inflation : petrol diesel price lpg price and cng price hike in march after elections
मार्चमध्ये महागाईचा झटका; पेट्रोल-डिझेल-गॅस एवढेच नाही तर आतापर्यंत 'या' गोष्टी महागल्या By ऑनलाइन लोकमत | Published: March 22, 2022 1:08 PM1 / 8 मार्च महिना कोणत्याही व्यक्तीसाठी खूप महत्त्वाचा असतो. आर्थिक वर्षाचा हा शेवटचा महिना आहे. यानंतर 1 एप्रिलपासून नवीन आर्थिक वर्ष सुरू होत आहे. अशा परिस्थितीत लोक नवीन आर्थिक वर्षाच्या अर्थसंकल्पासोबतच गुंतवणुकीची तयारी सुरू करतात, मात्र हा मार्च सर्वसामान्यांसाठी खूपच कठीण जात आहे. याचे कारण म्हणजे मार्च महिन्याच्या पहिल्या दिवसापासूनच वाढत असलेल्या महागाईमुळे जनतेला सातत्याने झटके बसत आहेत.2 / 8मार्चच्या पहिल्या आठवड्यातच अमूल, पराग आणि नंतर मदर डेअरीने दुधाचे दर लिटरमागे दोन रुपयांनी वाढवले. नुकतीच मध्य प्रदेशात सक्रिय असलेल्या सांचीने दुधाच्या दरात लिटरमागे पाच रुपयांनी वाढ केली आहे. यामुळे सर्वसामान्यांना मोठा धक्का बसला, कारण भारतातील प्रत्येक घरात दररोज दुधाचे सेवन होते.3 / 8मंगळवारपासून (दि.22) एलपीजी सिलिंडर 50 रुपयांनी महागला आहे. त्यामुळे दिल्लीत 14.2 किलो एलपीजी सिलिंडरची किंमत 949.50 रुपये झाली आहे. त्याचप्रमाणे मुंबईत एलपीजी गॅस सिलिंडरची (LPG Gas Cylinder) किंमत 949.50 रुपयांपर्यंत वाढली आहे. पाटणामध्ये एलपीजी गॅस सिलिंडरची किंमत 1047.50 रुपयांवर पोहोचली आहे. एलपीजी सिलिंडरच्या दरात ऑक्टोबरपासून ही वाढ झाली आहे.4 / 8तेल विपणन कंपन्यांनी मंगळवारी (दि.22) पेट्रोल आणि डिझेलच्या दरात (Petrol-Diesel Price) प्रतिलिटर 80 पैशांनी वाढ केली. पेट्रोल आणि डिझेलच्या दरात बऱ्याच काळानंतर ही वाढ झाली आहे. या वाढीनंतर दिल्लीत एक लिटर पेट्रोलची किंमत 96 रुपये 21 पैशांवर पोहोचली आहे. तर डिझेलचा दर 87.47 रुपयांवर पोहोचला आहे.5 / 8उत्तर प्रदेशसह पाच राज्यांतील विधानसभा निवडणुका संपताच दिल्ली-एनसीआरसह अनेक शहरांमध्ये सीएनजीच्या दरात 50 पैशांपासून एक रुपयापर्यंत वाढ झाली आहे. या वाढीनंतर राष्ट्रीय राजधानी दिल्लीत सीएनजीची किंमत (CNG Price) 57.01 रुपये प्रति किलोवरून 50 पैशांनी वाढून 57.51 रुपये प्रति किलो झाली आहे.6 / 8तेल विपणन कंपन्यांनी अलीकडेच बल्क ग्राहकांसाठी डिझेलच्या दरात प्रतिलिटर 25 रुपयांची वाढ केली होती. रेल्वे, राज्य मार्ग परिवहन महामंडळे, बस वाहतूकदार, मॉल्स आणि संरक्षण क्षेत्रातील आस्थापना प्रामुख्याने बल्क ग्राहकांमध्ये येतात. त्यामुळे या क्षेत्रांशी संबंधित सेवा महागण्याची भीती निर्माण झाली आहे.7 / 8या महिन्यात नेस्लेने मॅगीच्या छोट्या पॅकची किंमत 12 रुपयांवरून 14 रुपयांपर्यंत वाढवली आहे. कंपनीने मॅगीच्या प्रत्येक पॅकेटची किंमत वाढवली आहे. यासोबतच कंपनीने चहा, कॉफी आणि दुधाच्या दरातही वाढ केली आहे. तसेच, FMCG कंपनी हिंदुस्तान युनिलिव्हरनेही या उत्पादनांच्या किमती वाढवल्या आहेत. खर्चात वाढ झाल्याचे कारण देत कंपन्यांनी या उत्पादनांच्या किमती वाढवल्या आहेत.8 / 8देशातील किरकोळ महागाई फेब्रुवारी 2022 मध्ये आठ महिन्यांच्या उच्चांकावर पोहोचली असताना या जीवनावश्यक वस्तूंच्या किमती वाढल्या आहेत. फेब्रुवारीमध्ये किरकोळ महागाई 6.07 टक्के होती. त्याचवेळी घाऊक महागाईचा दरही गेल्या महिन्यात 13.11 टक्क्यांवर पोहोचला. रिटेल महागाई आरबीआयच्या कम्फर्ट झोनच्या बाहेर गेली आहे. किरकोळ महागाई दर 2-6 टक्क्यांच्या आत ठेवण्याचे लक्ष्य सरकारने आरबीआयला दिले आहे. चलनविषयक धोरणाच्या आढाव्यात आरबीआय महागाईचा डेटा विचारात घेते. आणखी वाचा Subscribe to Notifications