगलकडून गुगल प्ले स्टोअर्सच्या नियमांना आधीपेक्षा अधिक कठोर बनवण्यात येत आहे. 3 / 6 १ सप्टेंबरपासून भारतामध्ये ओटीटी प्लॅटफॉर्म डिस्नी+हॉटस्टारचे सब्स्क्रिप्शन महाग होणार आहे. युझर्सला या सब्स्क्रिप्शनच्या बेस प्लॅनसाठी ३९९ रुपयांऐवजी ४९९ रुपये मोजावे लागणार आहेत. याचाच अर्थ युझर्सला १०० रुपये अतिरिक्त द्यावे लागतील. तर ८९९ रुपयांमध्ये ग्राहकांना दोन फोनमध्ये डिस्नी+हॉटस्टार अॅप सुरू करता येईल. तसेच या सब्स्क्रिप्शन प्लॅनमध्ये एचडी क्वालिटी मिळेल. १४९९ रुपयांमध्ये ४ स्क्रीनवर हे अॅप चालवता येईल. 4 / 6 १ सप्टेंबरपासून अॅमेझॉनवरून सामान मागवणे महागणार आहे. कंपनी डिझेल आणि पेट्रोलच्या किमतींमध्ये वाढ झाल्याने लॉजिस्टिक कॉस्टमध्ये वाढ करू शकते. अशा परिस्थितीत ५०० ग्रॅमच्या पॅकेजसाठी ५८ रुपये द्यावे लागतील. रीजनल कॉस्ट ३६.५० रुपये असेल. 5 / 6 गुगल युझर्सला पुढच्या १३ सप्टेंबरला नवा सिक्युरिटी अपडेट मिळेल. त्यामधून गुगल ड्राईव्हचा वापर आधीच्या पेक्षा अधिक सुरक्षित होणार आहे. 6 / 6 गुगल प्ले स्टोअसाठी १५ सप्टेंबर २०२१ पासून नवे नियम लागू होत आहेत. त्याअंतर्गत १५ सप्टेंबरपासून अशा शॉर्ट पर्सनल लोन अॅपला भारतामध्ये बॅन करण्यात येईल जी लोनच्या नावावर फसवणूक करतात. तसेच लोन घेणाऱ्यांना त्रस्त करतात. अशा सुमारे १०० शॉर्ट लोन अॅपबाबत तक्रार करण्यात आली आहे. त्यानंतर गुगलकडून अशा अॅप्ससाठी नवे नियम लागू करण्यात आले आहेत. नव्या नियमांनंतर अॅप डेव्हलपर्सला शॉर्ट लोन अॅपबाबत अधिक कागदपत्रे द्यावी लागतील. आणखी वाचा