शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Indian Railway:...तर तिकीट कॅन्सल करण्यासाठी लागणार नाही चार्ज! रेल्वेकडून मोठी अपडेट...

By ऑनलाइन लोकमत | Published: July 20, 2022 7:50 PM

1 / 7
नवी दिल्ली : जर तुम्हीही ट्रेनने प्रवास करत असाल तर तुमच्यासाठी एक आनंदाची बातमी आहे. तुमचा प्रवास अधिक आरामदायी करण्यासाठी भारतीय रेल्वेने (Indian Railway) आता एक नवीन सुविधा आणली आहे.
2 / 7
दरम्यान, भारतातील बहुतेक लोक रेल्वेने प्रवास करतात, म्हणून रेल्वेला भारताची लाईफलाईन देखील म्हटले जाते. रेल्वे प्रवाशांसाठी वेळोवेळी सुविधा देत असते. या रेल्वे प्रवाशांसाठी जबरदस्त सुविधा आणली आहे.
3 / 7
आता रेल्वेने प्रवाशांच्या तिकिटांबाबत नवा नियम केला आहे. आता तुम्ही काही मिनिटांतच तिकीट सहज रद्द किंवा कॅन्सल करू शकता. तुम्ही रेल्वे अॅप किंवा रेल्वेच्या वेबसाइटवर जाऊन तुमचे तिकीट रद्द (Rail Ticket cancellation) करू शकता.
4 / 7
आता रेल्वे ई-मेलद्वारे रेल्वे तिकीट रद्द करण्याची मोठी सुविधा देत आहे. भारतीय रेल्वेने ट्विट करून या सुविधेची संपूर्ण माहिती दिली आहे. रेल्वेने आपल्या अधिकृत ट्विटर हँडलवरून ट्विट केले आहे की, आता रेल्वे प्रवासी रेल्वेला ई-मेल करून आपले तिकीट रद्द करू शकतात.
5 / 7
दरम्यान, यापूर्वी एका प्रवाशाने तत्काळमध्ये तिकीट बुक केल्याची तक्रार ट्विटरवर रेल्वेकडे केली होती. पण, ट्रेन रद्द झाल्यामुळे त्याला प्रवासाचा दुसरा पर्याय निवडावा लागला. प्रवाशाने सांगितले की, तिकीट बुक करण्यासाठी अडचण आली. मात्र तिकीट रद्द करूनही परतावा मिळत नाही.
6 / 7
यावर रेल्वेने उत्तर दिले आहे.या ट्विटला उत्तर देताना रेल्वेने म्हटले की, 'जर प्रवासी स्वतःहून तिकीट रद्द करू शकत नसतील, तर तिकीट रद्द करण्यासाठी प्रवासी आपल्या नोंदणीकृत ई-मेल आयडीवरून etickets@irctc.co.in वर ई-मेल करून तिकीट रद्द करू शकतात.
7 / 7
रेल्वेने आपल्या दुसर्‍या ट्विटमध्ये माहिती दिली की, रेल्वे संचालन कारणांमुळे ट्रेन स्टेटसवर कॅन्सलेशनचा फ्लॅग ठेवते. शक्य असल्यास ट्रेन कोणत्याही वेळी पूर्ववत केली जाऊ शकते. चार्टिंगनंतर फायनल स्टेटस उपलब्ध होईल. त्यामुळे प्रवाशाने हे लक्षात ठेवावे. अन्यथा त्यांना रद्द करण्याचे शुल्क भरावे लागू शकते, असे रेल्वेने सांगितले आहे.
टॅग्स :Indian Railwayभारतीय रेल्वेrailwayरेल्वे