शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

गायीच्या शेणात असं काय खास आहे? जे खरेदी करण्यासाठी अरब देशांनी लावल्या रांगा

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 21, 2025 15:11 IST

1 / 6
हिंदू धर्मात गाईला पवित्र मानले जाते. तिची पूजा केली जाते. एवढेच नाही तिचे मूत्रही प्राशन केले जाते. वास्तविक गाईचे शेण आणि मूत्र याबद्दल देशात २ मत प्रवाह आहेत. काही लोक याला औषधी आणि मौल्यवान समजतात. तर काही लोक या दाव्यावर विश्वास ठेवत नाही.
2 / 6
देशात गायीच्या शेणाला फारसे महत्त्व मिळत नसले तरी, आता परदेशात मात्र त्याच्या गुणांचे कौतुक होऊ लागले आहे. यामुळेच भारतातून शेणाची निर्यात सतत वाढत आहे. २०२४ मध्ये भारताने ४०० कोटी रुपयांचे शेण आणि त्यापासून बनवलेले पदार्थ निर्यात केले. कुवेत आणि अरब देश आता भारतीय गायीचे शेण खरेदी करण्यासाठी रांगेत उभे आहेत.
3 / 6
कुवेतमध्ये झालेल्या एका संशोधनात असे आढळून आले आहे की जर गाईचे शेण पावडर स्वरूपात वापरले तर खजूर पिकाची वाढ तर होतेच पण त्याचे उत्पादनही लक्षणीय वाढते. ही माहिती समोर आल्यापासून, शेणाची मागणी वाढली आहे.
4 / 6
भारत आता केवळ मसाले, चहा किंवा तंत्रज्ञानातूनच नव्हे तर जागतिक बाजारपेठेत गायीचे शेण आणि गोमूत्र पुरवूनही भरपूर पैसे कमवत आहे. अरब देशांव्यतिरिक्त, भारतीय गायीचे शेण मालदीव, व्हिएतनाम आणि सिंगापूरलाही निर्यात केले जात आहे. गोमूत्र आयुर्वेदिक औषधे, सेंद्रिय शेती आणि नैसर्गिक कीटकनाशके म्हणून वापरले जाते.
5 / 6
गायीचे शेण ३० ते ५० रुपये प्रति किलो दराने विकले जात आहे. मागणीप्रमाणे किमतीही वाढण्याची शक्यता आहे. भारतात सुमारे ३० कोटी गुरे असून दररोज सुमारे ३० लाख टन शेण तयार होते, ज्यामुळे ही निर्यात सतत शक्य होते.
6 / 6
२०२३-२४ दरम्यान भारताने परदेशात सुमारे ४०० कोटी रुपयांचे शेण आणि गोमूत्र आधारित उत्पादने विकली, ज्यामध्ये अरब देशांचे योगदान जास्त आहे. यापैकी, गाईचे शेण १२५ कोटी रुपये किमतीचे, शेणापासून बनवलेले खत १७३.५७ कोटी रुपये, तर कंपोस्ट खत ८८.०२ कोटी रुपये किमतीचे होते.
टॅग्स :cowगायsaudi arabiaसौदी अरेबियाAgriculture Sectorशेती क्षेत्रFertilizerखते