शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

कोणत्या शेअर्समध्ये झुनझुनवालांची सर्वाधिक गुंतवणूक, आता कशी आहे स्थिती? तुमच्याकडे आहे का?

By ऑनलाइन लोकमत | Published: November 04, 2024 8:56 AM

1 / 8
Rekha Jhunjhunwala Portfolio : ज्येष्ठ गुंतवणूकदार राकेश झुनझुनवाला यांच्या पत्नी रेखा झुनझुनवाला यांच्याकडे २०२४ मध्ये सुमारे ४०,७०९ कोटी रुपयांचा पोर्टफोलिओ आहे, ज्यामुळे त्या देशातील आघाडीच्या गुंतवणूकदारांपैकी एक बनल्या आहेत. अलीकडेच त्यांनी टाटा मोटर्स लिमिटेडमधील आपला हिस्सा ०.०२ टक्क्यांनी वाढवला आहे.
2 / 8
तर दुसरीकडे अॅपटेक लिमिटेडमधील आपले शेअर्स विकून आपला हिस्सा २.३१ टक्क्यांनी कमी केला आहे. रेखा झुनझुनवाला यांच्या या मजबूत गुंतवणूक पोर्टफोलिओकडे पाहून इतर गुंतवणूकदारही आपला गुंतवणूक पोर्टफोलिओ बदलण्याची किंवा तयार करण्याची योजना आखत असतात. रेखा झुनझुनवाला यांच्या टॉप ५ गुंतवणुकीत काही प्रमुख कंपन्यांच्या शेअर्सचा समावेश आहे. पाहूया त्यांच्या पोर्टफोलिओमध्ये कोणत्या शेअर्सचा समावेश आहे.
3 / 8
टायटन - रेखा झुनझुनवाला यांची सर्वात मोठी गुंतवणूक टायटन कंपनीत आहे, ज्यामध्ये त्यांनी सुमारे १५,०५६ कोटी रुपयांची गुंतवणूक केलीये. त्यांच्याकडे टायटनचे सुमारे ४५,७१३,४७० शेअर्स आहेत, ज्यामध्ये ०.२ टक्क्यांची घसरण आली आहे. टायटनच्या शेअर्समध्ये २०२४ मध्ये आतापर्यंत १०.२६ टक्क्यांची घसरण झालीये.
4 / 8
टाटा मोटर्स - त्यांची टाटा मोटर्समध्ये सुमारे ४,०२९ कोटी रुपयांची गुंतवणूक आहे, हा त्यांचा १.३% हिस्सा दर्शवतो. कंपनीतील त्यांच्या भागीदारीत कोणताही बदल झालेला नाही. टाटा मोटर्सच्या शेअर्सनं यंदा ६.६४ टक्के परतावा दिला आहे.
5 / 8
एनसीसी लिमिटेड - झुनझुनवाला यांनी एनसीसी लिमिटेडमध्ये सुमारे २,४४८ कोटी रुपयांची गुंतवणूक केली आहे. त्यांच्याकडे कंपनीचे ७८,३३३,२६६ शेअर्स आहेत. हा एकूण १२.५% हिस्सा आहे. एनसीसीचे शेअर्स २०२४ मध्ये आतापर्यंत ८७.९३ टक्क्यांनी वधारले आहेत.
6 / 8
मेट्रो ब्रँड्स - आर्थिक वर्ष २०२५ च्या दुसऱ्या तिमाहीपर्यंत त्यांनी मेट्रो ब्रँड्समध्ये ३,१०२.९ कोटी रुपयांची गुंतवणूक केली आहे. कंपनीत त्यांचा ९.६ टक्के हिस्सा आहे. मेट्रो ब्रँड्सच्या शेअर्समध्ये यंदा ४.८२ टक्क्यांची घसरण झालीये.
7 / 8
क्रिसिल लिमिटेड - रेखा झुनझुनवाला यांची क्रिसिल लिमिटेडमधील गुंतवणूक अंदाजे २,०७५ कोटी रुपये आहे. त्यांनी यातील आपला ०.२% हिस्सा कमी केलाय. क्रिसिलच्या शेअर्सनं या वर्षी २७.६२ टक्के परतावा दिला असून त्याची शेवटची किंमत ५,४५० रुपये प्रति शेअरच्या जवळपास आहे.
8 / 8
(टीप : यामध्ये केवळ सामान्य माहिती देण्यात आलेली आहे. हा गुंतवणूकीचा सल्ला नाही. कोणत्याही प्रकारची गुंतवणूक करण्यापूर्वी या क्षेत्रातील जाणकार किंवा तज्ज्ञांचा सल्ला घेणं आवश्यक आहे.)
टॅग्स :Rekha Jhunjhunwalaरेखा झुनझुनवालाRakesh Jhunjhunwalaराकेश झुनझुनवालाshare marketशेअर बाजारInvestmentगुंतवणूक