शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

भारतात 2021मध्ये 6.4 टक्के पगारवाढ होण्याची शक्यता; सर्वेक्षणाचा अंदाज!

By श्रीकृष्ण अंकुश | Published: February 12, 2021 3:26 PM

1 / 10
कोरोना व्हायरस ( coronavirus ) महामारीचा फटका संपूर्ण जगाला बसला आहे. या महामारीमुळे जगाबरोबरच भारतालाही मोठा आर्थिक फटका बसला आहे. मात्र, यातच आता एक दिलासादायक वृत्त आले आहे. 2021 मध्ये देशातील सरासरी वेतनात (Average Salary) 6.4 टक्क्यांनी वाढ होण्याचा अंदाज वर्तवण्यात येत आहे.
2 / 10
एका मोठ्या सर्वेक्षणातून ही गोष्ट समोर आली आहे. या सर्वेक्षणातून, गेल्या वर्षीच्या तुलनेत या वर्षात सरासरी वेतनात वाढीचा टक्का अधिक असेल, असा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे.
3 / 10
हा सर्व्हे विलिस टावर्स वाटसनने ( Willis Towers Watson ) केला आहे.
4 / 10
विलिस टावर्स वाटसनच्या सर्व्हेनुसार, भारतात 2021दरम्यान वेतनात 6.4 टक्क्यांनी वाढ होण्याचा अंदाज आहे. 2020 ची सरासरी वाढ 5.9 टक्क्यांहून थोडी अधिक आहे.
5 / 10
विलिस टावर्स वाटसनचे राजुल माथुर यांनी म्हटल्याप्रमाणे, कोविड-19 संकटानंतर आता भारतात व्यवसायिक आशावाद दिसू लागला आहे. मात्र वेतन वाढीवर याचा पूर्ण परिणाम होणे अद्याप बाकी आहे.
6 / 10
सर्वेक्षणानुसार, वेतन वृद्धी बजेटची सरासरी 20.6 टक्के करण्यात येत आहे. जे भारतात 10.3 टक्के कर्मचाऱ्यांचे प्रतिनिधित्व करते.
7 / 10
सर्वेक्षणात वर्तवण्यात आला असा अंदाज - 1. 2021 साठी कार्यकारी स्तरावर सरासरी वेतनात 7 टक्के वाढ होण्याचा अंदाज.
8 / 10
2. आर्थिक सेवा आणि उत्पादन क्षेत्रात 2021मध्ये 7 टक्के वाढ होण्याचा अंदाज.
9 / 10
3. बीपीओ क्षेत्रात 6 टक्के वाढ होण्याचा अंदाज.
10 / 10
4. ऊर्जा क्षेत्रात सर्वात कमी 4.6 टक्के वाढ होण्याचा अंदाज.
टॅग्स :Budgetअर्थसंकल्पEconomyअर्थव्यवस्थाbusinessव्यवसायIndiaभारत