शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Insurance tips: नशा, अपघात, मृत्यू... क्लेम रिजेक्ट; या 8 कारणांमुळे विम्याचे पैसे मिळत नाहीत

By ऑनलाइन लोकमत | Published: July 29, 2021 4:38 PM

1 / 11
आपल्या पश्चात अकाली मृत्यू झाल्यानंतर आपल्या स्वकीयांची अबाळ होऊ नये म्हणून विमा काढला जातो. ही विम्याची रक्कम आपल्या मागे राहिलेल्या कुटुंबासाठी मोठा आधार असते. या विम्याच्या प्रकाराला टर्म इन्शुरन्स म्हणतात. (what are the possibility to reject term insurance.)
2 / 11
आजच्या या काळात टर्म इन्शुरन्स प्रत्येकाला आवश्यक आहे. कुटुंबाला आर्थिक सुरक्षा देण्यासाठी लोक टर्म प्लॅन घेतात. परंतू असे अनेकदा होते की विमा कंपन्या क्लेम रिजेक्ट करतात. यामागे चूक ही त्या पॉलिसीधारकाची असते. चला जाणून घेऊया या चुका काय काय असू शकतात. (Term insurance Rejection reasons)
3 / 11
केवळ टर्म प्लॅन घेतल्याने काही होत नाही, तर त्याचे नियमही पाळावे लागतात. टर्म प्लॅनमध्ये सर्व प्रकारच्या मृत्यूंवर विमा कवच मिळत नाही. जर तुम्ही पॉलिसी घेतली असेल किंवा घेण्याच्या विचारात आहात तर हे जाणून घेणे खूपच गरजेचे आहे. जेणेकरून तुम्ही खरोखरच तुमच्या फॅमिलीला सुखात ठेवू शकाल. (Top reasons for term life insurance claim rejection ?)
4 / 11
पॉलिसीधारकाने आत्महत्या केली तर दोन प्रकारे विमा राशी मिळते. टर्म प्लॅन घेतल्याच्या एक वर्षाच्या आत जर पॉलिसीधारकाने आत्महत्या केली तर लिंक्ड प्लॅन (युलिप) मध्ये त्याच्या नॉमिनीला 100 टक्के पॉलिसी फंड व्हॅल्यू मिळते. नॉन लिंक्ड प्लॅनमध्ये नॉमिनीला दिलेल्या प्रमिअमच्या 80 टक्के राशी मिळते.
5 / 11
जर पॉलिसीधारकाची हत्या झाली आणि त्याचा आरोप जर नॉमिनीवर आला, तर विमा कंपन्या क्लेम होल्डवर ठेवतात. नॉमिनी निर्दोष बाहेर पडला तर त्याला विम्याची राशी दिली जाते.
6 / 11
जर पॉलिसीधारक कोणत्याही गुन्हेगारी प्रकरणात अडकला असेल आणि त्याची हत्या झाली तर त्याच्या कुटुंबाला विम्याची रक्कम नाकारली जाते. इरडाने तसे नियम बनविलेले आहेत. (Why Do Term Insurance Claims Gets Rejected?)
7 / 11
जर पॉलिसीधारकाचा खतरनाक स्टंट करताना मृत्यू झाला तर विमा कंपन्या क्लेम रिजेक्ट करतात. वाहन रेस, स्काय डायव्हिंग, स्कुबा डायव्हिंग, पॅराग्लायडिंग आणि बंजी जंपिंगसारखे प्रकार यामध्ये मोडतात.
8 / 11
दारुच्या किंवा अन्य कोणत्याही अंमली पदार्थाच्या नशेत वाहन चालवत असताना अपघाती मृत्यू झाला तर क्लेम मिळत नाही. ड्रग्स किंवा दारुच्या अतीसेवनामुळे मृत्यू झाल्याचे क्लेमही रिजेक्ट केले जातात. हे आधीपासूनच पॉलिसीमध्ये म्हटलेले असते.
9 / 11
टर्म पॉलिसी घेताना गंभीर आजार लपविल्यास किंवा पॉलिसी घेतल्यानंतर याच गंभीर आजाराने त्याचा मृत्यू झाला तर विमा कंपन्या क्लेम रिजेक्ट करतात. याशिवाय एचआयव्ही, एड्समुळे मृत्यूवरही क्लेम मिळत नाही.
10 / 11
जर पॉलिसीधारकाचा मृत्यू नैसर्गिक आपत्तीमध्ये झाल्यास क्लेमची राशी मिळत नाही. विमा कंपन्या भूकंप, वादळात मृत्यू झाल्यास क्लेम रिजेक्ट करतात.
11 / 11
जर कोणत्याही महिलेचा प्रसुतीदरम्यान मृत्यू झाला तर बऱ्याचदा नॉमिनीला रक्कम मिळत नाही. सामान्य टर्म पॉलिसीमध्ये या गोष्टी कव्हर होत नाहीत. यामुळे पॉलिसी घेताना त्याची योग्य माहिती घेणे आवश्यक आहे. (term life insurance claim rejection)
टॅग्स :AccidentअपघातHealthआरोग्य