शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

'मेक इन इंडिया'चा जगभर डंका; अवघ्या 3 महिन्यांत भारताची निर्यात 200 अब्ज डॉलर्स पार...

By ऑनलाइन लोकमत | Published: July 15, 2024 10:06 PM

1 / 5
India Export Rise In June : भारतीय सामानाची परदेशात मोठी मागणी आहे. हे आम्ही नाही, तर निर्यातीचे आकडे सांगत आहोत. वाणिज्य मंत्रालयाने सोमवारी जारी केलेल्या डेटानुसार, भारताची एकूण निर्यात (वस्तू आणि सेवांसह) एप्रिल ते जून या तिमाहीत $200.3 अब्ज झाली, जी गेल्या वर्षी याच तिमाहीत $184.5 अब्ज होती. विशेष म्हणजे कोणत्याही आर्थिक वर्षाच्या पहिल्या तिमाहीत देशाने केलेली ही सर्वाधिक निर्यात आहे.
2 / 5
निर्यातीच्या आकडेवारीत वाढ झाली, म्हणजे त्या देशात बनवलेल्या वस्तूंची मागणी इतर देशांच्या बाजारपेठेत वाढत आहे. भारताच्या निर्यातीत जोरदार वाढ झाली आहे. सरकारने जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार, जून 2024 मध्ये वस्तूंची निर्यात 2.55 टक्क्यांनी वाढून $35.2 अब्ज झाली, जी एका वर्षापूर्वी याच महिन्यात $34.32 अब्ज होती. तर, मे महिन्यात भारतीय वस्तूंची निर्यात 9.1 टक्क्यांनी वाढून $38.13 अब्ज झाली होती.
3 / 5
या काळात भारताने आयात केलेल्या वस्तूंच्या आकडेवारीतही वाढ झाली आहे. जून महिन्यात भारताच्या आयातीत 5 टक्क्यांनी वाढ झाली आहे. जून 2024 मध्ये वस्तूंची आयात 5 टक्क्यांनी वाढून $56.18 अब्ज झाली, तर जून 2023 मध्ये ती $53.51 अब्ज होती. वाणिज्य मंत्रालयाच्या म्हणण्यानुसार, जूनमध्ये भारताची व्यापार तूट 20.98 अब्ज डॉलर्स इतकी नोंदवली गेली आहे.
4 / 5
देशात महागाईचा आकडा वाढला आहे. प्रथमच किरकोळ महागाई 5 टक्क्यांच्या वर गेली, तर सोमवारीच जाहीर झालेल्या घाऊक महागाईच्या आकडेवारीत डब्ल्यूपीआय 3.36 टक्क्यांवर पोहोचला आहे. पण या काळात निर्यात डेटाने चांगली बातमी आणली आहे.
5 / 5
भारताच्या निर्यातीचा उत्कृष्ट डेटा पाहता, वाणिज्य मंत्रालयाने या आर्थिक वर्षात देशाच्या निर्यातीत 800 अब्ज डॉलर्सपेक्षा जास्त वाढ होण्याची अपेक्षा केली आहे. निर्यातीची आकडेवारी जाहीर करताना, वाणिज्य सचिव सुनील बर्थवाल म्हणाले की, तिमाहीचे आकडे खूपच आशादायी आहेत. एकूण निर्यात $ 200 अब्ज ओलांडली असून, ही गती कायम राहिल्यास आम्ही या आर्थिक वर्षात $ 800 अब्ज निर्यात करू.
टॅग्स :Indiaभारतbusinessव्यवसायInvestmentगुंतवणूकNarendra Modiनरेंद्र मोदी