Income Tax Refund: Filed ITR but not get refund yet? You might have made 'these' mistakes
ITR भरला पण रिफंड आला नाही? 'या' चुका टाळा, लवकर मिळेल तुमच्या हक्काचा रिफंड By ऑनलाइन लोकमत | Published: July 12, 2023 4:07 PM1 / 7 Income Tax Refund Status: इनकम टॅक्स रिटर्न(ITR) भरण्याची अंतिम तारीख(31 जुलै) जवळ येत आहे. तुम्ही अजून फाइलिंग केले नसेल, तर लवकरात लवकर हे काम करा. शेवटच्या दिवसांमध्ये ट्रॅफिक वाढल्यामुळे तुम्हाला अडचणी येऊ शकतात. दरम्यान, आयकर विभागाकडून सांगण्यात आले की, 11 जुलै 2023 पर्यंत 2023-24 या आर्थिक वर्षासाठी 2 कोटीहून अधिक आयकर रिटर्न भरले गेले आहेत. ही संख्या गेल्या वर्षीच्या आकडेवारीपेक्षा जास्त आहे.2 / 7 तुमच्यापैकी अनेकांनी ITR भरला असेल आणि अनेकांना रिफंडही मिळाला असेल. पण, जर तुम्हाला तुमचा रिफंड मिळाला नसेल तर ही बातमी तुमच्यासाठी महत्वाची आहे. तुमच्या एखाद्या छोट्या चुकीमुळे रिफंड मिळण्यात अडचणी येत असतील. म्हणूनच एकदा क्रॉस चेक करणे आवश्यक आहे. आता रिटर्नची प्रक्रिया खूप वेगवान झाली आहे, ज्यामुळे 7 ते 10 दिवसांत रिटर्न मिळतो. 3 / 7 1. ITR मध्ये संपूर्ण माहिती न देणे- जर तुमच्या ITR मध्ये अपूर्ण माहिती दिली गेली असेल, तर तुमचा रिफंड थांबवला जाऊ शकतो. यासाठी तुम्ही ITR प्रिव्हू तपासू शकता. यानंतर तुम्ही इतर माहिती आणि कागदपत्रांसह तुमच्या असेसिंग अधिकाऱ्याशी संपर्क साधू शकता.4 / 7 2. कर शिल्लक असेल तर- जर तुम्ही कोणत्याही प्रकारचा कर भरला नसेल किंवा तुमच्या गणितात काही त्रुटी राहिल्या असतील तर तुम्हाला आयकर नोटीस येऊ शकते. नोटीस मिळाल्यावर आयकर विभागाकडून तुमचा कोणत्याही प्रकारचा परतावा थांबवला जाऊ शकतो.5 / 7 3. रिफंड रिक्वेस्टमध्ये चूक- तुमच्या रिफंड रिक्वेस्टमध्ये कोणत्याही प्रकारची चूक आढळल्यास तुम्हाला आयकर विभागाकडून नोटीस मिळू शकते. अशा परिस्थितीत तुमचे कॅलक्युलेशन चुकीचे असेल तर तुम्हाला रेक्टिफिकेशन आयटीआर फाइल करावा लागेल.6 / 7 4. डिडक्शनमध्ये गडबड- अनेकदा ही बाब ITR फाईल केल्यानंतर समजते. आयटीआर भरल्यानंतर तुम्हाला डिडक्शनबाबतची चूक दिसून येते. अशा परिस्थितीत जर तुम्ही योग्य डिडक्शनचा दावा केला नसेल, तर तुम्हाला सुधारित आयटीआर दाखल करावा लागेल.7 / 7 5. चुकीचे बँक खाते- तुम्ही तुमच्या बँक खात्याची चुकीची माहिती टाकली असल्यास, तुमचा परतावा थांबवला जाऊ शकतो. रिटर्नसाठी तुमच्याची बँक खात्याची अचूक माहिती असणे गरजेचे आहे. आणखी वाचा Subscribe to Notifications