शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Insurance: फक्त 399 Rs: टाटा AIG अन् पोस्ट खात्याची गरिबांसाठी 'लय भारी' विमा योजना

By ऑनलाइन लोकमत | Published: July 22, 2022 8:25 PM

1 / 9
भारतीय डाक विभागाच्या एका योजनेनुसार अवघ्या 299 आणि 399 च्या वार्षिक हप्त्यामध्ये (Yearly installments) विमाधारकास (Policy Holder) 10 लाख रुपयांपर्यंत विमा संरक्षण मिळणार आहे.
2 / 9
भारतीय टपाल खाते (Indian Post Office) आणि टाटा एआयजी विमा कंपनीने (Tata AIG Insurance Company) विमा क्षेत्रातील योजना आणली आहे. अवघ्या 299 आणि 399 च्या वार्षिक हप्त्यामध्ये (Yearly installments) विमाधारकास (Policy Holder) 10 लाख रुपयांपर्यंत विमा संरक्षण मिळणार आहे.
3 / 9
टपाल खात्याच्या या अभिनव योजनेचा देशातील गरिब आणि मध्यम वर्गासाठी मोठा फायदा होणार आहे. हा मोठा वर्ग आतापर्यंत स्वस्तातील विमा योजनेच्या प्रतिक्षेत होता.
4 / 9
या विमा योजनेला टपाल खात्याची विश्वासहर्यता उपयोगी पडणार आहे. वर्षभरात या योजनेचे विमा संरक्षण विमाधारकाला प्राप्त होईल. ही योजना 18 ते 65 वयांतील व्यक्तींसाठी आहे या योजनेचा फायदा जास्तीत जास्त लोकांना होईल.
5 / 9
त्यासाठी, प्रत्येक टपाल कार्यालयातंर्गत (Post Offices) व्यापक प्रचार मोहीम राबविण्यात येणार आहे. ही योजना प्रभावीपणे राबविण्यासाठी टपाल खाते आणि टाटा एआयजी विमा कंपनीत सामंजस्य करार (Tie Up) करण्यात आला आहे.
6 / 9
ही योजना प्रत्येक टपाल कार्यालयातंर्गत अटी व शर्तींसह तुम्हाला विमा संरक्षण देईल. योजनेची वैशिष्ट्ये जाणून घेण्यासाठी नजीकच्या पोस्ट कार्यालयात संपर्क साधा.
7 / 9
या योजनेत व्यक्तीला अवघ्या 299 किंवा 399 रुपयांच्या हप्तामध्ये एका वर्षात 10 लाख रुपयांपर्यंतचा विमा मिळवू शकते. यामध्ये विमाधारकाचा अपघाती मृत्यू (Accidental Death), अपंगत्व किंवा कायमचे आंशिक अपंगत्व असल्यास 10 लाख रुपयांपर्यंतचे संरक्षण दिले जाईल.
8 / 9
याशिवाय या विम्यामध्ये रुग्णालयात दाखल झाल्यास 60 हजार रुपयांपर्यंतचा खर्च आणि रुग्णालयात दाखल न होता घरी उपचार घेतल्यास 30 हजार रुपयांपर्यंतचा दावाही दाखल करता येईल.
9 / 9
कोणत्याही कारणाने अपघातात व्यक्तीचा मृत्यू झाल्यास अंतिम संस्कारासाठी 5 हजार रुपये व या विम्यांतर्गत किमान दोन मुलांच्या शिक्षणासाठी 1 लाख रुपयांपर्यतची रक्कम देण्यात येणार आहे.
टॅग्स :Post Officeपोस्ट ऑफिसAccidentअपघातDeathमृत्यूTataटाटा