indigo launches special 10 percent discount on its flights for vaccinated customers
Corona Vaccine: लस घ्या आणि १० टक्के सूट मिळवा; ‘या’ विमान कंपनीची भन्नाट ऑफर By ऑनलाइन लोकमत | Published: June 23, 2021 4:05 PM1 / 10देशात कोरोनाची दुसरी लाट बऱ्यापैकी ओसरताना दिसत आहे. मात्र, कोरोनाच्या तिसऱ्या लाटेचा इशारा तज्ज्ञांकडून वारंवार दिला जात आहे. यासंदर्भात सरकारने आतापासून तयारी करायला सुरुवात केली आहे. 2 / 10कोरोना नियंत्रणासाठी लसीकरणावर अधिकाधिक भर दिला जात आहे. कोरोना प्रतिबंधात्मक लसीकरणाला प्रोत्साहन देण्यासाठी एका विमान कंपनीने तिकिटावर सवलत जाहीर केली आहे. 3 / 10देशात आघाडीची विमान कंपनी असलेल्या इंडिगोने प्रवाशांकरिता विशेष सवलत आणली आहे. लशीचा किमान एक डोस घेतला असल्यास प्रवाशाला तिकिटावर १० टक्के सवलत मिळणार आहे. 4 / 10कंपनीकडून देण्यात आलेल्या माहितीनुसार, ही सवलत योजना मर्यादित काळासाठी आहे. ज्या प्रवाशांनी किमान एक तरी डोस घेतला असेल अशा प्रवाशाला तिकिटावर १० टक्के सवलत मिळेल.5 / 10ही सवलत घेण्यासाठी प्रवाशाला विमानतळावरील कंपनीच्या काउंटरवर किंवा बोर्डिंग गेटवर लस घेतल्याचे प्रमाणपत्र सादर करावे लागेल, असे कंपनीकडून सांगण्यात आले आहे. 6 / 10याशिवाय, प्रवाशांना आरोग्य सेतू ऍपवर देखील लस घेतल्याचा स्टेट्स दाखवता येईल. देशातील मोठी विमान कंपनी म्हणून आम्हाला जबाबदारीची जाणीव आहे. 7 / 10राष्ट्रीय पातळीवरील लसीकरण मोहीमेला प्रोत्साहन देण्यासाठी कंपनीने तिकीट दरावर सवलत देऊन प्रयत्न केला आहे, असे इंडिगोचे मुख्य महसूल अधिकारी संजय कुमार यांनी सांगितले.8 / 10केंद्रीय आरोग्य मंत्रालयाकडून देण्यात आलेल्या माहितीनुसार, गेल्या २४ तासांत देशभरात ५० हजार ८४८ नवे कोरोनाबाधित रुग्ण आढळले आहेत.9 / 10देशाचा रिकव्हरी रेट वाढून ९६.५६ टक्क्यांवर पोहोचला आहे.. दिवसाचा पॉझिटिव्हिटी रेट थोडा वाढून २.६७ टक्क्यांवर गेला आहे. गेल्या २४ तासांत कोरोनामुळे १३५८ जणांचा मृत्यू झाला आहे. 10 / 10मंगळवारी ६८ हजार ८१७ रुग्णांना रुग्णालयातून सुटी देण्यात आलीय. देशात सध्या ६ लाख ४३ हजार १९४ रुग्णांवर उपचार सुरू आहेत. आणखी वाचा Subscribe to Notifications