शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Post Office : फक्त 299 रुपयांत मिळेल 10 लाखांचा विमा कव्हर; जाणून घ्या कसा होईल फायदा?

By ऑनलाइन लोकमत | Published: July 17, 2022 4:41 PM

1 / 8
कोरोनाच्या काळात सर्वांना आरोग्य विम्याबाबत (Health Insurance) जास्त जाणीव झाली. आता ज्यावेळी एखाद्याला आरोग्य विमा किंवा विमा कव्हरबद्दल सांगितले जाते, त्यावेळी त्याला फार काही सांगण्याची गरज नाही. त्याला स्वतःला आरोग्य विम्याबद्दल जाणून घ्यायचे आहे.
2 / 8
परंतु महागड्या विम्याचा हप्ताही महाग असतो, त्यामुळे अनेक वेळा लोक विमा काढण्याचे टाळतात. हे लक्षात घेऊन, भारतीय पोस्ट ऑफिसच्या (Indian Post office) इंडिया पोस्ट पेमेंट्स बँकेने एक विशेष सामूहिक दुर्घटना सुरक्षा विमा आणला आहे.
3 / 8
या अंतर्गत, तुम्हाला फक्त 299 आणि 399 रुपयांच्या प्रीमियमसह एका वर्षात 10 लाख रुपयांचा विमा मिळतो. इंडिया पोस्ट पेमेंट्स बँक (India Post Payments Bank) आणि टाटा एआयजी (Tata AIG) यांच्यात एक करार झाला आहे.
4 / 8
या करारानुसार 18 ते 65 वयोगटातील व्यक्ती या सामूहिक दुर्घटना विमा संरक्षणाचा लाभ घेऊ शकतात. दोन्ही प्रकारच्या विमा संरक्षणात, अपघातामुळे मृत्यू, कायमचे किंवा अंशतः पूर्ण अपंगत्व, पक्षाघाताने 10 लाख रुपयांचे संरक्षण मिळेल.
5 / 8
दुसरीकडे, 1 वर्षाच्या समाप्तीनंतर, पुढील वर्षी या विम्याचे नूतनीकरण देखील करावे लागेल. यासाठी लाभार्थीचे इंडिया पोस्ट पेमेंट्स बँकेत खाते असणे आवश्यक आहे.
6 / 8
दरम्यान, या विम्याची सर्वात चांगली गोष्ट म्हणजे कोणत्याही अपघातामुळे तुम्ही रुग्णालयात दाखल आहात. या दरम्यान, तुम्हाला उपचारासाठी 60,000 रुपयांपर्यंतचा IPD खर्च मिळेल आणि OPD मध्ये 30,000 रुपयांपर्यंतचा क्लेम मिळेल.
7 / 8
दुसरीकडे, वरील सर्व लाभांव्यतिरिक्त 399 रुपयांच्या प्रीमियम विम्यामध्ये 2 मुलांच्या शिक्षणासाठी 1 लाख रुपयांपर्यंत, 10 दिवसांसाठी रुग्णालयात 1000 दैनंदिन खर्च, इतर कोणत्याही शहरात राहत असल्यास कुटुंबासाठी वाहतूक खर्च 25,000 रुपयांपर्यंत खर्च आणि मृत्यू झाल्यास अंतिम संस्कारासाठी 5,000 रुपयांपर्यंतचा खर्च दिला जाईल.
8 / 8
या विमा सुविधेत नोंदणीसाठी लोक आपल्या जवळच्या पोस्ट ऑफिसशी संपर्क साधू शकतात.
टॅग्स :Post Officeपोस्ट ऑफिस