income tax return itr filling last date 31 december online itr process how to apply online
ITR Filling Last Date : पैसे देऊन भरुन घेता इन्कम टॅक्स रिटर्न? घरबसल्या पाच मिनिटांत करा फाईल By ऑनलाइन लोकमत | Published: December 10, 2021 10:25 AM1 / 12नोकरी करणारे कर्मचारी नेहमी आयटीआर फाइल करणे हे आव्हान मानतात. यासाठी ते कोणत्याही सीए फर्म किंवा अकाउंटंटशी संपर्क साधतात. त्यासाठी ते फीदेखील देतात. 2 / 12आम्हाला इन्कम टॅक्स रिटर्न फाईल करायचा आहे. तुमच्या कोणी ओळखीची व्यक्ती आहे का? असे प्रश्नही विचारताना अनेकदा तुम्ही लोकांना पाहिलंही असेल. परंतु तुम्ही केवळ ५ मिनिटांमध्ये तुमचा ITR फाईल करु शकता. 3 / 12असेसमेंट इयर २०२१-२२ साठी इन्कम टॅक्स रिटर्न करण्याची म्हणजेच फाइल करण्याची तारीख अतिशय जवळ आली आहे. अर्थ मंत्रालयानं दिलेल्या माहितीनुसार या असेसमेंट इयरचं रिटर्न करण्याची अखेरची तारीख ही ३१ डिसेंबर २०२१ आहे.4 / 12जर तुम्ही इन्कम टॅक्सच्या स्लॅबमध्ये येत असाल तर ३१ डिसेंबर नंतर फाईल केल्यास तुम्हाला ५ हजार रुपयांपर्यंत दंड भरावा लागू शकतो हे लक्षातच छेवलं पाहिजे. ज्यांचं उत्पन्न पाच लाखांपेक्षा कमी आहे, त्यांना दंड म्हणून १००० रुपये भरावे लागतील.5 / 12दरम्यान लेट फी आणि आयटीआर भरण्यासाठी कोणाची वाट पाहण्याची गरज नाही. आम्ही आज तुम्हाला आयटीआर फायलिंगची अशी प्रोसेस सांगणार आहोत, ज्यामुळे तुमचे पैसेही वाचतील आणि वेळही. यासाठी तुम्हाला PAN, Aadhaar, बँक अकाऊंट नंबर, गुंतवणूकीची माहिती आणि त्याचे पुरावे, फॉर्म १६, फॉर्म २६ एएस सारखी डॉक्युमेंट्स असणं आवश्यक आहे. 6 / 12सर्वप्रथम https://eportal.incometax.gov.in/iec/foservices/#/login ही लिंक ओपन करा. त्यानंतर तुमचा युझर आयडी भरा आणि Continue वर क्लिक करा. त्यानंतर तुमचा पासवर्ड टाका आणि लॉग इन करा. जर तुम्हाला तुमचा पासवर्ड माहित नसेल तर Forgot Password द्वारे नवा पासवर्डही तयार करता येईल.7 / 12लॉग इन केल्यानंतर एक पेज ओपन होईल. या ठिकाणी तुम्ही e-file (Click on E-file) वर क्लिक करा. त्यानंतर File Income Tax Return ऑप्शन सिलेक्ट करा.8 / 12यानंचर Assessment Year २०२१-२२ सिलेक्ट करा आणि कंटिन्यूवर क्लिक करा. या ठिकाणी तुम्हाला Online - Offline असा ऑप्शन दिसेल. या ठिकाणी तुम्ही Online हा ऑप्शन सिलेक्ट करा आणि पर्सनल ऑप्शन निवडा.9 / 12यानंतर तुम्हाला ITR -1 किंवा ITR-4 पैकी कोणत्याही एका ऑप्शनला निवडावं लागेल. त्यानंतर Continue वर क्लिक करा. जर तुम्ही सॅलराइड असाल तर ITR 1 सिलेक्ट करा. त्यानंतर तुमच्या सिस्टमवर एक फॉर्म डाऊनलोड होईल. नंतर 'Filling Type' मध्ये जाऊन 139(1)- Original Return सिलेक्ट करा.10 / 12यानंतर तुमच्यासमोर सिलेक्ट केलेला फॉर्म उघडेल. यामध्ये तुमच्याकडे मागितलेली माहिती भरा आणि ती सेव्ह करत राहा. यामध्ये बँक खात्याचीही योग्य माहिती भरा. जर तुम्ही Offline मोड सिलेक्ट कतेला असेल तर डाऊनलोड फॉर्ममध्ये सर्व माहिती भरल्यानंतर Attach File चा ऑप्शन दिसेल. याठिकाणी तुमची फाइल अॅटॅच करा.11 / 12आता आय़टीआर फाइल करण्यासाठी एक नवं पेज ओपन होईल. या ठिकाणी व्हेरिफिकेशनसाठी E-Verification करू शकता. ऑफलाइन प्रोसेसमध्ये फाइल व्हॅलिडेट केल्यानंतर Proceed to Verification वर क्लिक करा.12 / 12अशाप्रकारे पाच मिनिटांमध्ये तुम्ही तुमचा आयटीआर फाइल करु शकता. आयटीआर रिटर्न करण्याची प्रक्रिया Income tax return filing नंतर पूर्ण होते. हे जमा केल्याच्या १२० दिवसांच्या आत तुम्हाला हे व्हेरिफाय करावं लागतं. असं न केल्यास आयटीआर अमान्य मानलं जातं. आणखी वाचा Subscribe to Notifications