शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

जगातील सर्वात मोठे दानशूर आहेत भारतीय! 847574 कोटी रुपये केले दान, जाणून घ्या सविस्तर

By ऑनलाइन लोकमत | Published: January 10, 2024 11:57 AM

1 / 8
जगातील सर्वात मोठा दानशूर उद्योगपती हे भारतीय आहेत. आज त्यांनी स्थापन केलेले व्यवसाय भारतासह देशाला आणि जगभर नावलौकिक मिळवून देत आहेत. पण धर्मादाय क्षेत्रातही त्यांनी देशाचे नाव अभिमानाने उंचावले आहे.
2 / 8
जमशेदजी टाटा हे टाटा समूहाचे संस्थापक होते, जे २० व्या शतकातील जगातील सर्वात मोठे परोपकारी होते. त्यांनी १०२ अब्ज डॉलर्सची देणगी दिली. भारतीय चलनात हे अंदाजे ८४७५७४ कोटी रुपये असेल.
3 / 8
मायक्रोसॉफ्टचे सहसंस्थापक बिल गेट्स आणि त्यांची माजी पत्नी मेलिंडा गेट्स दुसऱ्या क्रमांकावर होते. त्यांनी ७४.६ अब्ज डॉलर्स दान केले.
4 / 8
ब्रिटीश-अमेरिकन फार्मा व्यावसायिक हेन्री वेलकम तिसऱ्या क्रमांकावर होते त्यांनी गेल्या शतकात ५६.७ अब्ज डॉलर्सची देणगी दिली.
5 / 8
हार्वर्ड ह्यू चौथ्या स्थानावर आहेत. ज्यांनी ३८.६ अब्ज डॉलर्स दान केले. हार्वर्ड एक अभिनेता, निर्माता, व्यापारी आणि वैमानिक होते. ते त्यांच्या काळातील सर्वात यशस्वी लोकांपैकी एक मानले जात असे.
6 / 8
बर्कशायर हॅथवेचे सर्वात मोठे शेअरहोल्डर आणि सीईओ वॉरेन बफे पाचव्या स्थानावर आहेत. जग त्यांना सर्वात मोठे गुंतवणूकदार म्हणून ओळखते. वॉरन बफे यांनी ३७.४ अब्ज डॉलर दान केले होते.
7 / 8
जॉर्ज सोरोस या यादीत सहाव्या स्थानावर आहेत. ते फक्त त्यांच्या परोपकारी कार्यांसाठी ओळखले जातात. त्यांनी ३४.८ अब्ज डॉलर्स दान केले. त्यांनी आपली बहुतांश संपत्ती धर्मादाय कार्यात गुंतवली.
8 / 8
जमशेदजी टाटा व्यतिरिक्त, ५० सर्वात मोठ्या दानशूर व्यक्तींच्या यादीत विप्रोचे संस्थापक अझीम प्रेमजी हे एकमेव भारतीय नाव आहे. या यादीत ते १२व्या स्थानावर आहेत. त्यांनी २२ अब्ज डॉलर्सची देणगी दिली आहे.
टॅग्स :Tataटाटाbusinessव्यवसाय