शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Independence Day: काय Airtel आणि JIo च्या ग्राहकांना मिळतोय मोफत 30GB डेटा? जाणून घ्या सत्य

By ऑनलाइन लोकमत | Published: August 15, 2022 3:51 PM

1 / 6
Free 30GB Data on Independence Day: सध्या सर्वच दूरसंचार कंपन्यांमध्ये आपले ग्राहक टिकवण्यासाठी आणि नवे ग्राहक जोडण्यासाठी जबरदस्त स्पर्धा सुरू आहे. अनेक कंपन्या ग्राहकांना निरनिराळ्या ऑफर्सही देत आहेत. परंतु काही स्कॅमर्सनं आता या कंपन्यांच्या नावाखाली लोकांची लूट करण्यास सुरूवात केली आहे. यासाठी या स्कॅमर्सकडून निरनिराळ्या प्रकारांचा अवलंब केला जात आहे.
2 / 6
एकीकडे भारत आपला ७५ वा स्वातंत्र्यदिन साजरा करत आहे, तर दुसरीकडे स्कॅमर्स याचा फायदा घेण्यासाठी सक्रिय झाल्याचं दिसून येतंय. दरम्यान, स्कॅमर्सकडून अनेकांना काही मेसेजेस पाठवण्यात येत आहे. तसंच स्वातंत्र्यदिनाच्या निमित्त 30GB मोफत डेटा देण्यात येत असल्याचंही सांगितलं जात आहे.
3 / 6
सध्या सोशल मीडिया म्हणजेच व्हॉट्सअॅपवर हा मेसेज व्हायरल होतोय. मेसेजमध्ये दिलेल्या लिंकवर क्लिक करून तुम्ही सर्व नेटवर्कसाठी 30GB डेटा अॅक्टिव्हेट करून घेऊ शकता असं यात म्हटलंय. वेगवेगळ्या दूरसंचार कंपन्यांसाठी वेगवेगळ्या लिंक्सही देण्यात आल्या आहेत.
4 / 6
यामध्ये देशातील मेजर टेलिकॉम ऑपरेटर्स एअरटेल, रिलायन्स जिओ, बीएसएनएल आणि व्होडाफोन-आयडियाचा समावेश आहे. या मेसेजमध्ये प्रत्येक ऑपरेटरसाठी एक लिंक देण्यात आली आहे. यामध्ये एक लिंक देण्यात आली आहे. यावर क्लिक केल्यानंतर एक लिंक ओपन होते. त्यामध्ये तुमच्याकडे तुमचा मोबाईल क्रमांक मागितला जातो.
5 / 6
दरम्यान, तुम्हाला डेटा अॅक्टिव्हेट करण्यासाठी अन्य लोकांसोबतही ही लिंक शेअर करण्यास सांगितलं आहे. यासाठी फेक कमेंट सेक्शनही देण्यात आला आहे. यामध्ये लोकांनी आपल्याला हा 30GB मिळाल्याचा दावाही केला आहे. टेलिकॉम कंपन्यांकडून असे कोणतेही अधिकृत विधान आलेले नाही ज्यामध्ये 30GB मोफत डेटा देण्याबाबत सांगितलं जात आहे. लोकांचा विश्वास बसावा यासाठी फेक फेसबुक इंटरफेसही तयार करण्यात आला आहे.
6 / 6
अशा परिस्थितीत अशी कोणतीही लिंक उघडणे टाळलं पाहिजे. त्यात नंबर दिल्यानं तुमची माहिती स्कॅमर्स पर्यंत पोहोचते. तुमची फसवणूक करण्यासाठी किंवा टेलीमार्केटिंग कॉल करण्यासाठी याचा वापर केला जाऊ शकतो. यामुळे असे मेसेज कोणालाही फॉरवर्ड न करणंच उत्तम आहे.
टॅग्स :AirtelएअरटेलReliance Jioरिलायन्स जिओBSNLबीएसएनएलfraudधोकेबाजी