शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

सहा महिन्यांत ₹47,29,57,02,35,000 चे बिल! भारताचा सर्वाधिक पैसा कोणत्या देशात जातोय?

By ऑनलाइन लोकमत | Published: October 17, 2024 4:44 PM

1 / 6
India-China Trade : भारत आणि चीनमध्ये सीमेवर अनेक वर्षांपासून तणाव आहे, मात्र दोन्ही देशांच्या व्यापारावर त्याचा कोणताही परिणाम झालेला नाही. या वर्षी एप्रिल-सप्टेंबर दरम्यान चीन भारताचा सर्वात मोठा आयातदार म्हणून उदयास आला आहे. या काळात चीनमधून एकूण $56.29 अब्ज किमतीची आयात करण्यात आली आहे.
2 / 6
तर, याच कालावधीत अमेरिका भारतासाठी सर्वात मोठा निर्यातदार म्हणून उदयास आला आहे. अमेरिकेतील निर्यात 5.62 टक्क्यांनी वाढून $40.38 अब्ज झाली आहे. चालू आर्थिक वर्षाच्या पहिल्या सहामाहीत चीनमधून आयात 11.5 टक्क्यांनी वाढली आहे. गेल्या आर्थिक वर्षात याच कालावधीत 50.48 अब्ज डॉलरची आयात झाली होती.
3 / 6
आकडेवारीनुसार, या कालावधीत भारतातील आयातीचे शीर्ष 10 स्त्रोत चीन, रशिया, संयुक्त अरब अमिराती, अमेरिका, इराक, सौदी अरेबिया, इंडोनेशिया, दक्षिण कोरिया, स्वित्झर्लंड आणि सिंगापूर होते.
4 / 6
चालू आर्थिक वर्षात एप्रिल-सप्टेंबर या कालावधीत रशियाकडून आयात $32.18 अब्ज झाली, जी मागील वर्षी याच कालावधीत $30.43 अब्ज होती. तर, UAE मधील आयात $31.46 अब्ज झाली, जी गेल्या आर्थिक वर्षाच्या याच काळात $20.70 अब्ज होते.
5 / 6
या कालावधीत देशाचे शीर्ष 10 निर्यात स्त्रोत यूएस, यूएई, नेदरलँड्स, यूके, चीन, सिंगापूर, सौदी अरेबिया, बांगलादेश, जर्मनी आणि दक्षिण आफ्रिका होती. चालू आर्थिक वर्षात एप्रिल-सप्टेंबर या कालावधीत UAE मधील निर्यात $17.24 अब्ज झाली आहे, जी मागील वर्षी याच कालावधीत $15.47 अब्ज होती. तर, चीनला केलेली निर्यात $ 7.63 अब्ज होती, जी गेल्या वर्षी $ 6.91 अब्ज झाली.
6 / 6
विशेष म्हणजे, 2023-24 मध्ये अमेरिका भारताचा सर्वात मोठा व्यापारी भागीदार होता. त्यानंतर चीनचा नंबर होता. 2013-14 ते 2017-18 आणि 2020-21 मध्ये चीन भारताचा सर्वोच्च व्यापार भागीदार होता. चीनपूर्वी UAE हा देशाचा सर्वात मोठा व्यापारी भागीदार होता. तर, 2021-22 आणि 2022-23 मध्ये अमेरिका सर्वात मोठा व्यापार भागीदार होता.
टॅग्स :IndiaभारतchinaचीनAmericaअमेरिकाbusinessव्यवसाय