शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

ताशी १८० किमी वेग, उशीर झाल्यास नुकसान भरपाई; अशा असतील देशातील खासगी ट्रेनमधील सुविधा

By ऑनलाइन लोकमत | Published: August 13, 2020 12:13 PM

1 / 10
देशातील काही रेल्वेमार्गांवर खासगी तत्त्वावर ट्रेन चालवण्याची रेल्वेमंत्रालयाने परवानगी दिल्ल्यानंतर आता या ट्रेन कशा असतील याची उत्सुकता लोकांना लागली आहे. दरम्यान, खासगी तत्त्वावर चालणाऱ्या ट्रेनमध्ये वंदे भारत एक्स्प्रेसप्रमाणे काही अत्याधुनिका फिचर्स असतील, अशी माहिती मिळत आहे.
2 / 10
खासगी ट्रेनमध्ये इलेक्ट्रॉनिक स्लायडिंग डोअर्स, डबल ग्लेज्ड सेफ्टी ग्लाससोबत खिडक्या, पॅसेंजर सर्व्हिलान्स सिस्टीम आणि माहिती आणि प्रवासाच्या मार्गाची माहिती देणारा बोर्ड अशा सुविधा असतील. याशिवाय या ट्रेनमध्ये आपातकालीन टॉक-बॅक सिस्टिमही असेल. ज्याच्या मदतीने आपातकालीन परिस्थितीत प्रवाशांना रेल्वे कर्मचाऱ्यांकडून त्वरित मदत मिळवता येईल.
3 / 10
रेल्वे मंत्रालयाने तयार केलेल्या मसुद्यानुसार मार्च २०२३ पासून देशातील ५०६ मार्गावर नियोजनबद्ध रीतीने खासगी ट्रेन चालवल्या जातीत. या प्रत्येक ट्रेनमध्ये किमान १६ डबे असतील.
4 / 10
देशातील विविध रेल्वेमार्गावर धावणाऱ्या या खासगी ट्रेन कमाल ताशी १८० किमी वेगाने धावतील. या ट्रेनच्या दोन्ही बाजूल ड्रायव्हिंग कॅब असतील. तसेच किमान ३५ वर्षे टिकतील अशा पद्धतीने या ट्रेनची रचना केलेली असेल.
5 / 10
रेल्वे मंत्रालयाने दिलेल्या मसुद्यानुसार खासगी कंपन्यांना १४० सेकंदात ट्रेन ० ते १६० किमी वेग घेईल अशा पद्धतीने विकसित करावी लागेल. तसेच ट्रेनचा सरासरी वेग १६० किमी राहील. याशिवाय आणीबाणीच्या परिस्थितीत ब्रेक लावल्यावर धावती ट्रेन १२५० मीटर अंतरावर थांबली पाहिजे.
6 / 10
रेल्वेने या मसुद्यामध्ये प्रत्येक डब्यात वीजेवर चालणारे किमान चार दरवाजे असले पाहिजेत. हे दरवाजे दोन्ही बाजूला दोन दोनच्या प्रमामात असतील. तसेच हे दरवाजे बंद झाल्यानंतरच ट्रेन रवाना होईल. प्रवाशांची सुरक्षा हा प्राधान्य क्रमावरील विषय असेल.
7 / 10
या ट्रेनमधील प्रत्येक डब्यात झिको डिस्चार्ज टॉयलेट सिस्टिम असेल. तसेच ट्रेन बाहेरील आवाजापासून पूर्ण मुक्त असेल. प्रवासादरम्यान कंपन होऊ नये, तसेच दरवाजाजवळ एमर्जंसी बटण असेल ज्याद्वारे कर्मचाऱ्यांशी बोलता येईल. येणाऱ्या स्टेशनांची माहिती डिस्प्लेवर दिसेल. ही माहिती इंग्रजी, हिंदी आणि स्थानिक भाषेत असेल.
8 / 10
याशिवाय ट्रेनमध्ये सीसीटीव्ही नेटवर्क, सर्व्हिलान्स कॅमेरे, व्हाइस रेकॉर्डिंग अशा सुविधा असतील.
9 / 10
भारतीय रेल्वेने खासगी ट्रेन चालवण्यासाठी मागवलेल्या टेंडरमध्ये जीएमआर, सीएएफ इंडिया, एल्सटॉम, बंबार्डियर, सीमन्स, आयआरसीटीसी, मेधा, भेल, सीएएफ, स्टरलाइट, भारत फोर्ज, जेकेबी इन्फ्रास्ट्रक्चर आणि बीएचईएल यासारख्या बड्या कंपन्यांसह एकूण २३ कंपन्यांनी खासगी ट्रेन चालवण्यात स्वारस्य दाखवले आहे.
10 / 10
दरम्यान, खासगी ट्रेन चालवण्यासाठी खासगी कंपन्यांना तब्बल ३० हजार कोटींची गुंतवणुक करावी लागणार आहे.
टॅग्स :Indian Railwayभारतीय रेल्वेbusinessव्यवसायIndiaभारत