In which case should you choose the option of Home Loan Balance Transfer, what are the benefits?
कोणत्या स्थितीत निवडायला हवा Home Loan Balance Transfer चा पर्याय, काय आहेत फायदे? By ऑनलाइन लोकमत | Published: June 24, 2024 12:15 PM1 / 8आजच्या काळात बहुतांश लोक कर्ज घेऊन घरं खरेदी करतात. पण कालांतरानं गृहकर्जाचा व्याजदर जसजसा वाढत जातो तसतसा तुमचा ईएमआयचा बोजाही वाढतो. अशा तऱ्हेनं कर्ज घेणारी व्यक्ती ईएमआयच्या जाळ्यात अडकते. 2 / 8पण जर तुम्हाला वाटत असेल की तुमची बँक इतर बँकांपेक्षा जास्त व्याज आकारत आहे, तर तुम्ही तुमचं कर्ज त्याच बँकेत सुरू ठेवावं असं नाही. तुम्ही तुमचं होम लोन दुसऱ्या बँकेत ट्रान्सफर करू शकता. होम लोन बॅलन्स ट्रान्सफरला (Home Loan Balance Transfer) होम लोन रिफायनान्सिंग असंही म्हणतात.3 / 8होम लोन रिफायनान्समध्ये (Home Loan Refinancing) कमी व्याजदरासारख्या अटींसह नवीन कर्ज घेतलं जातं आणि जुनं कर्ज बंद केलं जातं. अशावेळी तुम्ही तुमच्या ईएमआयचा बोजा कमी करू शकता. कमी व्याजदरानं कर्ज मिळाल्यामुळे तुमचा ईएमआय कमी होतो. याशिवाय कर्जाच्या पुनर्रचनेची संधीही मिळते. नवीन कर्ज घेताना तुम्ही स्वत:नुसार ईएमआयचा कालावधी कमी किंवा वाढवू शकता.4 / 8लोन फायनान्सिंगचा पहिला अर्धा हिस्सा संपण्यापूर्वी रिफायनान्सचा पर्याय निवडला तर तो तुमच्यासाठी फायदेशीर ठरू शकतो. याचं कारण म्हणजे त्यावेळी ईएमआयमधील व्याजाचा वाटा जास्त असतो. अशावेळी कमी व्याजानं घेतलेलं नवं कर्ज तुमच्यासाठी खूप दिलासादायक ठरू शकतं.5 / 8लोन रिफायनान्सिंगचा फायदा तेव्हाच होतो जेव्हा तुम्ही सध्याच्या काळातील उच्च व्याजदर भरण्यास सक्षम नसाल आणि तुम्हाला कमी व्याजदरानं नवीन कर्ज मिळालं असेल. जर तुम्ही ठराविक व्याजदरानं कर्ज घेतलं असेल, पण काही काळानंतर व्याजदर कमी होऊ लागले. पण तुम्हाला नवे व्याजदर हवे असतील, पण या परिस्थितीत तुमची बँक तुम्हाला फ्लोटिंग रेट लोनचा पर्याय द्यायला तयार नसेल तर तुम्ही कर्जाचं रिफायनान्स करू शकता.6 / 8जर तुमची आर्थिक स्थिती पूर्वीपेक्षा चांगली असेल आणि तुम्हाला कर्जाचा कालावधी कमी करायचा असेल तर तुम्ही कर्जाचे रिफायनान्स करून अल्पावधीत नवीन कर्जाची परतफेड करू शकता. जर तुमच्यावर ईएमआयचा बोजा खूप जास्त असेल आणि तुम्हाला पुन्हा रिस्ट्रक्चरिंग करून ईएमआय कमी करायचा असेल, तरी हा पर्याय निवडता येईल. 7 / 8लोन घेतल्यानंतर तुम्हाला घराच्या इंटिरिअरसाठी वगैरेसाठी जास्त रकमेची गरज असते, मग काही वर्षांनी तुम्ही कमी व्याजदरानं बँकेत नवीन कर्ज सुरू करू शकता आणि नवीन कर्ज म्हणून जास्त रक्कम घेऊ शकता. जर तुम्हाला वाटत असेल की तुम्हाला चांगला लेंडर मिळालेला नाही आणि त्याच्याकडून तुम्हाला चांगल्या सुविधा मिळत नाहीत, तर तुम्ही कर्जाचं रिफायनान्स करू शकता.8 / 8बॅलन्स ट्रान्सफरसाठी तुम्हाला तुमच्या सध्याच्या बँकेला फोरक्लोजर फी आणि लोन ट्रान्सफर चार्जेस द्यावे लागतील. याशिवाय ज्या नवीन बँकेत तुम्ही तुमचं लोन ट्रान्सफर करत आहात, तिथे तुम्हाला स्टॅम्प ड्युटीसह लोन प्रोसेसिंग फी आणि इतर फी भरावी लागू शकते. अशी फी सहसा नवीन पर्सनल लोनसाठी अर्ज करताना आकारली जाते. आणखी वाचा Subscribe to Notifications