Incredible..! Credit cards usage grew in popularity as spending increased; Shocking statistics
इनक्रेडिबल..! खर्च वाढताच क्रेडिट कार्डचा विळखा वाढला; धक्कादायक आकडेवारी By ऑनलाइन लोकमत | Published: July 31, 2022 12:40 PM1 / 8मुंबई : कोरोनाचे दुष्टचक्र संपल्यानंतर अर्थव्यवस्थेचा गाडा रुळावर येऊ लागला आहे. त्याचे सकारात्मक परिणाम क्रेडिट कार्ड उद्योगातही दिसून आले आहेत. भारतीय रिझर्व्ह बँकेने नुकत्याच जारी केलेल्या आकडेवारीवरून हे अधोरेखित झाले आहे. 2 / 8कोरोनाच्या दुष्टचक्रानंतर मे, २०२२ पर्यंत तब्बल ७ कोटी ७० लाख नवीन क्रेडिट कार्ड वितरित झाले आहेत. क्रेडिट कार्डावरून खर्च करण्यामध्ये मे २०२१ च्या तुलनेत २३ टक्क्यांची वाढ नोंदली गेली आहे. 3 / 8ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी क्रेडिट कार्ड कंपन्या कार्डावरून होणाऱ्या प्रत्येक व्यवहारासाठी पॉइंट्स देतात. ठराविक पॉइंट्स जमा झाले की, त्यांचा उपयोग कार्डाचे बिल देण्यासाठी काही प्रमाणात करता येतो. 4 / 8क्रेडिट कार्ड कंपन्या अनेक ग्राहकोपयोगी कंपन्यांशी करार करत, त्यांच्या उत्पादनांच्या खरेदीत हे पॉइंट्स वापरण्याची ग्राहकांना मुभा देतात. काही नामांकित क्रेडिट कार्डद्वारे विमानतळावरील लाऊंज सेवाही मोफत उपलब्ध करून दिली जाते. तसेच, तेथील नाष्टा, जेवण हे अत्यल्प किमतीला उपलब्ध होते.5 / 8क्रेडिट कार्डांची संख्या ०७ कोटी ७० लाखांवर iगेली आहे. सन २०२० आणि २०२१ मधील पहिले किमान आठ महिने क्रेडिट कार्ड कंपन्यांनी फारसा प्रसार केला नव्हता. 6 / 8नेहमीच्या आक्रमकपणे कार्डांचे वितरणही क्रेडिट कार्ड कंपन्यांनी केले नव्हते . आता अर्थचक्र सुधारल्यानंतर पुन्हा एकदा ग्राहकांना आकर्षित करत क्रेडिट कार्डांचे दमदार वितरण सुरू केले आहे. 7 / 8कार्ड घेतल्यानंतर कार्डाच्या वापरातही सातत्य दिसून येत आहे. क्रेडिट कार्डधारक महिन्याकाठी दुकानातील खरेदीसाठी सरासरी ४७८२ रुपये, तर ऑनलाइन खरेदीसाठी सरासरी ६१७० रुपये क्रेडिट कार्डद्वारे खर्च करतो. 8 / 8आजवर दैनंदिन खर्चाखेरीज अचानक उद्भवल्या जाणाऱ्या खर्चासाठी लोकांचा क्रेडिट कार्ड वापराकडे कल असायचा. आणखी वाचा Subscribe to Notifications