शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Zerodha Nikhil Kamath : भारतीय बँका जबरदस्त, पण आंतरराष्ट्रीय बँकांची परिस्थिती काय? झिरोदाच्या निखिल कामत यांनी सांगितलं वास्तव

By ऑनलाइन लोकमत | Published: November 23, 2022 11:07 AM

1 / 5
Zerodha Nikhil Kamath : ब्रोकरेज फर्म झिरोदाचे सहसंस्थापक निखिल कामत यांनी भारतीय बँकिंग सिस्टमची प्रशंसा केली आहे. आंतरराष्ट्रीय बँकांच्या तुलनेत भारतीय बँका जबरदस्त असल्याचे त्यांनी एका सोशल मीडिया पोस्टमध्ये म्हटलेय.
2 / 5
परंतु एक बँक ट्रान्सफरमध्ये काही दिवस आणि अधिक पैसे का लागतात असा सवालही त्यांनी केला आहे. निखिल कामत यांच्या पोस्टला अनेकांनी प्रतिसादही दिला आहे. तसंच त्यांच्या या पोस्टला पाठिंबाही दिला आहे. आतापर्यंत हजारो नेटकऱ्यांनी त्यांच्या या पोस्टवर कमेंटही केलंय.
3 / 5
भारतीय बँका जबरदस्त आहेत. परंतु आंतरराष्ट्रीय बँका इतक्या खराब पद्धतीनं कशा कामकाज करत आहेत यावर विश्वास बसत नाही. हल्लीच्या दिवसांत एक सामान्य बँक ट्रान्सफर करण्यासाठी काही दिवस आणि अधिक पैसे कसे लागतात. संपूर्ण श्रेय पीएमओ इंडिया, आरबीआय, नंदन निलेकणी आणि त्या प्रत्येक व्यक्तीला जातं ज्यानं ही इकोसिस्टम तयार करायला मदत केली आहे, असं ट्विट कामत यांनी केलंय.
4 / 5
भारतीय बँका अत्यंत नियंत्रित आहेत यात शंका नाही. यासाठी आरबीआयचे विशेष आभार, असं ट्वीट एका नेटकऱ्यानं केलं आहे. घाऊक आणि किरकोळ दोन्ही प्रकारच्या पायल योजनांना ई रुपीच्या जवळ चालण्यासोबतच आम्ही सेटलमेंटची चर्चाही करतो. आम्हाला कोणत्याही मध्यस्थांची गरज नाही. कोणताही विलंब नाही आणि कोणतेही शुल्क नाही. जरा विचार करा यावर काय तयार करता येईल, असं एका व्यक्तीनं म्हटलंय.
5 / 5
रिझर्व्ह बँकेने सरकारी बाँड्समध्ये सेकंडरी मार्केट ट्रान्झॅक्शन सेटल करण्यासाठी काही ठराविक बँकांना आपल्या डिजिटल करन्सीला मंजुरी देण्यासाठी एक पायलट प्रोग्राम सुरू केला आहे. एका महिन्यात काही ठिकाणी रिटेलसाठी ई रुपीची चाचणी करण्यात येणार असल्याचंही त्यांनी सांगितलं.
टॅग्स :businessव्यवसायbankबँकReserve Bank of Indiaभारतीय रिझर्व्ह बँक