शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

स्टार्टअपच्या क्षेत्रात इतिहास घडवणाऱ्या जगातील पहिल्या 'युनिकॉर्न कपल'ची प्रेरणादायी कहाणी...

By ऑनलाइन लोकमत | Published: May 14, 2022 2:57 PM

1 / 10
बिझनेस जगतात रुची कालरा आणि आशिष महापात्रा या कपलची जोरदार चर्चा आहे. युनिकॉर्न क्लबमध्ये अशाच स्टार्टअपचा समावेश होतो ज्यांची व्हॅल्यू १०० कोटी डॉलर म्हणजेच ७७०० कोटी रुपयांहून अधिक असते.
2 / 10
विशेष बाब म्हणजे दोघांच्या स्टार्टअपला सुरुवात होण्यामध्ये फक्त एका वर्षाचा फरक आहे. आशिष महापात्रा यांनी 'ऑफ बिझनेस' नावाचा त्यांचा स्टार्टअप बिझनेस 2016 साली सुरू केला होता. तर रची कालरा यांनी 'ऑक्सीजो' नावाचा स्टार्टअप २०१७ साली सुरू केला होता.
3 / 10
३८ वर्षीय रुची कालरा यांचा जन्म दिल्लीतील एका पंजाबी कुटुंबात झाला आहे. त्यांच्या सुरुवातीपासूनच नेतृत्वगुण होते. त्या स्टूडंट बॉडी इलेक्टेड मेंबर देखील राहिल्या आहेत. रुची यांनी इंडियन स्कूल ऑफ बिझनेसमधून MBA केलं आहे. तर आयआयटी दिल्लीतून बीटेक केलं आहे.
4 / 10
४२ वर्षीय आशिष हे मूळचे ओदिशातील रहिवासी आहेत. ओदिशातील कटकमध्ये जन्म झालेल्या आशिष यांचं सुरुवातीचं शिक्षण एससीबी मेडिकल पब्लिक स्कूलमधून झालं. त्यांनी इंडियन स्कूल ऑफ बिझनेसमधून एमबीए केलं आहे.
5 / 10
तसंच आशिष यांनी आयआयटी खडगपूरमधून बीटेक केलं आहे. अत्यंत संयमान काम करण्याच्या पद्धतीसाठी ते ओळखले जातात. आयआयटीमधून शिक्षण घेतल्यानंतर दोघांनी मॅकिंजे अँड कंपनीमध्ये काम केलं. याच ठिकाणी रुची आणि आशिष यांची भेट झाली.
6 / 10
यशस्वी व्यावसायिक बननण्याचं दोघांचंही स्वप्न होतं. दोघांची मैत्री झाली आणि मैत्रीचं रुपांतर प्रेमात झालं. नंतर दोघांनी लग्न देखील केलं.
7 / 10
आशिष यांनी २०१६ साली स्टार्टअपला सुरुवात केली. ऑफबिझनेस नावानं स्टार्टअप सुरू केलं. यात मॅन्यूफॅक्चरिंग आणि इन्फास्ट्रक्चर क्षेत्रात कच्चा माल पुरवण्याचं काम ते करू लागले. तसंच कर्ज देण्याचीही सुविधा सुरू केली.
8 / 10
एका वर्षानंतर २०१७ साली रुची यांनी आपले पती आशिष आणि आणखी तीन लोकांना सोबत घेऊन ऑक्सीजो नावाची स्टार्टअप कंपनी सुरू केली. या स्टार्टअपच्या माध्यमातून कोणत्याही गॅरंटीविना लघु आणि मध्यम उद्योगांना कर्ज उपलब्ध करुन देण्याचं काम त्यांनी हाती घेतलं.
9 / 10
रुची यांनी सुरू केलेल्या स्टार्टअपच्या माध्यमातून कमीत कमी व्याज दरात गरजूंना ७२ तासांच्या आत कर्ज मिळू शकलं. त्यामुळेच या स्टार्टअपला खूप पसंती मिळाली आणि यशस्वी देखील झाला.
10 / 10
रुची आधीपासूनच इन्श्यूरन्स आणि रिटेल बॅकिंगशी निगडीत आहेत. तर आशिष महापात्रा मॅकिंजे अँड कंपनीमध्ये एंगेजमेंट मॅनेजर होते. दोघांनाही अनुभव त्यांना त्यांच्या स्टार्टअपमध्ये कामी आला. जर एखादं लक्ष्य आपण प्रॅक्टिकल अप्रोच ठेवून गाठण्याचा प्रयत्न केला आणि उपलब्ध संसाधनांचा योग्य पद्धतीनं वापर केला तर यश निश्चित आहे असं दोघांनाही वाटतं.
टॅग्स :businessव्यवसाय