शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Income TAX: पत्नीदेखील तुम्हाला आयकरात सूट मिळवून देऊ शकते; जाणून घ्या तीन पर्याय....

By ऑनलाइन लोकमत | Published: May 23, 2021 4:40 PM

1 / 10
How Wife Can Save Your Tax: लग्नानंतर माणसाचे आयुष्य एकदम बदलून जाते. नव्या जबाबदाऱ्यांसह वेगवेगळी आव्हाने वाढू लागतात. आयुष्यात बदलांबरोबरच ही आव्हाने पेलण्यासाठी तुम्हाला जीवनसाथीदेखील मिळून जातो. (Wife can save your income tax. see how?)
2 / 10
हा जोडीदार तुमच्या आयुष्यातील आव्हानेच नाही तर संसारातील तुमच्या आर्थिक निर्णयांचादेखील बरोबरचा भागीदार बनून जातो. तुमचा जोडीदार म्हणजेच पत्नी किंवा पती तुमचा इन्कम टॅक्स देखील वाचवू शकतो. चला जाणून घेऊया कसे....
3 / 10
तुमची पत्नी नोकरी किंवा कमावती नसली तरी देखील ती तुम्हाला पैसे वाचविण्यात नक्कीच मदत करते. घरातील वस्तू, भाजीपाला घासाघीस करून कमी भावाने कसे आणायचे, हे एक महत्वाचे कामही करते.
4 / 10
शॉपिंग, मुव्ही पहायला जाणे आदी सारखे छंद असले तरीदेखील ती तुम्हाला तुमचा कर वाचविण्यास मोठी मदत करू शकते. या तीन प्रकाराने ती तुम्हाला यासाठी मदत करू शकते.
5 / 10
जर तुम्ही घर खरेदी करणार असाल तर तुम्हाला जॉईंट होम लोन कर वाचविण्यासाठी मदतीचे आहे. या प्रकारे तुम्ही दोघेही होम लोनवर करात सूट मिळवू शकता. 80 सी अनुसार पती आणि पत्नी दोघांनाही 15.-1.5 लाखांची सूट मिळू शकते. तर सेक्शन 24 (बी) नुसार दोघांनाही 2-2 लाखांची सूट मिळू शकते. म्हणजे दुप्पट फायदा मिळू शकतो.
6 / 10
सध्या कोरोनाचा काळ सुरु आहे. हॉस्पिटलची बिले पाहून अनेकांना कोरोनापेक्षा या हॉस्पिटलचीच धास्ती वाटू लागली आहे. या महागाईच्या काळात तुम्ही तुमच्या कुटुंबासाठी हेल्थ इन्शुरन्स खरेदी करणे समजुतदारपणाचा निर्णय आहे.
7 / 10
जर तुम्हाला वाटत असेल तर तुम्ही सर्वांसाठी वेगवेगळा प्लॅन घेऊ शकता. मात्र, फॅमिली फ्लोटर प्लॅन चांगला. यामुळे कमी खर्चात अधिक फायदा मिळतो.
8 / 10
जर तुम्ही एकट्यासाठी इन्शुरन्स घेतला असाल तर कमी पैशांवर तुम्हाला करात सूट मिळणार आहे. जर पत्नी आणि मुलांसाठी देखील एकच स्कीम असेल तर तुम्ही अधिकचा फायदा मिळवू शकणार आहात. सेक्शन 80डी अनुसार तुम्ही 25 हजार रुपयांपर्यंतचा टॅक्स बेनिफिट मिळवू शकणार आहात.
9 / 10
लग्नाच्या वेळी प्रत्येकजण आपल्या पत्नीच्या संरक्षणाचे वचन देतो. तुम्ही हे वचन जीवन विमा पॉलिसीच्या मदतीने आणखी मजबूत बनवू शकता. जर तुम्ही जॉईंट विमा पॉलिसी घेतली तर पत्नीला काही झाल्यास तुम्हाला कोणत्याही प्रकारचे संकटाला सामोरे जावे लागणार नाही.
10 / 10
जॉईंट विमा पॉलिसीमध्ये तुम्हाला कमी प्रिमिअममध्ये अधिक फायदा मिळतो. 80सी नुसार आयकरात सूट देखील मिळते.
टॅग्स :Income Taxइन्कम टॅक्सmarriageलग्न