India's unemployment rate rises to 7.78%, highest in 4 months: CMIE MMG
देशातील बेरोजगारीच्या टक्केवारीत वाढ, ग्रामीण भागात उच्चांक By ऑनलाइन लोकमत | Published: March 02, 2020 11:44 AM1 / 12भारतातील बेरोजगारीचा दर फेब्रुवारी महिन्यात 7.78 टक्क्यांपर्यंत पोहोचला आहे.2 / 12यापूर्वी ऑक्टोबर 2019 मध्ये बेरोजगारी दराने उच्चांक गाठला होता, तेव्हा हा दर 7.16 टक्के एवढा होता. त्यामुळे गेल्या 4 महिन्यात पुन्हा बेरोजगारीचा दर वाढीस लागला आहे. 3 / 12(CMIC) सेंटर मॉनिटरींग इंडियन इकॉनॉमी रिसर्च संस्थेच्या अहवालाच्या आकडेवारीनुसार ही माहिती समोर आली आहे. 4 / 12भारतीय अर्थव्यवस्था 2019 मधील गेल्या 3 महिन्यांपासून कोलमडली आहे. विशेष म्हणजे चालू आर्थिक वर्षात गेल्या 6 वर्षातील सर्वात मोठी घसरण भारतीय अर्थव्यवस्थेची झाली आहे5 / 12देशातील अनेक उद्योगधंद्यावर अर्थव्यवस्थेचा परिणाम झाला असून बेरोजगारी वाढीस लागल्याचे दिसत आहे. 6 / 12ग्रामीण भागात मोठ्या प्रमाणात बेरोजगारी वाढताना दिसत आहे. ग्रामीण भागातील बेरोजगारीचा दर फेब्रुवारी महिन्यात 7.37 टक्क्यांपर्यंत पोहोचला आहे. गेल्या महिन्यात हीच बेरोजगारी 5.97 टक्क्यांपर्यंत होती. 7 / 12शहरी भागात मात्र गत महिन्याच्या तुलनेत बेरोजगारीचा दर वाढला आहे. गेल्या महिन्यात 9.70 टक्के असलेला दर फेब्रवारी महिन्यात 8.65 टक्क्यांपर्यंत खाली आला आहे. 8 / 12मुंबई स्थित सेंटर फॉर मॉनिटरींग इंडियन इकॉनॉमिनीने (CMIE) ही आकडेवारी जाहीर केली आहे. 9 / 12चीनमधील कोरोना व्हायरसचाही परिणाम देशातील अर्थव्यवस्थेवर झाला आहे. 10 / 12 जगातील अनेक देशांत कोरोनाचा झालेला संसर्ग, जगातील शेअर बाजारांत झालेली घसरण, परकीय वित्तसंस्थांकडून मोठी विक्री आणि मुडीजने घटविलेला जागतिक अर्थव्यवस्थेच्या वाढीचा अंदाज यांमुळे मुंबई शेअर बाजारातही मोठी घसरण झाली.11 / 12याचा अर्थव्यवस्थेवर परिणाम झाला असून बेरोजगारी दर वाढल्याचे दिसून येत आहे. 12 / 12CMIE ने नोव्हेंबर ते फेब्रवारी या 4 महिन्यातील बेरोजगारीची आकडेवारी जाहीर केली आहे. आणखी वाचा Subscribe to Notifications