शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

१ जूनपासून बदलले महत्त्वाचे नियम, थेट तुमच्या जगण्याशी आहे संबंध!

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 2, 2024 12:02 IST

1 / 6
मुंबई/ नवी दिल्ली : जून महिन्यात सर्वांना मान्सूनचे वेध लागलेले असताना नवा महिना सुरू होताच अनेक गोष्टींसंदर्भातील नियम बदलले आहेत. त्याचा सर्वांच्या दैनंदिन आयुष्यावर परिणाम होईल. काय आहेत हे बदल? जाणून घेऊया. 
2 / 6
आयकर खात्याने आधार-पॅन जोडणी ३१ मेपर्यंत बंधनकारक केली होती. १ जूनपासून दुप्पट दराने टीडीएस कापण्यात येणार आहे. यापूर्वी अनेकदा यासाठी मुदतवाढ देण्यात आली होती, यंदा मात्र मुदतवाढ दिलेली नाही. त्यामुळे आधार आणि पॅन जोडणी केली नसल्यास या महिन्यात करून घेणे क्रमप्राप्त ठरणार आहे. 
3 / 6
वाहनचालक परवान्याशी संबंधित नियमांत बदल करण्यात आले आहेत. इच्छुक वाहनचालकांना परवाना घेण्यासाठी वाहनचालक चाचणी आता ड्रायव्हिंग प्रशिक्षण केंद्रांवरही देता येणार आहे. आरटीओमध्ये चाचणीसाठी जाण्याची गरज नाही. ज्या केंद्रांना आरटीओने मान्यता दिली आहे, तेच ही चाचणी घेऊ शकतील. याचा सर्वसामान्यांना फायदा होणार आहे.
4 / 6
१८ वर्षांपेक्षा कमी वयाच्या अल्पवयीनाने गाडी चालविल्यास २५ हजार रुपयांपर्यंत दंड होऊ शकतो. तसेच अशा वाहनमालकाचादेखील वाहनचालक परवाना रद्द होऊ शकतो. तसेच संबंधित अल्पवयीन चालकाला २५ वर्षांचे वय होईपर्यंत परवाना मिळणार नाही. अतिवेगात वाहन चालविल्यास यापुढे २ हजार रुपये, विनापरवाना वाहन चालविल्यास ५०० रुपये दंड होईल.
5 / 6
प्रत्येक महिन्याच्या पहिल्या दिवशी तेल कंपन्या गॅस आणि पेट्रोलियम उत्पादनांच्या किमतींचा आढावा घेऊन बदल जाहीर करतात. १ मे रोजी कंपन्यांनी व्यावसायिक गॅस सिलिंडरचे दर कमी केले होते. यावेळीदेखील किंमतीत बदल होऊ शकतो. याशिवाय घरगुती गॅसची किंमत तसेच पेट्रोल आणि डिझेलचे दर कमी होतात का, याकडे सर्वांचे लक्ष आहे.
6 / 6

टॅग्स :businessव्यवसायPetrolपेट्रोलAdhar Cardआधार कार्डTaxकर