india becomes the world fastest growing economy with a gdp growth rate of 8 7 per cent fy 21 22
Indian economy: जय हो! जगात सर्वाधिक वेगानं वाढतेय भारताची अर्थव्यवस्था, अमेरिका अन् चीनलाही टाकले मागे By ऑनलाइन लोकमत | Published: May 31, 2022 9:23 PM1 / 8Indian economy: कोरोनाच्या महामारीतून सावरल्यानंतर आता भारतीय अर्थव्यवस्थेला वेग आला आहे. भारताची अर्थव्यवस्था जगातील सर्वात वेगाने वाढत आहे आणि वार्षिक विकास दर ८.७ टक्क्यांवर पोहोचला आहे. भारतीय अर्थव्यवस्थेच्या वाढीचा वेग चीन, अमेरिका आणि ब्रिटनसारख्या विकसित देशांपेक्षाही अधिक आहे2 / 8वार्षिक आर्थिक विकास दराच्या बाबतीत भारतानं अनेक बड्या देशांना मागे टाकलं आहे. या काळात चीनची अर्थव्यवस्था ८.१ टक्के दरानं वाढली, तर ब्रिटनने ७.४ टक्के वाढ नोंदवली. अमेरिका (5.7%) या बाबतीत फ्रान्सच्याही (7%) मागे आहे.3 / 8आर्थिक वर्ष २०२१-२२ च्या चौथ्या तिमाहीत देशाची अर्थव्यवस्था ४.१ टक्के दराने वाढली आहे. त्याचवेळी, संपूर्ण आर्थिक वर्षात आर्थिक विकास दर ८.७ टक्के होता. 4 / 8राष्ट्रीय सांख्यिकी कार्यालयानं (NSO) जारी केलेल्या आकडेवारीनुसार, ऑक्टोबर-डिसेंबर २०२१ या तिमाहीत विकास दर ५.४ टक्के होता, तर जानेवारी-मार्च २०२१ या तिमाहीत विकास दर २.५ टक्के होता.5 / 8सरकारी आकडेवारीनुसार २०२१-२२ या वर्षासाठी GDP वाढीचा दर ८.७ टक्के होता. याआधी २०२०-२१ मध्ये अर्थव्यवस्थेत ६.६ टक्क्यांची घसरण झाली होती. तथापि, मार्च २०२२ मध्ये संपलेल्या आर्थिक वर्षातील वाढीचा आकडा NSO च्या अंदाजापेक्षा कमी आहे. NSO ने आपल्या दुसऱ्या आगाऊ अंदाजात तो ८.९ टक्के असण्याचा अंदाज वर्तवला होता.6 / 8२०२०-२१ या वर्षात कोरोना महामारीने वाईटरित्या प्रभावित झालेल्या अर्थव्यवस्थेत ६.६ टक्क्यांची घसरण झाली होती. NSO च्या मते, २०२१-२२ या आर्थिक वर्षात वास्तविक GDP 147.36 लाख कोटी रुपये होता, जो एका वर्षापूर्वी 135.58 लाख कोटी रुपये होता. तर मार्च 2022 रोजी संपलेल्या आर्थिक वर्षातील वाढीचा आकडा NSO च्या अंदाजापेक्षा कमी आहे.7 / 8उत्पादन क्षेत्रातील GVA वाढ ९.९ टक्के राहिली आहे जी एका वर्षापूर्वी ०.६ टक्क्यांनी घसरली होती. त्याच वेळी, खाण आणि बांधकाम दोन्ही क्षेत्रातील GVA ११.५ टक्के दराने वाढला. हे दोन्ही क्षेत्र वर्षभरापूर्वी करारबद्ध झाले. 8 / 8देशाच्या मोठ्या लोकसंख्येशी निगडीत असलेल्या कृषी क्षेत्राचा विकास दर २०२१-२२ मध्ये तीन टक्क्यांपर्यंत खाली आला आहे, जो एका वर्षापूर्वी ३.३ टक्के होता. आणखी वाचा Subscribe to Notifications