Income Tax Confusion between new and old tax regime union budget 2023 updates nirmala sitharaman
Income Tax : नव्या आणि जुन्या टॅक्स सिस्टमध्ये कनफ्युजन आहे? ७ लाखांवर आहे खरा झोल, जाणून घ्या By ऑनलाइन लोकमत | Published: February 01, 2023 2:18 PM1 / 8अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी अर्थसंकल्पात (Budget 2023) पगारदार लोकांसाठी टॅक्स स्लॅबमध्ये बदलांसह मोठ्या टॅक्स सवलतीची घोषणा केली आहे. आता 7 लाखांपर्यंत कोणताही कर भरावा लागणार नाही. मात्र, नव्या करप्रणालीत एक पेच आहे. 2 / 87 लाखांपर्यंत उत्पन्न होईपर्यंत कर भरायचा नाही, मात्र त्यानंतरच्या रकमेबाबत संभ्रम आहे. वास्तविक, अर्थमंत्र्यांनी आपल्या भाषणात स्पष्टपणे सांगितले की, नवीन कर प्रणालीत 7 लाखांपर्यंत कोणताही कर आकारला जाणार नाही. पण त्यांनीही जुनी करप्रणाली लागू ठेवली आहे.3 / 8आतापर्यंत जुन्या आणि नव्या टॅक्स व्यवस्थेत 5 लाखांपर्यंत कोणताही टॅक्स द्यावाला लागत नव्हता. परंतु नव्या टॅक्स व्यवस्थेत ही सूट 5 लाखांवरून वाढवून सात लाख करण्यात आली आहे. 4 / 8नव्या टॅक्स व्यवस्थेत 7 लाखांपर्यंत उत्पन्न असलेल्या लोकांना शून्य टॅक्स द्यावा लागेल. परंतु यासोबतच त्यांनी जुन्या टॅक्स व्यवस्थेतही बदल करण्याची घोषणा केली आहे. जुन्या टॅक्स व्यवस्थेत 2.5 लाखांची सूट वाढवून ती 3 लाख करण्यात आली आहे. 5 / 8नक्की झोल कुठे? - आता नवी टॅक्स व्यवस्थाच बाय डिफॉल्ट इन्कम टॅक्स भरताना तुमच्या समोर येईल. परंतु करदात्यांना जुनी अथवा नवी टॅक्स व्यवस्था निवडण्याची मुभा असेल. यासोबतच अर्थमंत्र्यांनी इन्कम टॅक्सचे 7 स्लॅब्स कमी केले आहेत. परंतु नव्या टॅक्स व्यवस्थेअंतर्गत तुम्हाला 80C अंतर्गत मिळणाऱ्या सवलतीचा लाभ मिळणार नाही.6 / 8नवा टॅक्स स्लॅब - 0 ते 3 लाख रुपयांपर्यंतचे उत्पन्न 0 टक्के कर 3 ते 6 लाख रुपयांपर्यंतचे उत्पन्न 5 टक्के कर 6 ते 10 लाख रुपयांपर्यंतचे उत्पन्न 10 टक्के कर 9 ते 12 लाख रुपयांपर्यंतचे उत्पन्न 15 टक्के कर 12 ते 15 लाख रुपयांपर्यंतचे उत्पन्न 20 टक्के कर 15 लाख रुपय़ांवरील उत्पन्नावर 30 टक्के कर आकारण्यात येणार आहे. 7 / 8काय आहे समीकरण? - नव्या टॅक्स स्लॅबनुसार ज्यांचं उत्पन्न 7 लाखांपर्यंत आहे, त्यांना कोणताही टॅक्स द्यावा लागणार नाही. परंतु जर तुमचं उत्पन्न सात लाखांपेक्षा 1 रुपयाही जास्त असेल तर तुम्हाला 3 लाखांपर्यंत टॅक्स लागणार नाही. उर्वरित 4 लाखांसाठी 5 टक्के टॅक्स द्यावा लागेल. याचा अर्थ तुम्ही पहिल्या टॅक्स स्लॅबमध्ये याल. 8 / 8जर तुमचं उत्पन्न 7 लाखांपेक्षा जास्त असेल तर तुम्हाला 6 लाखांपर्यंत 15 हजार टॅक्स द्यावा लागेल. म्हणजेच तुम्ही 5 टक्क्यांच्या टॅक्स ब्रॅकेटमध्ये याल. जर तुमचं उत्पन्न 9 लाख रुपये असेल तर तुम्हाला 45 हजार रुपये टॅक्स भरावा लागेल. 12 लाखांपेक्षा जास्त उत्पन्न असेल तर 90 हजार आणि 15 लाखांपेक्षा जास्त उत्पन्न असेल तर 1.5 लाख रुपये टॅक्स भरावा लागेल. 15 लाखांपेक्षा अधिक उत्पन्न असेल तर 1.5 लाखांशिवाय उत्पन्नाच्या 30 टक्के टॅक्स द्यावा लागेल. आणखी वाचा Subscribe to Notifications