Happy B'Day Ratan Tata : ...म्हणून अब्जाधीश रतन टाटांनी केलं नाही लग्न; स्वतःच सांगितलं होतं असं कारण By श्रीकृष्ण अंकुश | Published: December 28, 2020 2:14 PM
1 / 14 टाटा समुहाचे माजी अध्यक्ष रतन टाटा यांनी संपूर्ण आयुष्यभर कुणाशीही लग्न केले नाही. मात्र, असे नाही, की रतन टाटा यांनी कुणावर प्रेमच केले नाही. एका मुलाखतीत त्यांनी स्वतःच आपल्या लव्ह लाईफसंदर्भात भाष्य केले होते. 2 / 14 त्यांच्या आयुष्यात एकदा नव्हे, तर तब्बल चार वेळा प्रेमाची एन्ट्री झाली. मात्र, कठीन परिस्थितीपुढे त्यांच्या नात्याची दोर कमकुवत पडली. यानंतर रतन टाटा यांनी पुन्हा कधीही लग्नाचा विचार केला नाही. चला, तर रतन टाटा यांच्या 83व्या वाढदिवसानिमित्त एक नजर टाकूयात त्यांच्या लव्ह लाईफवर... 3 / 14 दिग्गज बिझनेसमन रतन टाटा यांचा जन्म 28 डिसेंबर 1937मध्ये सुरत येथे झाला होता. टाटा समुहाचे माजी अध्यक्ष रतन टाटा यांनी आपली एक वेगळी ओळख निर्माण केली आणि एक विशेष स्थानही मिळवले. 4 / 14 रतन टाटा यांनी टाटा समुहालाही एका विशेष उंचिवर पोहोचवले. बिझनेसच्या दुनियेत रतन टाटा यांनी मोठे यश मिळवले. मात्र, प्रेमाच्या बाबतीत ते अयशस्वी ठरले. 5 / 14 एका टिव्ही चॅनलला दिलेल्या मुलाखतीत अविवाहित उद्योगपती रतन टाटा यांनी आपल्या लव्ह लाईफसंदर्भात खुलासा केला होता. ते म्हणाले होते, की तेही प्रेमात पडले होते, मात्र ते आपल्या प्रेमाचे रुपांतर लग्नात करू शकले नाही. 6 / 14 टाटा म्हणले, दूरचा विचार करता त्यांना वाटते, की अविवाहित रहणे हे त्यांच्यासाठी चांगलेच ठरले. कारण, त्यांनी लग्न केले असते, तर परिस्थिती आणखी गुंतागुंतीची झाली असती. 7 / 14 टाटा म्हणाले, जर तुम्ही विचाराल, की मी कधी प्रेम केले होते, का? तर तुम्हाला सांगतो, की मी चार वेळा गांभीर्याने लग्नासाठी तयार झालो आणि प्रत्येक वेळा कुठल्या ना कुठल्या कारणाने मागेही हटलो. 8 / 14 आपल्या प्रेमाच्या दिवसांसंदर्भात बोलताना टाटा म्हणाले, अमेरिकेत काम करत असताना मी प्रेमाच्या बाबतीत सर्वात गंभीर झालो होतो. मात्र, मी पुन्हा भारतात आल्यानेच आम्ही लग्न करू शकलो नाही. 9 / 14 रतन टाटा यांच्या प्रेयसीची भारतात येण्याची इच्छा नव्हती. त्याच वेळी भारत आणि चीन यांचे युद्ध सुरू होते. अखेर त्यांच्या प्रेयसीने अमेरिकेतच एका व्यक्तीशी लग्न केले. 10 / 14 यावेळी टाटा यांना एक प्रश्नही विचारण्यात आला होता, की ते ज्यांच्यावर प्रेम करत होते, त्या अद्यापही शहरात आहेत? यावर टाटा यांनी केवळ 'हो' म्हणून उत्तर दिले आणि पुढे काहीही सांगण्यास नकार दिला होता. 11 / 14 रतन टाटा यांचा जन्म एका सधन कुटुंबात झाला होता. मात्र, त्यांचे जीवन फारसे सोपे नव्हते. रतन टाटा केवळ 7 वर्षांचे असतानाच त्यांचे पालक विभक्त झाले. त्यांचे पालन-पोषण त्यांच्या आजींनी केले. 12 / 14 रतन टाटा यांना कारचा छंद आहे. त्यांच्या देखरेखीत समुहाने, लँड रोव्हर, जगुआर, रेंजरोव्हर अॅक्वायर केल्या. सर्वसामान्यांना टाटा नॅनोचे गिफ्ट देणारेही रतन टाटाच होते. रतन टाटा यांना विमान उडवण्याचा आणि पियानो वाजविण्याचाही छंद आहे. 13 / 14 आपल्या रिटायरमेंटनंतर टाटा म्हणाले होते, की आता मला माझे छंद पूर्ण करण्याची इच्छा आहे. आता मी पियानो वाजवणार आणि विमान उडवण्याचा माझा छंद पूर्ण करीन. 14 / 14 भारत सरकारने रतन टाटा यांना पद्म भूषण (2000) आणि पद्म विभूषण (2008)ने सन्मानित केले आहे. हे देशातील तिसऱ्या आणि दुसऱ्या क्रमांकाचे सर्वात मोठे नागरी सन्मान आहेत. आणखी वाचा