शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

कार्डांद्वारे आर्थिक व्यवहार वाढले; नव्या वर्षात २२ लाख कोटींचे व्यवहार होण्याची शक्यता

By ऑनलाइन लोकमत | Published: December 31, 2021 9:11 AM

1 / 8
नवी दिल्ली : २०२० मध्ये कोविड-१९ साथीमुळे लावण्यात आलेल्या लॉकडाऊनचा परिणाम होऊन डेबिट आणि क्रेडिट कार्डांच्या पेमेंटमध्ये १०.८ टक्के घसरण झाली होती. तथापि, आता परिस्थिती झपाट्याने सुधारत असून, २०२२ मध्ये कार्ड पेमेंटमध्ये ३० टक्क्यांपेक्षा अधिक वाढ होण्याची शक्यता आहे.
2 / 8
नव्या वर्षात २२ लाख कोटी रुपयांचे व्यवहार कार्डांद्वारे होऊ शकतात, अशी माहिती या क्षेत्रातील जाणकारांनी दिली. १ जानेवारीपासून एटीएममधून पैसे काढणे महाग होणार आहे.
3 / 8
एटीएममधून पैसे काढल्यास ग्राहकांना पूर्वीपेक्षा अधिक शुल्क द्यावे लागेल. त्यामुळे रोख रक्कम काढण्याऐवजी कार्डाद्वारे डिजिटल माध्यमातून पैसे हस्तांतरित करण्याचे प्रमाण वाढेल.
4 / 8
कार्डांवरील देवघेव ३० टक्क्यांपेक्षाही अधिक वाढण्याची शक्यता आहे. सूत्रांनी सांगितले की, भारतात सध्या रोख आणि कार्डाद्वारे होणाऱ्या पेमेंटचे प्रमाण १४:१ असे आहे. त्यात नव्या वर्षात सुधारणा होईल.
5 / 8
ग्रामीण भागातही कार्ड पेमेंटमध्ये वाढ होऊ शकते. एसबीआय कार्डचे सीईओ एम. राम मोहन राव आमरा यांनी सांगितले की, सप्टेंबरच्या तिमाहीत आमचे क्रेडिट कार्ड पेमेंट ४७ टक्क्यांनी वाढून ४३ हजार कोटी रुपयांवर गेले.
6 / 8
आतापर्यंतच्या सर्व तिमाहींपेक्षा ते अधिक आहे. २०२२ मध्ये कार्ड पेमेंटमध्ये चांगली वाढ होण्याची शक्यता आहे. प्राप्त आकडेवारीनुसार, कार्डांद्वारे होणाऱ्या पेमेंटचा आकडा २०२५ पर्यंत ४० लाख कोटी रुपयांवर जाण्याची शक्यता आहे.
7 / 8
२०२१ मध्ये हा आकडा १७ लाख कोटी रुपये असेल, असे अनुमान आहे. व्यवहारांच्या दृष्टीने डेबिट कार्ड, तर रकमेच्या दृष्टीने क्रेडिट कार्ड पुढे आहे. कार्ड पेमेंटमधील एकूण रकमेपैकी ५१.२८ टक्के रकमेचे पेमेंट क्रेडिट कार्डांद्वारे, तर ४८.७ टक्के रकमेचे पेमेंट डेबिट कार्डांद्वारे झाले.
8 / 8
तसेच, यातील ८०.५ टक्के व्यवहार क्रेडिट कार्डांद्वारे, तर ६९.५ टक्के व्यवहार डेबिट कार्डांद्वारे झाले.
टॅग्स :businessव्यवसायMONEYपैसा