शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Indian Railways : रेल्वेचा मोठा निर्णय, आता 'या' डब्यांमध्येही प्रवाशांना मिळणार बेडरोलची सुविधा

By ऑनलाइन लोकमत | Published: September 16, 2022 11:38 AM

1 / 7
नवी दिल्ली : भारतीय रेल्वेने (Indian Railway) आपल्या प्रवाशांच्या सोयीसाठी मोठा विस्तार केला आहे. नवीन घोषणेनुसार, प्रवाशांना आता त्या डब्यांमध्येही बेडरोलची सुविधा मिळणार आहे, ज्या आतापर्यंत मिळत नव्हती.
2 / 7
एसी डब्यांसह रेल्वेने अनेक गाड्यांमध्ये कमी भाड्याचे थर्ड एसी इकॉनॉमी क्लास डबे देखील जोडण्यात आले आहेत. या क्लासचे तिकीट सामान्य थर्ड एसी क्लासपेक्षा कमी आहे, मात्र यामध्ये रेल्वेकडून आतापर्यंत बेडरोल दिले जात नव्हते.
3 / 7
आता या डब्यातील प्रवाशांना बेडरोलची सुविधाही देण्यात येणार असल्याचे भारतीय रेल्वे विभागाने म्हटले आहे. रेल्वे मंत्रालयाच्या घोषणेनुसार, 20 सप्टेंबर 2022 पासून, थर्ड एसी इकॉनॉमी क्लास डब्यातून प्रवास करणाऱ्या प्रवाशांना बेडरोल देखील देण्यात येईल.
4 / 7
आतापर्यंत थर्ड एसी इकॉनॉमी क्लासच्या डब्यांमध्ये बेडरोल ठेवण्यासाठी जागा नसल्याने रेल्वे विभाग चिंतेत होता. यावर तोडगा काढताना आता प्रत्येक बेडरोल ठेवण्यासाठी बर्थ क्रमांक 81, 82 आणि 83 वापरण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
5 / 7
अशा परिस्थितीत, 20 सप्टेंबर किंवा त्यानंतर, प्रवासी या बर्थ क्रमांकांवर आपले तिकीट आरक्षण करू शकणार नाहीत. ज्या प्रवाशांनी आधीच तिकीट बुक केले आहे आणि त्यांच्या प्रवासाची तारीख 20 सप्टेंबर नंतर असल्याचे रेल्वेने सांगितले आहे.
6 / 7
तसेच, जर प्रवाशांचा बर्थ क्रमांक 81, 82 आणि 83 असेल तर अशा प्रवाशांना रेल्वेच्या आपत्कालीन कोट्यातील इतर बोगींमध्ये बसवले जाईल. त्याची माहितीही संबंधित प्रवाशांना एसएमएसद्वारे उपलब्ध करून दिली जाणार आहे. 20 सप्टेंबरपासून प्रवासी थर्ड एसी इकॉनॉमी कोचमधील बर्थ क्रमांक 81, 82 आणि 83 वर तिकीट काढू शकणार नाहीत, असेही रेल्वेने स्पष्ट केले आहे.
7 / 7
कोरोना महामारीच्या काळात रेल्वे मंत्रालयाने देशात धावणाऱ्या सर्व गाड्यांमधील बेडरोल सुविधा बंद केली होती. दरम्यान, कोरोना विषाणूच्या संसर्गाचा प्रसार रोखण्यासाठी रेल्वेने हे पाऊल उचलले होते. नंतर जेव्हा परिस्थिती सामान्य झाली तेव्हा राजधानी, शताब्दी सारख्या गाड्यांमध्ये प्रथम बेडरोल सुविधा सुरू करण्यात आली आणि आता जवळपास सर्वच गाड्यांच्या एसी डब्यांमध्ये ही सुविधा दिली जात आहे.
टॅग्स :Indian Railwayभारतीय रेल्वेrailwayरेल्वे