शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

अलर्ट! ...म्हणून आज SBI युजर्स नाही करू शकणार UPI Payment; बँकेने दिला 'हा' मोलाचा सल्ला

By ऑनलाइन लोकमत | Published: March 14, 2021 8:59 AM

1 / 10
सध्याच्या काळात डिजिटल पेमेंट करण्याकडे सर्वांचा अधिक कल असून त्याचा वेगाने वापर केला जात आहे. विशेषत: कोरोना काळात, यूपीआय (UPI Transaction) च्या माध्यमातून एका शहरातून दुसऱ्या गावात व्यवहार वाढले आहेत.
2 / 10
यूपीआय पेमेंट (UPI Payment) हे आधी फक्त मोठ्या दुकानांपुरते मर्यादित होते, ते आता लहान दुकानांमध्ये, चहाचे दुकान आणि पाणीपुरीपर्यंतही पोहोचले आहे. जवळजवळ प्रत्येक बँकेचे ग्राहक यूपीआय पेमेंटचा वापर करतात.
3 / 10
एसबीआय म्हणजेच स्टेट बँक ऑफ इंडियाच्या ग्राहकांसाठी आता एक महत्त्वाची बातमी आहे. SBI ने ग्राहकांना अलर्ट केलं आहे. 14 मार्चला म्हणजेच आज ग्राहक यूपीआय पेमेंट करू शकणार नाही.
4 / 10
यूपीआय पेमेंट करण्यात एसबीआय युजर्सना (SBI Users) अडचण येऊ शकते. देशातील या मोठ्या सरकारी बँक स्टेट बँक ऑफ इंडियाने (एसबीआय) आपल्या ट्विटर अकाऊंटवरुन याबाबत माहिती दिली आहे.
5 / 10
एसबीआयने ट्विट केलेल्या माहितीनुसार, 14 मार्च रोजी ग्राहकांच्या चांगल्या सोयीसाठी बँक आपलं यूपीआय प्लॅटफॉर्म अपग्रेड करत आहे. 14 मार्च रोजी झालेल्या अपग्रेडमुळे एसबीआय ग्राहकांना बँकेचा यूपीआय प्लॅटफॉर्म वापरण्यास अडचणी येऊ शकतात असं म्हटलं आहे. तसेच यावर बँकेने पर्यायही सांगितले आहेत.
6 / 10
एसबीआय Yono App, Yono Lite App, नेट बँकिंग (SBI Net banking) किंवा एटीएम (ATM) वापरू शकतात अशीही माहिती बँकेने दिली आहे. अपग्रेडमुळे तुम्हाला यूपीआय सेवा वापरण्यात अडचण येत असल्यास तुम्ही या सेवा वापरू शकता.
7 / 10
युनायटेड फोरम ऑफ बँक युनियनने (UFBU) दोन दिवसांचा संप पुकारला आहे. संपामुळे 15 आणि 16 मार्च रोजी बँकेच्या शाखा पूर्णपणे बंद राहिल्यास बँक शाखांचे कामकाज ठप्प होईल. स्टेट बँक ऑफ इंडियाने (SBI) या संपामुळे बँकेच्या कामावर परिणाम होऊ शकेल असं म्हटलं आहे.
8 / 10
संपाचा परिणाम होणार असला तरी पेमेंटसाठी किंवा पैशांचे काही व्यवहार करण्यासाठी तुमच्याकडे मोबाईल आणि इंटरनेट बँकिंगसारख्या सेवा आहेत असं देखील म्हटलं आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.
9 / 10
देशातील सर्वात मोठी बँक असणाऱ्या एसबीआयने (State Bank of India) आपल्या ग्राहकांसाठी खास नवीन योजना आणली आहे. यामध्ये पर्सनल लोनसाठी (Personal Loan) हवं असणाऱ्या लोकांना मोठा लाभ मिळणार आहे. यासाठी बँकेमध्ये जाण्याची गरज नाही तर फक्त एका मिस कॉलने तुमचं काम सोपं होणार असून तुम्हाला पर्सनल लोन मिळणार आहे.
10 / 10
एसबीआयने आपल्या ऑफिशिअल ट्विटर अकाऊंटवरून ट्वीट करून याबाबत माहिती दिली आहे. पर्सनल लोन मिळवण्यासाठी तुम्हाला केवळ 7208933142 या क्रमांकावर फक्त एक मिसकॉल द्यायचा आहे. त्यानंतर बँक तुम्हाला लगेचच फोन करून याबाबत नेमकी माहिती देईल.
टॅग्स :SBIएसबीआयbankबँकMONEYपैसाtechnologyतंत्रज्ञान