शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

कृषी क्षेत्रात गुंतवणुकीची उत्तम संधी! ‘या’ कंपनीचा IPO खुला; ८०० कोटींची शेअर विक्री

By ऑनलाइन लोकमत | Published: June 23, 2021 7:03 PM

1 / 10
गेल्या काही दिवसांपासून शेअर बाजाराची उच्चांकी घोडदौड सुरू असल्याचे दिसत आहे. अदानी समूहाचे शेअर्स कोसळले असले, तर शेअर बाजारात तेजी असल्याचे पाहायला मिळत आहे.
2 / 10
गेल्या काही दिवसांपासून शेअर बाजारात विविध क्षेत्रातील अनेकविध कंपन्यांचे IPO येत आहेत. गुंतवणूकदारांसाठी ही उत्तम संधी मानली जात आहे.
3 / 10
कोरोना संकटाच्या काळातही शेअर बाजार सुरूच राहिले आहे. त्यामुळे याचा फायदा घेण्याची संधी गुंतवणूकदारांकडे असल्याचे सांगितले. संशोधन व विकासावर आधारीत टेक्निकल्सची निर्मिती करणारी 'इंडिया पेस्टिसाइड्स लिमिटेड'ने भांडवल उभारणीचा निर्णय घेतला आहे.
4 / 10
इंडिया पेस्टिसाइड्स लिमिटेड या कंपनीने ८०० कोटींचे शेअर विक्री करण्याची घोषणा केली असून २३ जूनपासून हा आयपीओ खुला झाला आहे.
5 / 10
या कंपनीने २३ जून २०२१ रोजी त्यांचे इक्विटी शेअर्स पब्लिक ऑफरिंगसाठी खुले केले असून, ही ऑफर २५ जून २०२१ रोजी बंद होणार आहे. या ऑफरसाठी प्रती इक्विटी शेअर २९० ते २९६ रुपये निश्चित करण्यात आले आहे.
6 / 10
किरकोळ गुंतवणूकदारांना किमान ५० शेअरसाठी बोली लावता येईल. एकूण ८०० कोटीपर्यंत शेअर्सची विक्री केली जाणार आहे. ज्यात १०० कोटींचे नवीन इक्विटी शेअर्स आणि इक्विटी शेअरची विक्रीची ऑफर ७०० कोटीपर्यंत आहे.
7 / 10
ताज्या इश्युमधून संकलित होणाऱ्या निधीचा वापर खेळत्या भांडवलाच्या आवश्यकता आणि सामान्य कॉर्पोरेट उद्दिष्टांसाठी करण्यात येणार आहे, अशी माहिती कंपनीकडून देण्यात आली आहे.
8 / 10
ही कंपनी पाच टेक्निकल्सची एकमेव भारतीय उत्पादक आहे आणि उत्पादन क्षमतेच्या बाबतीत कॅप्टन, फोल्पेट आणि थिओकार्बामेट हर्बिसाइट यांचे जागतिक पातळीवर आघाडीचे उत्पादक आहेत.
9 / 10
उत्तर प्रदेशमधील लखनौ आणि हरदोई येथील दोन कारखान्यांच्या माध्यमातून सध्या कंपनीचे काम सुरू आहे. या कारखान्यांची टेक्निकल्ससाठीची क्षमता १९५०० मेट्रिक टन आहे आणि फॉर्म्युलेशन व्हर्टिकलची क्षमता ६५०० मेट्रिक टन इतकी आहे.
10 / 10
या कंपनीकडे आताच्या घडीला २२ कृषि-रासायनिक टेक्निकल्ससाठी नोंदणी आणि परवाने आणि भारतात विक्री करण्यासाठी १२५ फॉर्म्यूलेशन्स तसेच निर्यातीसाठी २७ कृषी रासायनिक टेक्निकल्स आणि ३५ फॉर्म्युलेशन्स आहेत.
टॅग्स :IPOइनिशिअल पब्लिक ऑफरिंगAgriculture Sectorशेती क्षेत्रbusinessव्यवसाय