Income Tax Day: SBI आपल्या ग्राहकांना देतेय १९९ रूपयांत CA ची सुविधा; पाहा कसा घेऊ शकता लाभ
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 24, 2021 14:32 IST
1 / 10इन्कम टॅक्स विभागानं इन्मक टॅक्स दिनानिमित्त स्टेट बँक ऑफ इंडियाच्या आपल्या ग्राहकांसाठी विशेष सुविधा उपलब्ध करून दिली आहे. 2 / 10ग्राहकांना Yono App वर Tax2Win द्वारे आपला इन्कम टॅक्स रिटर्न मोफत भरता येणार आहे. याशिवाय जर इन्मक टॅक्स रिटर्न करताना जर सीएची मदत लागली तर त्यासाठी केवळ १९९ रूपये आकारले जाणार आहेत.3 / 10सामान्य दिवसांमध्ये सीएची फी ५४९ रूपये इतकी असते. परंतु आयकर दिनाच्या निमित्तानं यामध्ये स्टेट बँकेनं सूट देण्याचा निर्णय घेतला आहे. 4 / 10Tax2win हा करदात्यांसाठी एक ई फायलिंग प्लॅटफॉर्म आहे. याद्वारे सहजरित्या इन्कम टॅक्स रिटर्न फाईल करता येतो.5 / 10स्टेट बँकेनं Tax2win सोबत केलेल्या करारामुळे या सुविधेचा ग्राहकांना लाभ घेता येत आहे. पाहा याचा कसा तुम्ही वापर करू शकता. 6 / 10सर्वप्रथम SBI YONO अॅपवर क्लिक करा. त्यानंतर त्या ठिकाणी असलेल्या Shop and Order या पर्यायावर क्लिक करा.7 / 10या पर्यायवर क्लिक केल्यानंतर एक नवं पान सुरू होई. त्याठिकाणी view all या ऑप्शनवर क्लिक करा. 8 / 10त्यानंतर त्या ठिकाणी तुम्हाला Tax And Investment हा पर्याय दिसेल. त्यावर क्लिक केल्यानंतर Tax2Win हा ऑप्शन दिसेल.9 / 10Tax2Win वर क्लिक केल्यानंतर एक नवं पेज ओपन होईल. त्या ठिकाणी तुम्हाला आयटीआर आणि सीएचा ऑप्शन दिसेल. या ठिकाणी तुम्ही सीएचा ऑप्शन निवडून या ऑफरचा लाभ घेऊ शकता. 10 / 10२०२० मध्ये इन्कम टॅक्स विभागानं इन्कम टॅक्स दिवसाची सुरूवात केली होतीय यामागे एक विशेष कारणही होतं. तेव्हा इन्कम टॅक्स विभागाला १५० वर्षे पूर्ण झाली होती. १८६० मध्ये ब्रिटीशांनी याची सुरूवात केली होती.