interest rates and tax benefits on various government schemes post office
पोस्टाच्या सहा जबरदस्त योजना; लॉकडाऊनच्या काळात गुंतवणूक करा अन् मिळवा मोठा लाभ By ऑनलाइन लोकमत | Published: June 15, 2020 12:50 PM1 / 16लॉकडाऊनम बऱ्याचदा आपल्याला गुंतवणुकीची चिंता सतावत असते. कुठल्या योजनेत गुंतवणूक करायची, याचाच विचार आपण करत असतो, काही जण बँकेत गुंतवणूक करणाऱ्या प्राधान्य देतात. पण पोस्टातही गुंतवणूक करणं हे जास्त फायद्याचं असतं. 2 / 16पोस्टात केलेल्या गुंतवणुकीवर आपल्याला चांगला नफा मिळतो. कमी वेळात पोस्टात गुंतवलेली रक्कम चांगला परतावा मिळवून देते. पोस्टात जवळपास नऊ पद्धतीच्या बचत योजना आहेत. त्यातील पाच योजनांना सेक्शन 80 सीअंतर्गत करातून सूट दिली जाते.3 / 16मुलींचे शिक्षण आणि त्यांच्या विवाहाच्या तरतुदीसाठी अल्पबचतीस प्रोत्साहन देण्याकरिता डिसेंबर 2014मध्ये सुकन्या समृद्धी योजना सुरू केली. मुलींच्या घटत्या जन्मदराची चिंता सतावत असताना त्यांच्या उत्कर्षासाठी काढण्यात आलेल्या सुकन्या योजनेचाही ग्राहकांनी भरभरून लाभ घेतला.4 / 16केंद्र सरकारनं या योजनेमध्ये आणखी सुधारणा करून नियमांमध्ये काही बदल केले आहेत. सरकारनं या योजनेंतर्गत मिळणारे व्याजदर 7.6 टक्के केले आहे. या योजनेत कमीत कमी 250 रुपये आणि जास्तीत जास्त 1.50 लाख रुपयांची गुंतवणूक करता येते. तसेच या योजनेला सेक्शन 80 सीअंतर्गत करातून सूटही मिळते. 5 / 16हे खाते कोणत्याही सामान्य बँकेच्या खात्याप्रमाणे काम करते आणि त्यात एटीएम कार्ड, चेकबुक आणि पासबुकची सुविधा आहे. त्यात गुंतविलेल्या रकमेवर वर्षाकाठी चार टक्के व्याज दिले जाते, ज्यावर कर लावला जातो, 6 / 16मात्र त्यावर टीडीएस कापला जात नाही. प्राप्तिकर कायद्याच्या कलम 80 सीअंतर्गत या बचत खात्यावर १०,००० रुपयांपर्यंतचे व्याज करमुक्त आहे.7 / 1660 वर्षं वयाची व्यक्तीही या योजनेत खातं उघडू शकते. 55 ते 60 वर्षं वयाच्या व्यक्ती निवृत्तीच्या तीन महिने आधीही या योजनेत खातं खोलून पैसे गुंतवू शकतात. खातं उघडल्यानंतर आपल्याला कमीत कमी 1000 रुपये जमा ठेवावे लागतात. 8 / 16या खात्यात तुम्ही जास्तीत जास्त 15 लाख रुपये साठवून ठेवू शकता. ज्यावर तुम्हाला वर्षाला 7.9 टक्के व्याज मिळते. या योजनेची मर्यादा पाच वर्षांची असते. वरिष्ठ नागरिक बचत योजनेवर व्याज 31 मार्च/30 सप्टेंबर/ 31 डिसेंबरला जमा करण्याच्या तारखेपासून लागू होते. 9 / 16त्यानंतर 31 मार्च, 30 जून, 30 सप्टेंबर, 31 डिसेंबरपर्यंत जमा रकमेवर व्याज मिळणार आहे. खात्रीशीर व्याज देणारा आणि पीपीएफच्या सुरक्षित पर्यायाचा विचार केला पाहिजे. जितक्या लवकर बचत सुरू करता येईल तितका चांगला फायदा मिळेल.10 / 16नॅशनल सेव्हिंग सर्टिफिकेट योजनेत डिसेंबरला संपणा-या तिमाहीसाठी 6.8 टक्क्यांनी व्याज मिळत आहे. या योजनेंतर्गत तुम्ही 100 रुपये गुंतवू शकता.11 / 16तसेच 100 रुपयांनंतर या योजनेत गुंतवणुकीला कोणतीही मर्यादा नाही. पहिल्यांदा या योजनेत गुंतवणूक करणा-याला वर्षाला 6.8 टक्के व्याज मिळत आहे. 12 / 16पीपीएफचं खातं आपल्याला 100 रुपयांमध्ये उघडता येते. यातील जमा रकमेवर 7.1 टक्के व्याज दिलं जातं. खातेधारकांना आपल्या खात्यात 500 रुपये आणि जास्तीत जास्त करून 1.50 लाख रुपये जमा करावे लागतात. 13 / 16तसेच खात्याची मर्यादा 15 वर्षांसाठी असते. यात आपण संयुक्त खातंही उघडू शकतो. आपल्याला या योजनेत नॉमिनेशनची सुविधाही प्राप्त होते. यात एका वित्त वर्षात तुम्हाला एक लाख रुपयांच्या गुंतवणुकीवर चांगला फायदा मिळतो.14 / 16जर आपण पोस्ट ऑफिस मासिक उत्पन्न योजनेत (एमआयएस) पैसे गुंतवल्यास भविष्यात चांगला फायदा मिळवून देते. एमआयएस ही एक छोटी बचत योजना आहे, ज्यात आपल्याला दरमहा पैसे गुंतवून पैसे कमविण्याची संधी मिळते. 15 / 16या योजनेत आपल्याला 7.6 टक्के व्याज मिळतं. या पोस्ट ऑफिस योजनेत एकरकमी गुंतवणूक करून आपल्याला दरमहा व्याज म्हणून उत्पन्न मिळते. या खात्याचा मॅच्युरिटी कालावधी 5 वर्षांचा आहे. या योजनेंतर्गत संयुक्त खाती उघडली जाऊ शकतात. 16 / 16स्वतंत्र खाते उघडताना तुम्ही या योजनेत किमान 1,000 आणि जास्तीत जास्त साडेचार लाख रुपयांची गुंतवणूक करू शकता. संयुक्त खाते असल्यास जास्तीत जास्त 9 लाखांपर्यंत रक्कम जमा करता येऊ शकते. सेवानिवृत्त आणि ज्येष्ठ नागरिकांसाठी ही एक अतिशय फायदेशीर योजना आहे. आणखी वाचा Subscribe to Notifications